Career Opportunities After 12th: बारावी झाल्यानंतर आपल्या करिअर संदर्भातील भविष्याची चिंता अनेक तरुणांना सतावत असते. कोणत्या क्षेत्रात चांगला पगार मिळेल, कोणत्या फिल्डकडे लक्ष ठेवायला हवे, असे अनेक प्रश्न तरुणांकडून विचारले जात असतात. प्रत्येक तरुण उत्तम पॅकेजसह नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतो. बारावीनंतर कोणता कोर्स केला, तर चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडलेला असतो. तुम्हीदेखील यापैकी एक असाल, तर टॉप कोर्सेसबद्दल जाणून घ्या…

१२ वीनंतर काय करायचे? जाणून घ्या उत्तमोत्तम करिअर पर्याय

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक.)

अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या क्षेत्रात पदवी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सहज नोकरी मिळू शकते. याबरोबरच मोठ्या आयटी कंपन्या तुम्हाला मोठी पॅकेजेसदेखील देऊ शकतात.

बॅचलर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटर सायन्स (B.Sc. CS)

या कोर्समध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या प्रोग्रामिंग भाषा, डेटाबेस व्यवस्थापन आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटबद्दल शिकवले जाईल. या कोर्समुळे तुम्हाला आयटी क्षेत्रात चांगली नोकरी मिळू शकते.

बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA)

जर तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर तुम्ही बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचा कोर्स करु शकता. त्यानंतर तुम्हाला बहुराष्ट्रीय कंपनीत सहज नोकरी मिळू शकते.

फार्मसीमध्ये पदवी (B.Pharm)

जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात रस असेल, तर बी. फार्मा हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. औषध कंपन्यांमध्ये फार्मासिस्टची मोठी मागणी आहे आणि येथील पगारही चांगला असतो.

पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम

चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल, तर पायलट ट्रेनिंग कोर्सेससाठी जाऊ शकता. बारावी सायन्समधून उत्तीर्ण झाला असाल, तर तुम्ही या सर्वांत जास्त पगार देणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता.

फॅशन तंत्रज्ञान आणि डिझायनिंग

फॅशन उद्योगातील शीर्ष डिझायनर आणि व्यावसायिक दरवर्षी करोडो कमावतात. NIFT किंवा तत्सम संस्थांमधून B.F. Tech सारखे अभ्यासक्रम एक मजबूत पाया प्रदान करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

B.A Fine Arts

आर्ट डिरेक्टर, आर्ट टीचर, कार्टुनिस्ट, ग्राफिक डिझायनर, सेट डिझायनर, ॲनिमेटर, फिल्म मेकिंग अशा एखाद्या क्रिएटिव्ह क्षेत्रात तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल, तर या पदवीचा तुम्ही नक्कीच विचार करायला हवा.