● बँक ऑफ बडोदामध्ये लोकल बँक ऑफिसर्स पदांची थेट भरती. असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, एव्हीपी इ. पदांची ५ वर्षांच्या मुदतीकरिता करार पद्धतीने भरती. उमेदवारांची कामगिरी पाहून कराराचा कालावधी आणखी ५ वर्षांनी वाढविला जाऊ शकतो.
एकूण रिक्त पदे – ३३०.
पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर – MSME Sales – ३०० पदे (अजा – ४५, अज – २२, इमाव – ८१, ईडब्ल्यूएस – ३०, खुला – १२२).
पात्रता – (१ जुलै २०२५ रोजी) पदवी (कोणत्याही शाखेतील). पदव्युत्तर पदवी/एमबीए/पीजीडीएम पात्रता असल्यास प्राधान्य. MSME फिनान्स किंवा IIBF, NISM यांचेकडील क्रेडिट संबंधित प्रोग्राम्समधील सर्टिफिकेशन.
अनुभव – असेट सेल्स कामाचा शक्यतो बँकमधील किंवा NBFCs किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूटमधील २ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – (१ जुलै २०२५ रोजी) २२-३२ वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, अपंग – १०/१३/१५ वर्षे).
वेतन श्रेणी – उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, शेवटचे मिळालेले वेतन इ. गोष्टी पाहून वेतन ठरविले जाईल.
निवड पद्धती – शैक्षणिक अर्हता, अनुभव इ. पाहून उमेदवार इंटरव्ह्यू किंवा इतर निवड प्रक्रियेसाठी निवडले जातील.
जीएसटीसह अर्जाचे शुल्क – अजा/अज/अपंग/माजी सैनिक/महिला – रु. १७५/- आणि इतरांसाठी रु. ८५०/-.
नेमणुकीचे ठिकाण – निवडलेल्या उमेदवारांना देशभरातील बँकेच्या कोणत्याही ऑफिस/ब्रँचेसमध्ये नेमणूक दिली जाईल.
पदनिहाय कामाचे स्वरूप बँकेच्या वेबसाईटवरील जाहिरातीमधील Annexure- I मध्ये उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज www. bankofbaroda. co. in या संकेतस्थळावरील Career Section/ Web page gt; Current opportunities लिंकमधून १९ ऑगस्ट २०२५ पर्यंत करावेत.
इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिसेस पदे
● इंडियन ओव्हरसीज बँक ( IOB) (भारत सरकारचा उपक्रम) अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत अॅप्रेंटिसेसची सन २०२५-२६ करिता भरती.
एकूण पदे – ७५०. महाराष्ट्रातील रिक्त पदे – ८५ (अजा – ७, अज – १२, इमाव – २८, ईडब्ल्यूएस – ६, खुला – ३२ (६ पदे अपंग कॅटेगरी OC – २, VI – १, LD – २, HI – १ साठी राखीव)). गोवा राज्यातील पदे – १ (अज). पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. पदवी परीक्षा १ एप्रिल २०२१ ते १ ऑगस्ट २०२५ दरम्यान उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा – ( १ ऑगस्ट २०२५ रोजी) २० ते २८ वर्षे. (उमेदवाराचा जन्म १ ऑगस्ट १९९७ ते १ ऑगस्ट २००५ दरम्यानचा असावा.)
अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षाचा असेल. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना दरमहा अर्धनागरी/ग्रामीण भागातील बँकांसाठी – रु. १०,०००/-, अर्बन भागासाठी रु. १२,०००/-, मेट्रो सिटीजसाठी रु. १५,०००/- विद्यावेतन दिला जाईल.
निवड पद्धती – ( i) ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाइप लेखी परीक्षा (१) जनरल फिनान्शियल अवेअरनेस, (२) जनरल इंग्लिश, (३) क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग अॅप्टिट्यूड, (४) कॉम्प्युटर किंवा विषयाचे नॉलेज. प्रत्येकी २५ प्रश्न, २५ गुण, एकूण १०० प्रश्न, वेळ ९० मिनिटे. निवड प्रक्रियेविषयी विस्तृत माहिती उमेदवारांना ‘ Information Handout’ मधून, पात्र उमेदवारांना BFSI SSC यांचेमार्फत ई-मेलद्वारा दिली जाईल.
उमेदवारांना नेमून दिलेल्या दिवशी व वेळी स्वत:चा कॅमेरा असलेला डेस्कटॉप किंवा लॅपटॉप किंवा टॅबलेट किंवा स्मार्ट फोन वापरून ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल.
( ii) टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज – उमेदवारांनी ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज केला आहे त्या राज्यातील ज्या स्थानिय भाषेची निवड केली आहे, त्याची परीक्षा द्यावी लागेल.
उमेदवारांना NATS पोर्टल https:// nats. education. gov. in ( Student Register/ Student Login वर आपले नाव रजिस्टर करावे लागेल. ‘ Enrolment ID’ ( NATS पोर्टलने जारी केलेला) ऑनलाइन अर्ज करताना भरावयाचा आहे.
अर्जाचे शुल्क – खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस – रु. ८००/-. (अजा/अज/महिला उमेदवारांना रु. ६००/- आहे.) अपंग उमेदवारांना रु. ४००/-. याशिवाय उमेदवारांना अर्जाच्या शुल्कावर १८ टक्के जीएसटी भरावा लागेल. परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्याचा अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०२५ आहे.
विस्तृत माहिती www. iob. in किंवा www. bfsissc. com या वेबसाईटवरील Careers Section मध्ये उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज www. bfsissc. com या संकेतस्थळावर करण्याचा अंतिम दि. २० ऑगस्ट २०२५.