West Central Railway Recruitment 2024 : रेल्वे विभागात काम करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे पश्चिम मध्य रेल्वे (WCR) अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या ३ हजारांहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी रेल्वेने भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२४ ही आहे. पश्चिम मध्य रेल्वे भरती २०२४ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पश्चिम मध्य रेल्वे भरती २०२४ –

Map , Akola district, human chain,
मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा
Indian Railway Recruitment 2024 RRB RPF Notification 2024
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी रेल्वे विभागाकडून मेगा भरती, कुठे करायचा अर्ज? पगार किती? जाणून घ्या
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
SECR Recruitment 2024 jobs at railway
SECR Recruitment 2024 : रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी मोठ्या संख्येने होणार भरती! अधिक माहिती पाहा

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी).

पश्चिम मध्य रेल्वे भरती अंतर्गत एकूण ३०१५ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

या भरतीसाठी उमेदवार ५० टक्के गुणांसह १० वी पास असावा तसेच त्याने संबंधित ट्रेडमध्ये ITI केलेला असणं गरजेचं आहे.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १५ ते २४ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

भरतीसाठी पुढीलप्रमाने अर्ज फी असणार आहे.

  • खुला/ ओबीसी प्रवर्ग – १३६ रुपये.
  • मागासवर्गीय/ महिला/ PWD – ३६ रुपये.

नोकरीचे ठिकाण – पश्चिम-मध्य रेल्वे.

अधिकृत बेवसाईट –

https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2023/

हेही वाचा –

हेही वाचा – पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभागात ‘या’ पदांसाठी भरती सुरु

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १५ डिसेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जानेवारी २०२४

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1K5oFe-hOSfsezYHoy8hnJwP7rqvsmv7B/view