सुहास पाटील

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/ कोकण/ नागपूर/नाशिक/ औरंगाबाद/ अमरावती विभागातील ‘शिपाई (गट-ड)’ संवर्गातील पदांची भरती. एकूण रिक्त पदे – १२५. (जाहिरात क्र. ०२/२०२३)

BJP Maharashtra To Be Washed Out NDA TO Loose In More Than 10 States
महाराष्ट्रासह ‘या’ १० राज्यांत भाजपाचा धुव्वा उडवणार इंडिया आघाडी? सर्वेक्षणातील माहितीत ‘ही’ मोठी चूक
Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
mva press conference seat sharing for loksabha election 2024
सांगलीची जागा अखेर काँग्रेसनं सोडली; महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर, पाहा कोण कुठून निवडणूक लढवणार?
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर

वेतन श्रेणी : एस-१, रु. १५,००० – ४७,६०० अधिक इतर भत्ते.

सहसंचालक नगर रचना विभागानुसार रिक्त पदांचा तपशील –

(१) कोकण विभाग, नवी मुंबई : २८ पदे. (अजा – ३, अज – २, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, भज-ड – १, इमाव – ६, विमाप्र – १, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ९) महिला – ८ पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३); दिव्यांग – १ पद (अंध/अल्पदृष्टी); अंशकालीन – २ पदे (इमाव – १, खुला – १); माजी सैनिक – २ पदे (इमाव – १, खुला – १).

हेही वाचा >>> ‘या’ उमेदवरांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

(२) पुणे विभाग : ४८ पदे (अजा – ७, अज – २, विजा-अ – २, भज-ब – २, भज-क – ३, भज-ड – १, इमाव – १०, ईडब्ल्यूएस – ५, खुला – १६) महिला – १६ पदे (अजा – २, अज – १, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – २, खुला – ५); दिव्यांग – २ (कर्णबधिरता/ दुर्बलता – १, अस्थिव्यंगता – १); खेळाडू – २ (इमाव – १, खुला – १); अंशकालीन – ५ (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २); माजी सैनिक – ६ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).

(३) नाशिक विभाग : ९ पदे (विजा-अ – १, भज-क – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५) महिला – १ (खुला); माजी सैनिक – १ (खुला).

(४) औरंगाबाद विभाग, संभाजीनगर : ११ पदे (अजा – ४, अज – १, भज-ब – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १) महिला – २ (अजा – १, इमाव – १); माजी सैनिक – २ (अजा – १, इमाव – १).

(५) अमरावती विभाग : १० पदे (अजा – १, अज – १, भज-ब – १, भज-ड – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – २, खुला – २) महिला – ३ (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).

(६) नागपूर विभाग : १९ पदे (अजा – २, अज – १, विजा-अ – १, भज-क – १, भज-ड – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ७) महिला – ५ (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २); दिव्यांग – १ (अंध/ अल्पदृष्टी); अंशकालीन – १ (खुला); माजी सैनिक – ३ (इमाव – १, खुला – २).

पात्रता : (दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी) १० वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : (अर्ज करण्याच्या दिनांकास) खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे. (मागासवर्गीय/खेळाडू/ ईडब्ल्यूएस/ भूकंपग्रस्त/ प्रकल्पग्रस्त – १८ ते ४३ वर्षे, दिव्यांग – १८ ते ४५ वर्षे)

अर्ज स्वीकारण्याची पद्धत, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या इ. बाबतचा तपशील http://www.urban.maharashtra.gov.in व  www.dtp.maharashtra.gov.in व  http://ese.mah.nic.In या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

निवड पद्धती : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाइन लेखी परीक्षा एकूण २०० गुण (मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. प्रत्येकी २५ प्रश्न, प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण) कालावधी २ तास. अभ्यासक्रम जाहिरातीमधील परिशिष्ठ – २ मध्ये दिलेला आहे. परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धत अवलंबली जाणार नाही.

हेही वाचा >>> इंजिनीअर्सना नोकरीची सुवर्णसंधी! नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत ‘या’ पदाच्या ४९५ जागांसाठी भरती सुरु

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु. १,०००/-, राखीव प्रवर्ग – रु. ९००/-. माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

परीक्षा केंद्र : संबंधित विभागातील विविध जिह्यांमध्ये परीक्षा आयोजित केली जाईल. ऑनलाइन अर्ज  http://www.urban.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील  https://cdnt.digalm.com/ EForms/configuredHtml/32513/85399/Index.html  या लिकमधून दि. २० ऑक्टोबर २०२३ (२३.५५ वाजे) पर्यंत करावेत. (नोंदणी/ नवीन खाते निर्माण करणे -; अर्ज सादरीकरण-; प्रोफाईल निर्मिती/ प्रोफाईल अद्ययावत करणे-; छायाचित्र आणि स्वाक्षरी तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे/ अन्य प्रमाणपत्रे अपलोड करणे-; ऑनलाइन परीक्षा शुल्क भरणे -) शंकासमाधानासाठी हेल्प डेस्क नंबर ७३५३९ ४४४३६ (सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत).

जीपी पारसिक सहकारी बँक लिमिटेड (GP Parsik) (मल्टि स्टेट शेल्डय़ूल्ड बँक) आपल्या महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील ब्रँचेसमध्ये ‘ज्युनियर ऑफिसर (ट्रेनी)’ पदांची भरती करणार आहे.

पात्रता :  B. Com./  BBI/  BFM/  BMS/  BAF –  CGPI v किंवा ग्रेड  ड,  अ,  अ,  इ ,  इ,  उ सह उत्तीर्ण (मुंबई विद्यापीठाकडील), किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण (पुणे विद्यापीठ).

