डॉ.मिलिंद आपटे
● सध्या मी नव्याने सुरू झालेल्या कअफक संस्थांपैकी एका संस्थेत इ. Sc. ऑनर्स (कृषी) करत आहे. मला संशोधनाची आवड आहे आणि माझा कल मुख्य विज्ञानाकडे आहे. मी पूर्वी ककरएफ सारख्या संस्थेत प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात यश मिळाो नाही. सध्या जवळपास सर्वजण स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा सल्ला देतात, त्यामुळे करिअरच्या दृष्टीने नेमकं काय निवडावे – संशोधन की स्पर्धा परीक्षा – याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. कृपया या संदर्भात मला योग्य मार्गदर्शन करावे. – अर्पिता झाडके
तुमचा कल संशोधांनकडे आहे असे लक्षात येतेय. आजूबाजूच्या वातावरणा मुळे बरेचदा असे मन विचलित होते कारण संशोधनामध्ये रुची असणारे फार कमी. त्यामुळे अशी अवस्था होऊ शकते पण शेवटी हा पूर्णपणे तुमचा निर्णय असावा किंवा समुपदेशकाकडे जाऊन सल्ला घ्यावा. कारण तुमच्या क्षमता आणि कल या दोन्ही गोष्टी समजून घेणे या ठिकाणी गरजेचे आहे. खूप शुभेच्छा
● माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. मला फायनान्समध्ये एमबीए करायचे आहे. प्रवेश घेऊन दुसरीकडे फायनान्स कंपनीत नोकरीसाठीदेखील प्रयत्न करायचा आहे. नोकरी लागली तर मला एमबीएचा काय उपयोग होईल? – प्रतीक वाघ
– आपले पदवी पर्यंतचे शिक्षण कोणते त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे उत्तर मोघम देता येईल. एमबीए फायनान्सचा उपयोग नक्कीच नोकरी मिळण्यासाठी होणार. तुम्हाला फायनान्स मधेच नोकरी मिळवण्याची इच्छा आहे, त्यामुळे नक्कीच याचा फायदा होईल. careerloksatta@gmail.com