अग्निशमन दलामध्ये उपस्थानक अधिकारी आणि अग्निप्रतिबंधक अधिकारी व अग्निशामक म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, विद्यानगरी, हंस भुग्रा मार्ग, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ४०० ०९८ येथे पुढील निवासी अभ्यासक्रमांकरिता प्रवेश.
(१) अग्निशामक (Fireman) प्रशिक्षण पाठ्यक्रम (फक्त पुरुष उमेदवारांकरिता). पाठ्यक्रम कालावधी – ६ महिने (जानेवारी २०२६ ते जून २०२६ व जुलै २०२६ ते डिसेंबर २०२६).
पात्रता – एस.एस.सी. (मराठी विषयासह) प्रथम प्रयत्नात किमान ५०… गुणांसह उत्तीर्ण. (मागासवर्गीय/ईडब्ल्यूएससाठी ४५ टक्के गुण).
वयोमर्यादा – (१५ जून २०२५ रोजी) १८ ते २३ वर्षे. (दि. १५ जून २०२५ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षं पूर्ण असावे.)
(२) उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम. (फक्त पुरुष उमेदवारांकरिता) पाठ्यक्रम कालावधी – १ वर्ष (जुलै २०२६ ते जून २०२७). प्रवेश क्षमता – ४०.
पात्रता – पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/विजा/भटक्या जमाती/विमाप्र/इमाव/एसबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना पदवीला ४५ टक्के गुण असावेत.)
वयोमर्यादा – ( १५ जून २०२५ रोजी) १८ ते २५ वर्षे.
दोन्ही पाठ्यक्रमांसाठी (i) वयोमर्यादेत सूट – अजा/अज/विजा/भज/विमाप्र – ५ वर्षे, इमाव/ईडब्ल्यूएस – ३ वर्षे.
(ii) शारीरिक पात्रता – उंची – पुरुष – १६५ सें.मी.वजन – पुरुष – ५० कि.ग्रॅ.
छाती – ८१ ते ८६ सें.मी. (किमान ५ सें.मी. फुगविणे आवश्यक).
दृष्टी – अर्जदार डोळ्यांनी रंगहीन नसून चष्म्याशिवाय दृष्टी ६/६ असणे आवश्यक आहे.
या व्यतिरिक्त उमेदवार खाली दिलेल्या आजारापासून मुक्त असणे गरजेचे आहे.
(१) हाडांचा किंवा सांध्यांचा आजार, (२) पूर्व मानसिक आजार, (३) त्वचेचा आजार, (४) सपाट पाय आणि गुडघे टेकलेले, (५) रक्तवाहिनी फुगणे, (६) तिरकस डोळे, (७) कोणत्याही प्रकारचे शारीरिक व्यंग नसावे, (८) मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया झालेली नसावी, (९) ऐकू न येणे किंवा बोलताना अडखळणे (बोबडेपणा).
परीक्षा शुल्क – अग्निशामक पाठ्यक्रम – खुला प्रवर्ग – रु. ६००/-, राखीव गट – रु. ५००/-, उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम – खुला प्रवर्ग रु. ७५०/-, राखीव गट – रु. ६००/- (परीक्षा शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीनेच भरावयाचे आहे.)
उमेदवाराने दोन्ही पाठ्यक्रमांसाठी अर्ज केला असल्यास विहीत केल्याप्रमाणे प्रत्येक पाठ्यक्रमासाठी त्याने परीक्षा शुल्क एकाच वेळी भरणे आवश्यक आहे.
पाठ्यक्रमांसाठी येणारा अंदाजित खर्च –
अग्निशामक पाठ्यक्रम – (१) प्रशिक्षण शुल्क – रु. १३,०००/-, (२) निवास खर्च – रु. ५०/- ते रु. ७०/- प्रतिदिन, (३) ट्रेनी ॲमिनिटी – रु. २,०००/-, (४) जेवणाचा खर्च (अंदाजे) – रु. ३००/- प्रतिदिन, (५) गणवेश व इतर साहित्य – रु. १०,०००/-
उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम – (१) प्रशिक्षण शुल्क – रु. ३६,४००/-, (२) निवास खर्च – रु. १००/- प्रतिदिन, (३) ट्रेनी ॲमिनिटी – रु. ३,०००/-, (४) जेवणाचा खर्च (अंदाजे) रु. ३००/- प्रतिदिन, (५) गणवेश व इतर साहित्य – रु. १०,०००/-
शैक्षणिक कागदपत्रांची व शारीरिक पात्रता पडताळणीत पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी http://www.mahafireservice.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.
शैक्षणिक कागदपत्रांची व शारीरिक पात्रता पडताळणीचे ठिकाण – महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, महाराष्ट्र – अग्निशमन सेवा अकादमी, हंस भुग्रा मार्ग, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ४०० ०९८ याबाबतचे वेळापत्रक http://www.mahafireservice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. (प्रवेशपत्र एक आठवडा अगोदर उपलब्ध होईल.)
कागदपत्र व शारीरिक पात्रता पडताळणी दि. ८ सप्टेंबर २०२५ पासून पुढे सुरू होणार आहे.ऑनलाइन परीक्षा – जे उमेदवार शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होतील, तेच उमेदवार ऑनलाइन परीक्षेसाठी पात्र होतील.
ऑनलाइन परीक्षा १०० गुणांची बहुपर्यायी प्रश्नावली असेल. परीक्षेचा कालावधी दीड ते दोन तास असेल. ज्यामध्ये (अ) मराठी, (ब) इंग्रजी, (क) सामान्य ज्ञान विज्ञान विषयासह, (ड) बौद्धीक क्षमता चाचणी गणित विषयावर यांचा समावेश असेल.शंकासमाधानासाठी टोल फ्री नंबर ९६०४४०७४००.
ऑनलाइन अर्ज http://www.mahafireservice.gov.in या संकेतस्थळावर १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत भरावेत.