सुहास पाटील
आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे अंतर्गत अप्पर आयुक्त कार्यालय, नाशिक/ ठाणे/ अमरावती/नागपूर यांचे आस्थापनेवरील गट-क पदांची सरळसेवा भरती लेखाचा पुढील मजकूर :
(१२) सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian) – ठाणे – १ पद (खुला). पद क्र. ११ व १२ साठी पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र. (ग्रंथपाल पदासाठी ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान २ वर्षांचा ग्रंथालय कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.)
(१३) प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) – नाशिक – ११ पदे, ठाणे – १३ पदे, नागपूर – ५ पदे . पात्रता : १० वी उत्तीर्ण.
(१४) उच्च माध्यमिक शिक्षण सेवक (Teacher Jr. College) (एकत्रित वेतन रु. २०,०००/- दरमहा) – नागपूर – १४ पदे
पात्रता : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि बी.एड्. पदवी किमान द्वितीय वर्गासह उत्तीर्ण.
(१५) प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) ((Primary Teacher ( Medium English)) (एकत्रित वेतन रु. १६,०००/- दरमहा) – नागपूर – ४८ पदे. पात्रता : १ ली ते १२ वीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक. तसेच डी.एड. पदविका इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक.
(१६) प्राथमिक शिक्षण सेवक (माध्यम मराठी) – (एकत्रित वेतन रु. १६,०००/- दरमहा) – नागपूर – २७ पदे पात्रता : १० वी/१२ वी उत्तीर्ण आणि डी.एड्. किंवा समकक्ष अर्हता आणि टीईटी/सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण.
(१७) माध्यमिक शिक्षण सेवक (माध्यम मराठी) – (एकत्रित वेतन रु. १८,०००/- दरमहा) – नागपूर – १५ पदे .
पात्रता : संबंधित विषयातील पदवी आणि बी.एड्. पदवी.
(१८) उच्च श्रेणी लघुलेखक (Stenographer Higher Grade) आयुक्त आदिवासी विकास – नाशिक – ३ पदे.
पात्रता : (अ) १० वी उत्तीर्ण, (ब) ( i) उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) – १२० श.प्र.मि. वेगाची इंग्रजी लघुलेखन शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र, ( ii) उच्च श्रेणी लघुलेखक मराठी – १२० श.प्र.मि. वेगाची मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण. (इंग्रजी व मराठी लघुलेखन १२० श.प्र.मि. असल्यास प्राधान्य), (क) टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि., (ड) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (इ) MS- CIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
(१९) निम्न श्रेणी लघुलेखक ( Stenographer Lower Gradw) – आयुक्त आदिवासी विकास – नाशिक – १३ पदे .
पात्रता : (अ) १० वी उत्तीर्ण, (ब) १०० श.प्र.मि. इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण किंवा १०० श.प्र.मि. मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य), (क) टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि., (ड) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि., (इ) टर- उकळ किंवा समकक्ष संगणक अर्हता (क), (ड) व (इ) वरील अर्हता असणे आवश्यक.
वयोमर्यादा : दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे; मागासवर्गीय/अनाथ – १८ ते ४३ वर्षे.
निवड पद्धती : जिल्ह्याच्या मुख्यालयी सर्व पदांच्या फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा कालावधी दोन तास.
( i) पद क्र. १ ते ५, ७ ते १२, १४ ते १७ साठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येक विषयास ५० गुण, एकूण २०० गुण.
( ii) पद क्र. ६, १८ व १९ साठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येक विषयास २५ गुण, एकूण १०० गुण, वेळ ६० मिनिटे.
( iii) पद क्र. १३ प्रयोगशाळा सहाय्यक – मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान प्रत्येकी ५० गुण, एकूण २०० गुण, वेळ १२० मिनिटे.
वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये उमेदवाराने अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम निवडीसाठी विचारात घेतली जाईल.
परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/-; इतर उमेदवारांसाठी रु. ९००/.
वेतनश्रेणी : पद क्र.१,२,७,८,१९ साठी ए-१४ (रु.३८६००-१२२८००) अंदाजे वेतन रु. ६७०००/- दरमहा
पद क्र ३,४, साठी ए-१३(रु.३५४००-११२४००) अंदाजे वेतनश्रेणीत रु. ६३०००/- दरमहा
पद क्र.५,६,९,१०,११ साठी ए- ८ (२५५००-८११००) अंदाजे वेतन रु.४६०००/-दरमहा.
पद क्र.१३ साठी ए- ६ (१९९००-६३२००) वेतन -३४०००/-दरमहा.
पद क्र.१२ साठी ए- ७ (२१७००-६९१००) अंदाजे वेतन- ३९०००/-दरमहा.
पद क्र. १८ साठी ए-१८ ( ४१८००-१३२३००) अंदाजे वेतन रु. ७४०००/- दरमहा.
शंकासमाधानासाठी https:// cgrs. ibps. In या लिकवर व हेल्पलाईन नं. १८००२२२३६६/१८००१०३४५६६ वर संपर्क साधा.
सदर जाहिरात https:// tribal. maharashtra. gov. inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज https:// ibpsonline. ibps. in/ tdcjunst/ या संकेतस्थळावर दि. १३ डिसेंबर २०२३ (२३.५५ वाजे) पर्यंत करावेत. आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.