Intelligence Bureau Recruitment 2025 : दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्रीय गुप्तचर विभागात नोकरीची मोठी संधी आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाने या मोठ्या भरतीसंदर्भात एक अधिकृत परित्रक जारी केले आहे. ज्या अंतर्गत सिक्योरिटी असिस्टंट / एक्झिक्युटिव्ह (SA / Exe) पदाच्या ४९८७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया २६ जुलै २०२५ पासून सुरु झाली असून उमेदवार १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात. केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकृत www.mha.gov.in/en/notifications/vacancies या वेबसाईडवर जाऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी पदासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, पगार, वयोमर्यादा आणि इतर सर्व अटीशर्तींची तपशीलवार माहिती घ्यावी.

केंद्रीय गुप्तचर विभागात नोकरीची संधी (Intelligence Bureau Recruitment Security Assistant Apply Online 2025)

रिक्त पदांची संख्या:

४८८७ जागा

पदाचे नाव:

 सिक्योरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव्ह (SA/Exe)

 यामध्ये अनारक्षित (अनारक्षित): २,४७१ पदे, इतर मागासवर्गीय: १,०१५ पदे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक: ५०१ पदे, अनुसूचित जाती: ५७४ पदे आणि अनुसूचित जमाती: ४२६ पदे राखीव आहेत.

शैक्षणिक पात्रता (IB Security Assistant Qualification)

या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार ज्या राज्य/केंद्रशासित प्रदेशातून अर्ज करत आहेत त्या राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, त्या भागातील स्थानिक भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा (IB Security Assistant Age Limit)

पात्र अर्जदारांचे वय १७ ऑगस्ट २०२८ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल २७ वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी आणि इतर राखीव श्रेणींसाठी वयात सूट लागू आहे.

अर्ज शुल्क (IB Security Assistant Application Fee 2025)

या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करताना महिला व इतर उमेदवारांना ५५० रुपये तर जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी पुरुष उमेदवारांना ६५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

कशी असेल निवड प्रक्रिया?

पात्र उमेदवारांची निवड तीन टप्प्यांच्या प्रक्रियेच्या आधारे केली जाईल – टियर I, टियर II आणि टियर III. टियर I ही संगणक आधारित चाचणी (CBT) असेल ज्यामध्ये जनरल अवेयरनेस, रिजनिंग, क्वांटेटिव एप्टीट्यूड आणि इंग्रजी विषयांमधून ऑब्जेक्टिव टाईपचे प्रश्न विचारले जातील. टियर II ही एक लेखी परीक्षा असेल ज्यामध्ये स्थानिक भाषेचे ज्ञान तपासले जाईल आणि टियर III फेरी मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी असेल. तिन्ही फेऱ्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल.

इंटेलिजेंस ब्युरो भरती २०२५ (Intelligence Bureau Bharti 2025)

अर्ज कसा करावा? (How to Apply for IB Security Assistant Recruitment 2025?)

१) सर्वप्रथम गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in किंवा ncs.gov.in ला भेट द्या.

२) विचारलेले आवश्यक डिटेल्स भरून रजिस्ट्रेशन करा.

३) आता तयार केलेल्या क्रेडेन्शियल्सचा वापर करून लॉग इन करा (ईमेलवर आलेल्या).

४) अॅप्लिकेशन फॉर्म लिंकवर क्लिक करा, डिटेल्स भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

५) सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल.

६) यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवड झालेल्या उमेदवारांना किती पगार मिळेल?

या भरती प्रक्रियेत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना वेतन स्तर-३ अंतर्गत २१७०० ते ६९१०० रुपये पर्यंत पगार मिळेल. याशिवाय, मूळ वेतनात २०% स्पेशल सिक्योरिटी अलाउंस आणि सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामासाठी रोख भरपाई दिली जाईल, ज्याची कमाल मर्यादा ३० दिवस असेल. अधिक माहितीसाठी नोकरीसंदर्भातील अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.