डॉ. श्रीराम गीत

माझ्या मुलीला दहावीला ७३ टक्के आणि बारावीला ८० टक्के मिळाले होते. इतर छंद परीक्षा देता येण्यासाठी पदवीसाठी जवळच्या तिचे विषय असणारे महाविद्यालयाची निवड केली. मानसशास्त्र घेतले आहे. तिला माहीत आहे सायन्स घेऊन क्लिनिकल सायकॉलॉजी करता येते. पण त्यातील फिजिक्समुळे तीने ते घेतलं नाही. नंतर तिला पीसीबी करायचेही होते. पण ड्रॉप घेऊन पुन्हा मागे जाण्यापेक्षा मेडिसीन न घेता ही वाट आहे म्हणून तिने सध्या आर्टसची वाट निवडली आहे. पुढे मात्र क्लिनिकल सायकॉलॉजी घेऊन पीजी करायच आहे त्या साठी कोणते महाविद्यालय आहे? किंवा परीक्षा? हे ती शोधत आहे. यासाठी करियर बाबतीत मार्गदर्शन करावे. ती आता सध्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे. मानसशास्त्र विषयात तिचा सीजीपी ८.५ आहे. – मनिषा चित्रे.

FTII student short film, FTII student short film Oscar,
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
sobhita dhulipala celebrated diwali with naga chaitnya and family
लग्नाआधी सोभिता धुलीपालानं नागा चैतन्याच्या कुटुंबासह साजरी केली दिवाळी; अभिनेत्रीच्या साडीतल्या लूकमुळे वेधलं लक्ष, पाहा फोटो
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
2nd november 2024 rashi bhavishya
२ नोव्हेंबर पंचांग: पाडव्याला नात्यात येईल गोडवा तर व्यवसायात होईल फायदा; तुमच्या नशिबात कोणत्या प्रकारात येईल सुख? वाचा राशिभविष्य
Health Special Diwali for mental health
Health Special : मानसिक स्वास्थ्यासाठी दिवाळी
Marathi Actress tejaswini pandit sister Poornima Pullan gave birth to a baby girl
“१४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला”, अभिनेत्री तेजस्विनी पंडित झाली मावशी; म्हणाली, “लक्ष्मी आली”
Indian economy current affairs
MPSC मंत्र: राज्य सेवा मुख्य परीक्षा; अर्थव्यवस्था चालू घडामोडी

हेही वाचा >>> UPSC-MPSC : भारतातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये आणि त्यावर परिणाम करणारे घटक कोणते?

मास्टर्स इन क्लिनिकल सायकॉलॉजी करता चांगले कॉलेज मिळण्यासाठीचा विचार सोडून द्यावा. कोणत्या विद्यापीठात पीजी करायचे त्या विद्यापीठाची प्रवेश परीक्षा देऊन त्यात प्रवेश मिळवणे महत्त्वाचे व उपयुक्त ठरेल. अनेक चांगली डीम्ड विद्यापीठेही आहेत. पुणे, मुंबई अशी जुनी विद्यापीठेही आहेत. खरे तर क्लिनिकल सायकॉलॉजी घेऊन त्यात काम करणाऱ्या एखाद्या विद्यार्थिनीला भेटून कामाचे स्वरूप समजावून घेणे जास्त उपयुक्त राहील. अनेकदा एखादी पदवी घेतल्यानंतर मिळणारे काम व त्याचे स्वरूप आवडत नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी मुले करतात. यासाठी अशा व्यक्तींकडून माहिती घेतलेली खूप फायद्याची ठरते. हे सारे लिहिण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण मुलीला काय आवडत नाही म्हणून काय घेतले असे आवर्जून लिहिले आहे. त्या ऐवजी हे का आवडते याबद्दलचा विचार महत्त्वाचा ठरतो. नाहीतर घेतलेल्या पदवीचा यानंतर त्याचा फारसा फायदा होत नाही.

मी अॅग्रीमधील पदवी २०२३ मध्ये उत्तीर्ण झालो असून मला प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे तर मी किती वर्षे दिली पाहिजे? आणि प्लॅन -बीचा विचार कधी करू? मला पोलिटिकल सायन्समध्ये पण आवड आहे. तर ते कराव का? नामांकीत विद्यापीठामध्ये उदाहरणार्थ जेएनयू किंवा महाराष्ट्रामध्ये फर्गसन कॉलेजमध्ये राहून अभ्यास करावा का दिल्लीला जावं? आर्थिक बाबींचा विचार करता काय करावं हे सुचत नाही. आणि वैकल्पिक विषय एग्रीकल्चर आहे. तर वैकल्पिक विषय कुठला घ्यावा आणि २०२५ मध्ये परीक्षेचा पॅटर्नमध्ये बदल होणार आहे. अर्थात यूपीएससी सारखा पॅटर्न होणार आहे. तरी मार्गदर्शन करावे. या संदर्भात काय विचार करावा, कुठे पाऊल टाकावं. नोकरी संदर्भात किती वाव असेल? पोलिटिकल सायन्समध्ये किंवा अग्रीकल्चरमध्ये पीजी करावं का? – सुशील मुंतोडे

हेही वाचा >>> UPSC-MPSC : वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी भारतात कोणत्या कायदेशीर उपाययोजना करण्यात आल्या?

बीएससी अॅग्रीची पदवी हाती असताना पहिले काम म्हणजे नोकरी शोधणे. ती करताना मनातील सगळ्या विचारांच्या संदर्भात जे जे करावे वाटते त्या त्या अभ्यासक्रमांची पुस्तके पाहणे आणि त्यातील पेपरची माहिती घेणे. या संदर्भात करिअर वृत्तांतचे रोजचे वाचन तुला खूप उपयोगी पडेल. पॉलिटिकल सायन्स आवडणे, वाचायला छान वाटणे व त्यात पदवी करता वेळ देणे यात खूप फरक आहे. तो रस्ता तुझा नाही. क्लास लावू का? दिल्लीला जाऊ का? हे विचार सध्या बाजूला ठेव. वैकल्पिक विषय अॅग्री ठेवायला हरकत नसावी त्याचा फायदाच होईल. २०२५ सालचा अभ्यासक्रम बदलेल किंवा काय होईल याचा विचार न करता सध्या प्रथम नोकरीचा विचार कर. हातात नियमित पैसे येणे व आर्थिक स्थैर्य मिळणे हे अभ्यासाकरता पण खूप गरजेचे व महत्त्वाचे असते. तसेच बेकार राहून फक्त अभ्यास केल्यास दोन वर्षांनी तुझ्या हाती असलेल्या पदवीची किंमत शून्य होत होईल हे लक्षात घे. स्पर्धा परीक्षांची तयारी केली व परीक्षेला बसले म्हणजे यश मिळते असे नसून त्याकरिता किती प्रयत्न करायचे किती वर्षे द्यायची याचे गणित व त्यासाठी घरच्यांची आर्थिक मदत याची चर्चा प्रथम करणे खूप महत्त्वाचे राहते. ती तू केलेली दिसत नाहीये.