B. Sc. ( IT)  CGPI-y आणि अधिक किंवा ग्रेड  ड,  अ,  अ  सह उत्तीर्ण (मुंबई विद्यापीठ), किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण (पुणे विद्यापीठ).

अनुभव : फ्रेशर्स अर्ज करू शकतात किंवा १-२ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा : दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी ३० वर्षेपर्यंत.

निवड पद्धती : ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट २०० गुणांसाठी. (१) रिझिनग – वेळ ३५ मिनिटे, (२) इंग्लिश लँग्वेज – वेळ २० मिनिटे, (३) न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी – वेळ ३५ मिनिटे, (४) जनरल अवेअरनेस (बँकिंगच्या विशेष संदर्भात) – वेळ २५ मिनिटे, (५) कॉम्प्युटर नॉलेज – वेळ २५ मिनिटे. प्रत्येक विषयाला ४० प्रश्न, एकूण २०० प्रश्न, २०० गुण, एकूण वेळ १४० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. परीक्षा केंद्र : मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे यापैकी एक निवडावा लागेल. अर्जाचे शुल्क : रु. ७००/- अधिक जीएसटी.

परीक्षेसाठी कॉल लेटर परीक्षेच्या ७ ते १० दिवस अगोदर डाऊनलोड करता येतील. दोन स्टेजेसमध्ये कटऑफ लागू केला जाईल. (्र) प्रत्येक टेस्ट स्कोअरसाठी वेगवेगळा, (्र) एकूण स्कोअरसाठी.

ऑनलाइन अर्ज करण्याची माहिती विस्तृतपणे जाहिरातीमधील ‘ऌ६ ३ अस्र्स्र्’८’ या सेक्शनमध्ये दिली आहे.

ऑनलाइन अर्जासोबत (१) रंगीत फोटोग्राफ (४.५  x ३.५  cm), (2) सिग्नेचर (with black ink), (3)  Left hand thumb impression ( on a white paper with blank ink), (4)  A hand written declaration ( on a white poaper with black ink) जाहिरातीच्या  Annexure- III मध्ये दिलेल्या स्पेसिफिकेशन्समध्ये स्कॅन करून अपलोड करावीत.

The text for the hand written declaration : ‘ I, __________ ( Name of the canddidate),  hereby declare that all the information submitted by me in the application form is correct,  true and valid.  I will present the supporting documents as and when required.l

ऑनलाइन अर्ज बँकेच्या ‘Career’ वेबसाईट  https:// gpparsikbank. com/ jobs- and- career. html मधून दि. १३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत करावेत.

(A- Application Registration,B- Payment of Fees, C- Document Scan and Upload)

पोलीस पाटील पदभरती – २०२३. जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे अंतर्गत उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये पोलीस पाटील पदांची भरती. एकूण रिक्त पदे – १२९. धुळे जिल्ह्यातील तालुकानिहाय कोणत्या गावासाठी कोणत्या संवर्गातील रिक्त पदे – आरक्षित आहेत, याचा तपशील  https://ppdhule.mahabharti.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

उपविभागनिहाय पोलीस पाटील पदांचा तपशील –

(१) धुळे उपविभाग – ७७ पदे.

( i) धुळे तालुका – २९ पदे. ( ii) साक्री तालुका – ४८ पदे.

(२) शिरपूर उपविभाग – ५२ पदे.

(i) शिरपूर तालुका – २८ पदे. ( ii) शिंदखेडा तालुका – ३४ पदे.

पात्रता : दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण.

वयोमर्यादा : (दि. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी) २५ पेक्षा कमी नसावे व ४५ पेक्षा जास्त नसावे.

अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असावा. (अर्जदाराने शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, इतर ओळखपत्र, स्वयंघोषणापत्र किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिद्ध होते अशा कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक.)

अर्जदाराने अर्जामध्ये स्वत:चा ई-मेल व मोबाइल नंबर नमूद करणे अनिवार्य.

अर्जदार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक.

अर्जदार याची अर्हता दिनांकास दोनपेक्षा जास्त अपत्य नसावीत.

मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरिता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकाऱ्याने जारी (निर्गमित) केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.

इमाव, विमाप्र, विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड या प्रवर्गातील अर्जदार यांनी भरती कालावधीकरिता वैध असलेले उन्नत आणि प्रगत गटात यामध्ये मोडत नसल्याचे (नॉन-क्रिमी लेयर) प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.

निवड पद्धती : लेखी परीक्षा – ८० गुण, तोंडी परीक्षा – २० गुण, एकूण १०० गुण. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण ८० गुण. लेखी परीक्षा १० वीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यात सामान्यज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इ. विषयांचा समावेश असेल. लेखी परीक्षेत किमान ३६ गुण (४५ टक्के) प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या पर्याप्त प्रमाणातील अर्जदारांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल.

लेखी परीक्षेसाठी उत्तरे लिहिण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळय़ा शाईचा बॉलपेन वापरावा.

ऑनलाइन अर्ज करताना शैक्षणिक अर्हता कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे, विहीत नमुन्यातील पासपोर्ट आकाराचा फोटो व सही स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु. ४००/-; आरक्षित/आर्थिक घटक प्रवर्गासाठी रु. ३००/-.

ऑनलाइन अर्ज https://ppdhule.mahabharti.com या संकेतस्थळावर दि. १५ ऑक्टोबर २०२३ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत. suhassitaram@yahoo.com