Indian Army Recruitment 2024 : भारतीय सैन्याने शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्ससाठी अर्ज मागवले आहेत. कोर्ससाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील ३७९ रिक्त जागा भरल्या जातील.

नोंदणी प्रक्रिया १६ जुलै रोजी सुरू झाली आणि १४ ऑगस्ट २०२४ रोजी संपेल. पात्रता अटी, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील जाणून घ्या.

Indian Army Recruitment 2024 : रिक्त जागा तपशील

SSC(Tech)- ६४ पुरुष : ३५० रिक्त जागा
SSC(Tech)- ६४महिला : २९ जागा

Indian Army Recruitment 2024 : पात्रता निकष

आवश्यक अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या उमेदवारांनी अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा ०१ एप्रिल २०२५ पर्यंत सर्व सेमिस्टर/वर्षांच्या गुणपत्रिकांसह सादर केला पाहिजे आणि सुरू झाल्याच्या तारखेपासून १२ आठवड्यांच्या आत अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्र सादर केले पाहिजे. प्री-कमिशनिंग ट्रेनिंग अकादमी (PCTA) येथे प्रशिक्षण.

Indian Army Recruitment 2024 : वयोमर्यादा

हेही वाचा – Success Story : इन्फोसिससारख्या कंपनीतील नोकरी सोडून फक्त २० हजारांनी केली सुरुवात अन् मेहनतीने उभारली १०० कोटींची कंपनी

१ एप्रिल २०२५ रोजी २० ते २७ वर्षांच्या दरम्यान आहे (०२ एप्रिल १९९८ ते ०१ एप्रिल २००५ दरम्यान जन्मलेले उमेदवार)

सैन्य सेवेत मरण पावलेल्या भारतीय सशस्त्र दलाच्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा अधिसुचना तपासू शकतात.

Indian Army Recruitment 2024 : अधिसुचना –https://joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/DETAILED_NOTIFICATION_FOR_SSC_T_-64.pdf

हेही वाचा – India Post GDS Recruitment 2024 : ४४,०० पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी होणार भरती, लवकर करा अर्ज, जाणून घ्या पात्रता-निकष

Indian Army Recruitment 2024 : निवड प्रक्रिया
संस्थेच्या कट ऑफच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. अर्ज शॉर्टलिस्ट केल्यानंतर, केंद्र वाटप उमेदवाराला ईमेल केले जाईल. निवड केंद्र वाटप झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या SSB तारखा निवडाव्या लागतील, ज्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन टप्प्यातील निवड प्रक्रियेतून उमेदवारांची निवड केली जाईल. जे पहिला टप्पा पार करतील तेच दुसऱ्या टप्प्यापर्यंत जातील. उमेदवाराने SSB मुलाखतीत मिळवलेल्या गुणांवर आधारित अभियांत्रिकी प्रवाह/विषयासाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.