● भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड ( BRBNMPL) बंगळुरू (रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पूर्ण मालकीची एक उपकंपनी) येथे डेप्युटी मॅनेजर आणि प्रोसेस असिस्टंट ग्रेड- I (ट्रेनी) पदांची भरती.
(१) प्रोसेस असिस्टंट ग्रेड- I (ट्रेनी) – ६४ (अजा – ९, अज – ४, इमाव – १७, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २८). वेतन – रु. १२ लाख प्रतीवर्ष ( CTC).
पात्रता – ( ३१ ऑगस्ट २०२५ रोजी) डिप्लोमा इन प्रिटिंग/ मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/केमिकल इंजिनीअरिंग किमान सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीण. (अजा/अजसाठी ५० टक्के गुण) आणि प्रिटिंग/प्री-प्रेस अॅक्टिव्हीटीज (प्रिटिंग)/पल्प अँड पेपर/इंक/ पेंटसारख्या इंडस्ट्रीमधील प्रोडक्शन/ मेंटेनन्स कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव किंवा लेटर प्रेस/ऑफसेट/प्लेट मेकिंग/ग्राफिक आर्ट्स/ मेकॅनिक/ फिटर/इलेक्ट्रिशियन/एअर कंडिशनिंग ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण (अजा/अजसाठी ५० टक्के गुण) आणि प्रिटिंग/प्री-प्रेस अॅक्टिव्हिटीज (प्रिटिंग)/पल्प अँड पेपर/इंक /पेंट इंडस्ट्रीमधील प्रोडक्शन/मेंटेनन्स कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव. नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असल्यास प्रशिक्षणाचा कालावधी अनुभव म्हणून समजला जाईल.
(२) डेप्युटी मॅनेजर (पोस्ट कोड-१) प्रिटिंग इंजिनीअरिंग बॅकग्राऊंड – १० (अजा – १, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).
डेप्युटी मॅनेजर पदांसाठी वेतन – रु. १९ लाख प्रतीवर्ष ( CTC).
पात्रता – प्रिटिंग टेक्नॉलॉजी/प्रिटिंग इंजिनीअरिंग पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण (अजा/अजसाठी ५५ टक्के गुण) आणि प्रिटिंग इंडस्ट्रीमधील कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(३) डेप्युटी मॅनेजर (पोस्ट कोड-२) ३ (अजा – १, खुला – २).
पात्रता – बी.ई./बी.टेक./ AMIE (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण (अजा/ अजसाठी ५५ टक्के गुण) आणि इंडस्ट्रीमधील संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव शक्यतो सब-स्टेशन्समधील HT/ LT स्विचगिअर्स आणि ट्रबलशूटिंग कामाचा अनुभव असावा.
(४) डेप्युटी मॅनेजर (पोस्ट कोड-३) २ (खुला).
पात्रता – फक्त कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग पदवीधर पात्र आहेत आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा सॉफ्टवेअर मेंटेनन्स किंवा सॉफ्टवेअर अपग्रेडेशन कामाचा CMMI लेव्हल-५ ऑर्गनायझेशनमधील किमान २ वर्षांचा अनुभव.
(५) डेप्युटी मॅनेजर (पोस्ट कोड-४) ९ (अजा – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).
पात्रता – पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण (अजा/अजसाठी ५५ टक्के गुण) आणि मॅनेजमेंट/ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन/पर्सोनेल मॅनेजमेंट/मटेरियल्स मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी किंवा समतूल्य पदविका आणि प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधील कामाचा सरासरी २ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – ( ३१ ऑगस्ट २०२५ रोजी) पद क्र. १ १८ ते २८ वर्षे; पद क्र. २ ते ५ ३१ वर्षे
निवड पद्धती – पद क्र. प्रोसेस असिस्टंट – ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह लेखी परीक्षा (रिझनिंग, न्यूमरिकल अॅबिलिटी, जनरल सायन्स (फिजिक्स अँड केमिस्ट्री १० वीच्या स्तरावरील) आणि जनरल नॉलेज) आणि स्किल टेस्ट (पात्रता स्वरूपाची).
चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जात नाहीत.
निवास व्यवस्था – निवडलेल्या उमेदवारांना क्वार्टर्स मिळू शकतात.
लेखी परीक्षा केंद्र – मुंबई/नवी मुंबई/ग्रेटर मुंबई/ठाणे, रायपूर, भोपाळ इ.
कॉल लेटर – ऑनलाइन टेस्टसाठी कॉल लेटर www. brbnmpl. co. in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.
अर्जाचे शुल्क – प्रोसेस असिस्टंट ग्रेड- I साठी रु. ४००/-. पद क्र. २ ते ५ साठी रु. ६००/-. (अजा/ अज/अपंग/ महिला/माजी सैनिक यांना फी माफ आहे.)
लेखी परीक्षा अंदाजे सप्टेंबर/ ऑक्टोबर २०२५ मध्ये आयोजित केली जाईल. परीक्षेची नेमकी तारीख नंतर ई-मेल/ SMS द्वारा कळविण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज www. brbnmpl. co. in या संकेतस्थळावर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत करावेत.