भाजीपाला आणि फळपिके लागवड करताना जमीन, पाणी आणि खताचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. फळपिके लागवड करताना काही ठराविक बाबींकडे वेळेत लक्ष दिल्यास जसे की, पीक संरक्षण आणि साठवणूक आर्थिक बाबींमध्ये वाढ करता येऊ शकते. धान्य उत्पादनापेक्षा भाजीपाला आणि फळपिके लागवड केल्यास हमखास उत्पादनाची हमी मिळते.

भाजीपाला पिके घेताना सध्या शेतकरी हंगामनिहाय सामूहिक शेतीकडे वळत आहे. सामूहिक शेतीमुळे ठरावीक दर घेण्यात शेतकरी यशस्वी झाला आहे. पिकामध्ये सुद्धा सामूहिक शेतीचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. सध्या देशात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेती करताना अडचणी येत नाहीत. कृषी विद्यापीठांच्या संशोधनामुळे फळपिकांचे नवनवीन वाण विकसित व प्रसारित करण्यात आले आहेत. फळ पिकांची उत्पादनात भरीव वाढ झालेली दिसून येत आहे. उत्पादनात वाढ झाल्यामुळे काही वेळा दरामध्ये घसरण झालेली आढळून येते. त्यावर उपाय म्हणून प्रक्रिया उद्याोगाकडे शेतकरी वळू लागले आहेत.

फळप्रक्रिया म्हणजे फळांची दीर्घकालीन साठवणूक. मात्र साठवणूक करताना फक्त साठवणे हाच उद्देश डोळ्यासमोर न ठेवता त्यामधून अधिकाअधिक अर्थार्जन कसे करता येईल याकडे कृषी शास्त्रज्ञांनी लक्ष दिल्यामुळे फळप्रक्रिया उद्याोग भरभराटीस आला आहे. फळ प्रक्रियेबरोबरच मूल्यवर्धन व उत्पादनातून अधिक लाभ मिळवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न यामुळे रोजगाराच्या संधी ग्रामीण भागात उपलब्ध झालेल्या आहेत.

फळ हे नाशवंत असल्यामुळे त्याच्यावर व्यवस्थित प्रक्रिया केल्यास ते टिकाऊ होतात. तसेच त्यामधील पोषक घटक संचरित राहतात व पौष्टिक उत्पादने तयार करता येतात. फळांचा साठवण कालावधी वाढवणे, फळांना आकर्षक रूप देणे, शेतकऱ्यांना अधिक मूल्य मिळवून देणे, निर्यातक्षम व दर्जेदार उत्पादन तयार करणे, पोषण सुरक्षितता राखणे ही काही महत्त्वाची प्रक्रियेची उद्दिष्टे आहेत.

प्रक्रिया उद्याोगामुळे शेतमालाचे दर नसल्यामुळे होणारे नुकसान टाळता येते, वर्षभर उत्पादन नसले तरी वर्षभर विक्री करता येते, स्थानिक रोजगार निर्मिती होते, निर्यात करणे सहज सोपे होते, महिलांना घरगुती उद्याोग सुरू करता येतो असे काही फायदे आहेत.

फळप्रक्रियेचे अनेक प्रकार आहेत जसे सुकवणे, रस काढणे, जाम, जेली बनवणे, मुरांबे बनवणे, लोणची बनविणे, सिरप बनविणे, कॅनिंग करणे, कोल्ड स्टोअरेजमध्ये फळे साठवणे इत्यादी फळप्रक्रियेसाठी आंबा, संत्रा, आवळा, केळी, सिताफळ, जांभूळ, पेरू, अननस, डाळिंब, लिची इत्यादी फळे उपयुक्त आहेत.

फळप्रक्रिया तंत्रज्ञान

फळप्रक्रिया करताना प्राथमिक प्रक्रिया म्हणजे फळे स्वच्छ करणे, त्यांची रंग, वजन यानुसार प्रतवारी करणे होय. फळांचा रंग व चव टिकवण्यासाठी काही वेळ कोमट पाण्यात ठेवून नंतर थंड पाण्यात फळे थंड केल्यास त्यातील पोषकतत्त्वे टिकून राहतात. ज्या फळांपासून ज्यूस काढला जातो तो टिकवण्यासाठी तसेच त्यामधील हानिकारक जंतू नष्ट करण्यासाठी फळे उच्च तापमानात काही काळ ठेवली जातात.

फळे निर्यात करण्यासाठी त्यांचे छोटे तुकडे करतात आणि हवाबंद डब्यामध्ये साठवून कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवली जातात. सूर्याच्या उष्णतेने किंवा कृत्रिमरित्या उच्च तापमानामध्ये ठेवून फळांमधील पाणी कमी करून फळे टिकवली जातात. फळातील साखर रूपांतरित करून द्राक्षरस (वाईन) तयार केला जातो. त्याला देशांतर्गत मागणी वाढू लागली आहे. याचे औषधी उपयोग सुद्धा लोकांना पटू लागले आहेत.

आपल्या पूर्वजांपासून लोणची, मुरंबा तयार करण्याच्या पद्धती आपणास अवगत आहेत. शास्त्रीयदृष्ट्या त्याचे सुद्धा महत्त्व लोकांना पटले असल्याने त्या उद्याोगाकडे शेतकरी खूप आशेने पाहू लागले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फळप्रक्रिया उद्याोगासाठी स्वच्छता, प्रक्रिया यंत्रसामग्री, पॅकेजिंग साहित्य, FSSAI नोंदणी, बाजारपेठेचे ज्ञान या गोष्टी आवश्यक आहेत. प्रक्रिया उद्याोगांमध्ये वरील गोष्टींबरोबर प्रशिक्षण व कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.

फळप्रक्रिया उद्याोग वाढवण्यासाठी तसेच जास्तीत जास्त लोकांनी व्यवसायामध्ये उतरावे यासाठी शासन स्तरावर ग्रामीण भागामध्ये व्यवसायाभिमुख प्रशिक्षण आयोजित केले जातात. उद्याोग वाढीस लागण्यासाठी तसेच तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उतरावे यासाठी नाबार्ड या बँकेकडून तसेच शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते.

sachinhort. shinde@gmail. com