ED Recruitment 2024: अंमलबजावणी संचालनालयात (Enforcement Directorate) नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी ईडीने उपसंचालक ते ड्रायव्हर या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ज्या उमेदवारांकडे या पदांशी संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. ते ईडीच्या अधिकृत वेबसाइट, enforcementdirectorate.gov.in वर अर्ज करू शकतात. या ईडी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे विलंब न लावता त्वरित करा अर्ज.

ईडीच्या या भरतीप्रक्रियेंतर्गत अनेक पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्यास इच्छूक उमेदवार १६ एप्रिल किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतो. जर तुम्हाला इडीमध्ये अधिकारी व्हायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचून अर्ज करू शकता.

ED Recruitment 2024: ईडीमध्ये नोकरी मिळविण्यासाठी पात्रता आणि वयोमर्यादा

इडीमध्ये या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील. याचबरोबर वयोमर्यादेशी संबंधित सर्व तपशील अधिसूचनेत पाहता येतील.

ED Recruitment 2024: ED मध्ये निवड झाल्यावर मिळणार वेतन

या ईडी भरती अंतर्गत कोणते उमेदवार निवडले जातील, त्यांना वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे वेतन दिले जाईल. उमेदवारांना पदानुसार १,५१,००० रुपयांपर्यत पगार मिळू शकतो.

हेही वाचा – MSME Recruitment 2024 : यंग प्रोफेशनलच्या ९३ जागांवर होणार भरती! ६०,००० रुपयांपर्यंत मिळेल पगार, लवकर करा अर्ज

ED Recruitment 2024: येथे सूचना आणि अर्ज लिंक पहा

ED Recruitment 2024: अधिसूचना – https://enforcementdirectorate.gov.in/vacancies
ED Recruitment 2024: साठी अर्ज करण्यासाठी लिंक
-https://enforcementdirectorate.gov.in/

हेही वाचा – पुण्यातील एअरफोर्स स्कुलमध्ये विविध पदांसाठी होणार भरती! ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज, ५६०००पर्यंत मिळू शकतो पगार

ED Recruitment 2024: अशा प्रकारे ईडीमध्ये निवड होईल

अंमलबजावणी संचालनालय (ED) भरती अधिसूचना आणि अर्जाचा फॉर्म अधिकृत वेबसाइट enforcementdirectorate.gov.in वर उपलब्ध आहे. चाचणी/मुलाखतीच्या आधारे ईडीची निवड केली जाईल आणि निवडलेल्या उमेदवारांची दिल्लीत नियुक्ती केली जाईल. या पदांवर निवड झालेल्यांना एपीजे अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली, ११००११ दिल्ली येथे काम करावे लागेल.