सुहास पाटील डॉकयार्ड ॲप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई - ४०० ०२३. किमान ८ वी/१० वी/आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना ॲप्रेंटिसेस ॲक्ट १९६१ अंतर्गत जुलै २०२४ पासून सुरू होणाऱ्या ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग ( Designated Trades IT-२६) करिता प्रवेश. एकूण प्रवेश - ३०१. उमेदवारांना नियमानुसार दरमहा स्टायपेंड दिले जाईल. ( I) १ वर्ष कालावधीची ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग - (१) इलेक्ट्रिशियन - ४० पदे (अजा - ४, अज - ४, इमाव - ८, खुला - २४). (२) इलेक्ट्रोप्लेटर - १ पद (खुला). (३) फिटर - ५० पदे (अजा - ५, अज - ५, इमाव - १०, खुला - ३०). (४) फाऊन्ड्री मॅन - १ पद (खुला). (५) मेकॅनिक डिझेल - ३५ पदे (अजा - ४, अज - ३, इमाव - ७, खुला - २१). (६) इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक - ७ पदे (अजा - १, अज - १, इमाव - १, खुला - ४). (७) मशिनिस्ट - १३ पदे (अजा - १, अज - १, इमाव - ३, खुला - ८). (८) MMTM - १३ पदे (अजा - १, अज - १, इमाव - ३, खुला - ८). (९) पेंटर (जनरल) - ९ पदे (अजा - १, अज - १, इमाव - २, खुला - ५). (१०) पॅटर्न मेकर (कारपेंटर) - २ पदे (खुला). (११) पाईप फिटर (प्लंबर) - १३ पदे (अजा - १, अज - १, इमाव - ३, खुला - ८). (१२) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक - २६ पदे (अजा - ३, अज - २, इमाव - ५, खुला - १६). (१३) मेकॅनिक रेफ्रिजरेटर अॅण्ड एसी - ७ पदे (अजा - १, अज - १, इमाव - १, खुला - ४). (१४) शीट मेटल वर्कर - ३ पदे (खुला). (१५) शिपराईट (वुड) (कारपेंटर) - १८ पदे (अजा - २, अज - २, इमाव - ३, खुला - ११). (१६) टेलर (जनरल) - ३ पदे (खुला). (१७) वेल्डर (जी ॲण्ड ई) - २० पदे (अजा - २, अज - २, इमाव - ४, खुला - १२). (१८) मेसॉन (बीसी) - ८ पदे (अजा - १, अज - १, इमाव - २, खुला - ४). (१९) I & CTSM ( IT & ESM) - ३ पदे. (२०) शिपराईट (स्टील) (फिटर) - १६ पदे (अजा - २, अज - १, इमाव - ३, खुला - १०). १ ते २० पदांसाठी पात्रता - १० वी आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय परीक्षा उत्तीर्ण. ( II) २ वर्षं कालावधीची ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग - (२१) रिग्गर (फ्रेशर कॅटेगरी) - १२ पदे (अजा - १, अज - १, इमाव - २, खुला - ८). पात्रता - ८ वी उत्तीर्ण. स्टायपेंड - दरमहा रु. ६,०००/- पहिल्या वर्षी, रु. ६,६००/- दुसऱ्या वर्षी. (२२) फोर्जर ॲण्ड हीट ट्रीटर - १ पद (खुला). पात्रता - प्रेशर (१० वी उत्तीर्ण). स्टायपेंड - दरमहा रु. ६,०००/- पहिल्या वर्षी, रु. ६,६००/- दुसऱ्या वर्षी. वयोमर्यादा - १४ ते २१ वर्षे. (उमेदवाराचा जन्म जून २०१० नंतरचा असावा.) शारीरिक मापदंड चाचणी (PST) - उंची - १५० सें.मी., वजन - किमान ४५ कि.ग्रॅ. छाती - किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक. दृष्टी - (चष्म्यासह) ६/६ ते ६ निवड पद्धती - शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची दोन तास कालावधीची (ओएमआर आधारित) लेखी परीक्षा मुंबई येथे मे २०२४ मध्ये आयोजित केली जाईल. ज्यात १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न (जनरल सायन्स - ३५ , जनरल अवेअरनेस - ३० आणि गणित (न्यूमरिकल ॲप्टिट्यूड) - ३५ या विषयांवर आधारित) विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परीक्षा केंद्र - मुंबई असेल. परीक्षेची तारीख, वेळ उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर्ड ई-मेल द्वारे कळविण्यात येईल. लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राथमिक गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना इंटरह्यूसाठी बोलाविले जाईल. अंतिम निवड यादी लेखी परीक्षा आणि इंटरह्यूमधील एकत्रित गुणवत्तेनुसार बनविली जाईल. जी https:// dasapprenticembi. recttindia. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. मेडिकल एक्झामिनेशन - गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वैद्याकीय तपासणी घेतली जाईल. ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंगची सुरूवात जुलै २०२४ मध्ये केली जाईल. ऑनलाइन अर्जासोबत पांढऱ्या बॅकग्राऊंडवरील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो (३.५ बाय ४.५ cm. upto २०० kb JPEG/ JPG format) व इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ( A४ size in pdf format - file size upto २०० kb) अपलोड करणे आवश्यक. ऑनलाइन अर्ज https:// dasapprenticembi. recttindia. in या संकेतस्थळावर दि. ५ एप्रिल २०२४ (२३.५० वाजे) पर्यंत करावेत. शंकासमाधानासाठी ई-मेल - navaldockmumbais @gmail. com, हेल्पडेस्क नंबर - ०३३-२४१४००४७.