सुहास पाटील

सीएसआयआरमधील संधी

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
Vacancies 2024 Intelligence Bureau Recruitment For 660 Various Posts Read For How to Apply and Other Details Her
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ६६० पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर

सीएसआयआर – सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, (CSIR. CEERI) (मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, भारत सरकार) पिलानी, राजस्थान ( Advt. No. ०१/२०२४ dt. १६.०२.२०२४) CSIR- CEERI एक प्रमुख रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेमध्ये टेक्निशियन (१) पदांची भरती. एकूण रिक्त पदे – २८. वेतन श्रेणी – पे-लेव्हल – २ अंदाजे वेतन दरमहा रु. ३५,०००/- (१) टेक्निशियन (१) (इलेक्ट्रिशियन) ( Post Code – TECH-१) – १० पदे . (२) टेक्निशियन (१) (इलेक्ट्रॉनिक्स) ( Post Code – TECH-२) – ९ पदे . (३) टेक्निशियन (१) (COPA) (Post Code – TECH-३) – ३ पदे . (४) टेक्निशियन (१) (रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग) (Post Code – TECH-४) – ४ पदे . (५) टेक्निशियन (१) (वेल्डर) ( Post Code – TECH-५) – २ पदे .

सर्व पदांसाठी पात्रता – (i) विज्ञान विषयांसह एसएससी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण, (ii) संबंधित ट्रेडमधील आयटीआय किंवा नॅशनल ॲप्रेंटिस सर्टिफिकेट किंवा संबंधित ट्रेडमध्ये सरकारी/निमसरकारी आस्थापनेमधील कामाचा ३ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – (दि. १ मार्च २०२४ रोजी) २८ वर्षेपर्यंत (इमाव – ३१ वर्षे; अजा/अज – ३३ वर्षे; (दिव्यांग – खुला – ३८ वर्षे, इमाव – ४१ वर्षे, अजा/अज – ४३ वर्षे)).

हेही वाचा >>> चौकट मोडताना : ‘छंद म्हणून हवा तेवढा जोपासा’

निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना ट्रेड टेस्टसाठी बोलाविले जाईल. ट्रेड टेस्टमधील उत्तीर्ण उमेदवारांना लेखी स्पर्धा परीक्षा द्यावी लागेल. लेखी स्पर्धा परीक्षेतील पेपर- II व पेपर- III मधील एकत्रित गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी बनविली जाईल.

पेपर- I – मेंटल अॅबिलिटी टेस्ट (जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, सिच्युएशन जजमेंट इ.) ५० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण १०० गुण, वेळ १ तास. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. पेपर- II – जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज प्रत्येकी २५ प्रश्न. प्रत्येक प्रश्नास ३ गुण, एकूण १५० गुण, वेळ ३० मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. पेपर- III – संबंधित विषयावर आधारित ५० प्रश्न. प्रत्येक प्रश्नास ३ गुण, एकूण १५० गुण, वेळ १ तास. चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. १००/-. (अजा/ अज/ दिव्यांग/महिला/ CSIR कर्मचारी यांना फी माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज https:// www. ceeri. res. in/ recruitments/ या संकेतस्थळावर दि. २८ मार्च २०२४ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत. आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून एका pdf फाईल (१५ एमबी पेक्षा कमी) अपलोड करणे आवश्यक.

ईपीएफओमधील भरती

एम्प्लॉयिज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) मध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) मार्फत ‘पर्सोनल असिस्टंट’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ३२३ (अजा – ४८, अज – २४, इमाव – ८७, ईडब्ल्यूएस – ३२, खुला – १३२) (१२ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव (कॅटेगरी-बी/एल.व्ही. – ३, D/ HH – ३, LD – ३, SLD/MI/MD – ३ पदे)). (UPSC (Recruitment by Selection) Vacancy No. 24035101707) पदाचे नाव – पर्सोनल असिस्टंट ग्रुप-बी (नॉन-गॅझेटेड).

वेतन श्रेणी – पे-लेव्हल – ७, अंदाजे वेतन दरमहा रु. ७८,०००/-.

वयोमर्यादा – (दि. २७ मार्च २०२४ रोजी) ( i) १८-३० वर्षे (कमाल वयोमर्यादा – इमाव – ३३ वर्षे, अजा/ अज/ खाते अंतर्गत कर्मचारी – ३५ वर्षे, दिव्यांग – ४० वर्षे).

पात्रता – ( i) पदवी उत्तीर्ण. (ii) स्टेनोग्राफी नॉर्म्स – १० मिनिटांचे डिक्टेशन १२० श.प्र.मि. वेगाने (हिंदी/ इंग्रजी) ट्रान्सक्रिप्शनसाठी ५० मिनिटे (इंग्रजी)/६५ मिनिटे हिंदी टायपिंग (कॉम्प्युटरवर). प्रोबेशनचा कालावधी २ वर्षांचा असेल.

निवड पद्धती – पेन आणि पेपर आधारित रिक्रूटमेंट टेस्ट (RT) त्यानंतर स्किल टेस्ट.

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ३०० गुणांसाठी लेखी परीक्षा २ तास कालावधी. (इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, रिझनिंग अँड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड या विषयांवर आधारित प्रश्न.) चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.

लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार स्किल टेस्टसाठी शॉर्टलिस्ट केले जातील. स्किल टेस्ट फक्त पात्रता स्वरूपाची असेल. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी स्किल टेस्टसाठी भाषेचा पर्याय हिंदी किंवा इंग्रजी निवडायचा आहे. स्किल टेस्टमधून उत्तीर्ण उमेदवार लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवडले जातील.

परीक्षा केंद्र – औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, ठाणे, पणजी इ. परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा दि. ७ जुलै २०२४ रोजी घेतली जाईल. अर्जाचे शुल्क – रु. २५/- Net Banking ने दि. २७ मार्च २०२४ (१८.०० वाजे) पर्यंत भरता येतील.

ऑनलाइन अर्ज https:// www. upsconline. nic. in या संकेतस्थळावर दि. २७ मार्च २०२४ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.

ऑनलाइन अर्जात काही सुधारणा करण्यासाठी कमिशनच्या वेबसाईटवर EDIT/ CORRECTION ऑप्शिन दि. २८ मार्च ते ३ एप्रिल २०२४ दरम्यान उपलब्ध असेल.