CBSE 12th Result Update : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. बोर्डाने अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर कोणतीही पूर्वसूचना न देता निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी पोर्टलवर निकाल पाहू शकतात. यंदा सीबीएसईच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ५ टक्क्यांनी कमी आहे.

यंदा सीबीएसईच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत त्रिवेंद्रम झोनने ९९.९१ टक्क्यांसह सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यानंतर बंगळुरू ९८.६४ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा मुलींचा निकाल मुलांपेक्षा चांगला लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ६ टक्के चांगला आहे, यंदा मुलांचा निकाल ८४.६८ टक्के तर मुलींचा निकाल ९०.६८ टक्के लागला आहे. या वर्षी एकूण १६,६०,५११ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. यांपैकी १४,५०,१७४ विद्यार्थी उर्तीण झाले आहेत.

हेही वाचा : मुंबई : सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर; गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात साडेपाच टक्क्यांची घट

jee mains result 2024 marathi news
JEE Main Result 2024: जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, ५६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण, नागपूरच्या निलकृष्ण गजरेने मारली बाजी…
Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष

यंदा कोणतीही टॉपर लिस्ट नाही

यंदा सीबीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांमधील स्पर्धा टाळण्यासाठी इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेच्या निकालातील टॉपर लिस्ट प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त बोर्डाने प्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर न करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्याऐवजी सीबीएसई वैयक्तिक विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्या अव्वल ०.१ टक्के विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्रे देणार आहे. सीबीएसईचा या मागचा उद्देश विद्यार्थ्यांनी रँक आणि डिव्हिजनसाठी स्पर्धा करण्याऐवजी स्वतः शिकण्यावर आणि शैक्षणिक वाढीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करणे आहे.

हेही वाचा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ‘या’ ८२ पदांसाठीची भरती जाहीर, जाणून घ्या पात्रता निकष

२१ मार्च ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. सीबीएसईने इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल CBSE च्या अधिकृत वेबसाईटवर तसेच UMANG आणि Digilocker अॅपवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

CBSE 12th Result 2023 : डिजिलॉकरवर इयत्ता १२ वीचा निकाल कसा तपासायचा?

१) सर्वप्रथ DigiLocker वेबसाइटला भेट द्या किंवा DigiLocker मोबाइल अॅप डाउनलोड करा.

२) आता तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि OTP वापरून लॉग इन करा.

३) Education सेक्शनवर क्लिक करा आणि ‘Central Board of Secondary Education’ निवडा.

४ ) तुमचा CBSE रोल नंबर, शाळेचा कोड आणि जन्मतारीख टाका.

५) Get Document बटणावर क्लिक करा.

६)तुमचा CBSE निकाल स्क्रीनवर डिस्प्ले होईल. आता भविष्यातील विविझ कारणांसाठी लागणारा निकाल डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.