सुहास पाटील

इंडियन नेव्हीमध्ये अविवाहित पुरुष व अविवाहित महिला उमेदवारांची इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी एन्ट्रीमधील (एक्झिक्युटिव्ह ब्रँच) शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळविण्यासाठी जून २०२४ पासून सुरू होणारा स्पेशल नेव्हल ओरिएंटेशन कोर्सकरिता इंडियन नेव्हल अॅकॅडमी, ( INA) इझिमाला, केरळ येथे प्रवेश. पदाचे नाव – SSC Executive (Information Technology) – एकूण रिक्त पदे – १५.

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?
BMW iX xDrive50 launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, नवी इलेक्ट्रिक SUV देशात दाखल, सिंगल चार्जमध्ये धावते ६३५ किमी, पण किंमत तर…

पात्रता – एम.एस्सी./ बी.ई./ बी.टेक./एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग/कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/ सॉफ्टवेअर सिस्टीम/ सायबर सिक्युरिटी/सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड नेटवर्कींग/ कॉम्प्युटर सस्टीम अॅण्ड नेटवर्कींग/डेटा अॅनालायटिक्स/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स) किंवा एम.सी.ए. (कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीमधील बी.सी.ए./ बी.एस्सी. पदवीसह). १० वीला किंवा १२ वीला इंग्लिश विषयात किमान ६० टक्के गुण मिळालेले असावेत. तसेच पात्रता परीक्षेत किमान सरासरी ६० टक्के गुण आवश्यक.

पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल इंडियन नेव्हीच्या officer@navy.gov.in या ई-मेलवर जून २०२४ पूर्वी सादर करावा लागेल.

हेही वाचा >>> स्कॉलरशीप फेलोशिप : पत्रकारांसाठी फेलोशिप

शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७ सें.मी., महिला – १५२ सें.मी.

वजन – उंची आणि वय यांचे प्रमाणात वजन असावे. (पुरुष व महिला) ज्यांचे वय २० ते ३० वर्षे दरम्यानचे आहे आणि

( i) उंची १५२ सें.मी. असलेले उमेदवारांसाठी किमान वजन ४३ कि.ग्रॅ. व कमाल वजन ५३ कि.ग्रॅ.

( ii) १५७/१५८ सें.मी. उंचीसाठी – किमान वजन ४६ कि.ग्रॅ. व कमाल वजन ५७ कि.ग्रॅ. असावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. २ जुलै १९९९ ते १ जानेवारी २००५ दरम्यानचा असावा.

निवड पद्धती – SSB इंटरह्यूकरिता उमेदवार शॉर्ट लिस्ट करताना (१) बी.ई./बी.टेक. पात्रता धारकांचे/अंतिम वर्षाच्या उमेदवारांचे ५ व्या सेमिस्टरपर्यंतचे सरासरी गुण पाहिले जातात. (२) पदव्युत्तर पदवी धारकांचे M.Sc./ M.C.A. M.Tech. सर्व सेमिस्टर्सचे सरासरी गुण पाहिले जातील. पोलीस व्हेरिफिकेशन, कॅरॅक्टर व्हेरिफिकेशननंतर मेडिकल एक्झामिनेशनमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नेमणूक दिली जाईल. पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षातील उमेदवारांचे प्री-फायनल वर्षाची गुणवत्ता पाहिली जाईल.

हेही वाचा >>> MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास

उमेदवारांची निवड सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड ( SSB) इंटरह्यूमधील गुणवत्तेनुसार केली जाईल.

दि. १ जून २०२१ किंवा त्यानंतर मिळविलेले नेव्हल/ आर्मी/ एअर विंगचे NCC- C सर्टिफिकेट (किमान बी ग्रेडसह) उमेदवारांना ररइ साठी निवडताना किमान ५ टक्के गुणांची सूट दिली जाईल.

(NCC च्या आर्मी/ नेव्हल/ एअरविंग सिनियर डिव्हीजनमधील किमान २ शैक्षणिक वर्षांचा अनुभव असावा.)

SSB इंटरह्यूनंतर मेडिकल टेस्ट घेतली जाईल. SSB इंटरह्यूची विस्तृत माहिती इंडियन नेव्हीच्या http://www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना सब-लेफ्टनंट पदावर ६ आठवड्यांचे नेव्हल अॅकॅडमी, इझिमाला येथे नेव्हल ओरिएंटेशन कोर्ससाठी पाठविले जाईल. त्यानंतर प्रोफेशनल ट्रेनिंग नेव्हल शिप्स आणि ट्रेनिंग इस्टॅब्लिशमेंट्समध्ये दिले जाईल. फक्त अविवाहित उमेदवारच ट्रेनिंगसाठी पात्र आहेत.

प्रोबेशन कालावधी – २ वर्षांचा असेल, जो सबलेफ्टनंट रँक मिळाल्या दिवसापासून सुरू होवून २ वर्षांचा असेल किंवा इनिशियल ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत असेल.

नेमणुकीचा कालावधी – निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला १० वर्षांसाठी नेमणूक दिली जाईल. उमेदवाराची कामगिरी/ मेडिकल फिटनेस इ. पाहून नेमणूकीचा कालावधी २ अधिक २ वर्षांसाठी वाढविला जाईल.

रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन अर्ज www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर ३ मार्च २०२४ दरम्यान करता येईल. उमेदवारांना ररइ इंटरह्यूच्या वेळी ऑनलाइन अर्जाची प्रिंटआऊट सादर करावी लागेल.

अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक.

भारतीय वायुसेनेतील भरती

भारतीय वायुसेना ( IAF) मध्ये महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात राज्यांतील आणि दमणदिव, दादरा नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशांमधील पुरुष अविवाहित उमेदवारांची ‘एअरमन (ग्रुप-वाय) (नॉन-टेक्निकल) मेडिकल असिस्टंट’ पदांवर भरती करण्यासाठी दि. २८ मार्च ते ५ एप्रिल २०२४ दरम्यान भोपाळ येथे भरती रॅली घेणार आहे.

कामाचे स्वरूप – उमेदवारांना नर्सिंग आणि फर्स्ट एडचे ट्रेनिंग दिले जाईल. मेडिकल स्टोअर्स, डिस्पेंसरिज आणि वॉर्ड यांचे व्यवस्थापन करणे तसेच इतर एअर फोर्स ड्युटीज.

ट्रेनिंग – सुरुवातीला जॉईंट बेसिक फेज ट्रेनिंग (JBPT) साठी नेमलेल्या बेसिक टेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये पाठविले जाईल. JBPT यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ट्रेड ट्रेनिंग/सिक्युरिटी ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल.

निवड पद्धती – ( i) पात्रता पडताळणी (Verification) –

( ii) शारीरिक क्षमता चाचणी ( PFT) – २१ वर्षे वयापर्यंतच्या उमेदवारांनी १.६ कि.मी. अंतर ७ मिनिटांत धावणे. २१ वर्षांवरील उमेदवारांनी १.६ कि.मी. अंतर ७ मिनिटे ३० सेकंदांत धावणे.

१० पुशअप्स, १० सिटअप्स आणि २० स्कॉट्स (squats) (उठक बैठक) दिलेल्या वेळेत पूर्ण करणे.

( iii) लेखी परीक्षा – PFT मधून पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्याच दिवशी लेखी परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप इंग्रजी २० प्रश्न, रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस (RAGA) – ३० प्रश्न, वेळ ४५ मिनिटे. लेखी परीक्षेचा निकाल परीक्षेच्या दिवशीच लावला जाईल. प्रत्येक प्रश्नाला १ गुण असेल. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.

( iv) अनुकूलता चाचणी (Adaptibility Test- II) – लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांची अनुकूलता चाचणी त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी घेतली जाईल. Adaptibility Test- II मध्ये उमेदवार एअरफोर्स आणि मिलिटरी सर्व्हिससाठी अनुकूल ठरतात का हे तपासले जाते.

( v) मेडिकल एक्झामिनेशन – Adaptibility Test- II मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची भारतीय वायुसेनेच्या मेडिकल स्टँर्डड्सप्रमाणे वैद्याकीय तपासणी एप्रिल २०२४ मध्ये SMC Air Force Station ओझर येथे घेतली जाईल. मेडिकल एक्झामिनेशनमध्ये अपात्र ठरलेले उमेदवार अपिल मेडिकल बोर्डा ( AMB) कडे रु. ४०/- भरून कामकाजाच्या तीन दिवसांच्या आत १५, ASC, आ येथे अपिल करू शकतात. प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ( PSL) १५, Airmen Selection Centre, Bhopal, मध्य प्रदेश येथे १३ मे २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच www.airmenselection.cdac.in या संकेतस्थळावर PSL प्रसिद्ध केली जाईल. AIRMEN INTAKE ०१/२०२४ ची अंतिम निवड यादी २४ मे २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारा कॉल लेटर पाठविले जाईल. नेमणुकीचा कालावधी २० वर्षांचा असेल. जो वयाच्या ५७ वर्षांपर्यंत वाढविला जाईल.

शंकासमाधानासाठी फोन नं. ०११-२५६९४२०९/ २५६९९६०६/ ०७५५-२६६१९५५ आणि ई-मेल आयडी casb@iaf.nic.in/ casbiaf@cdac.in /co.15asc-mp@gov.in वर संपर्क साधा.

www.airmenselection.cdac.in या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील पॅरा ११ मध्ये नमूद केलेली मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या आवश्यक त्या प्रती घेवून उमेदवारांनी रॅलीच्या ठिकाणी हजर व्हावयाचे आहे. याशिवाय उमेदवारांनी रॅलीच्या ठिकाणी हजर होताना आपल्यासोबत एचबी पेन्सिल, इरेझर, शार्पनर, Glue Stick, स्टेप्लर आणि काळ्या व निळ्या रंगाचे बॉलपॉईंट पेन आणावयाचे आहेत. १० फोटोग्राफ्स (रंगीत पासपोर्ट आकाराचे हलक्या बॅकग्राऊंडवर काढलेले) जे साक्षांकीत केलेले नसावेत. फोटो ६ महिन्यांपूर्वी काढलेले नसावेत. उमेदवाराने काळ्या पाटीवर आपले नाव, फोटो काढल्याचा दिनांक पांढऱ्या खडूने व्यवस्थित लिहून पाटी छातीसमोर धरून फोटो काढलेले असावेत.