● भारतीय नौदल (संरक्षण मंत्रालय, भारत सरकार) वेस्टर्न नेव्हल कमांड ( WNC) मुंबई, ईस्टर्न नेव्हल कमांड ( ENC) विशाखापट्टणम्, सदर्न नेव्हल कमांड ( SNC) कोची, अंदमान-निकोबार कमांड ( anc) पोर्ट ब्लेअर या नेव्हल कमांड मुख्यालयांतर्गत जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप-बी आणि ग्रुप-सीमधील पदांच्या भरतीकरिता इंडियन नेव्ही सिव्हिलियन एन्ट्रन्स टेस्ट INCET – ०१/२०२५ घेणार आहे. एकूण रिक्त पदे – १,०९७.
( I) ग्रुप-सी मधील रिक्त पदांचा तपशील –
(१) फायरमन – एकूण ९० पदे – एकूण ९० पदे ( ANC – २३, SNC – ३, WNC – ६४ पदे) (अजा – १५, अज – ६, इमाव – १८, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ४३).
पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेकडील फायर फायटींग कोर्स.
(२) फायर इंजिन ड्रायव्हर – १४ पदे ( WNC – १४ पदे) (अजा – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ९) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव)
पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन ( HMV) चालविण्याचा परवाना.
शारीरिक मापदंड आणि सहनशक्ती चाचणीचे निकष पद क्र. १ (फायरमन) प्रमाणे.
(३) ट्रेड्समन मेट – २०७ पदे ( SNC – १३ पदे, WNC – १९४ पदे) .
पात्रता – ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट.
(४) ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) – २ पदे (अजा – १, खुला – १). (५) पेस्ट कंट्रोल वर्कर – ५३ पदे ( ENC – ७२; WNC – ४६) (अजा – ८, अज – २, इमाव – १४, ईडब्ल्यूएस – ५, खुला – २४) (३ पदे माजी सैनिकांसाठी राखीव) (१ पद दिव्यांग कॅटेगरी VH साठी राखीव).
पात्रता – ( i) १० वी उत्तीर्ण आणि हिंदी किंवा स्थानिय भाषा उमेदवारास अवगत असावी.
(६) मल्टि टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रीयल) – ९४ ( ENC – ७२ पदे, WNC – २२ पदे (अजा – ८, अज – ३, इमाव – ९, ईडब्ल्यूएस् – ९, खुला – ६५) (४ पदे दिव्यांग कॅटेगरी OH – १, VH – १, HH – २ साठी राखीव).
(७) मल्टि टास्कींग स्टाफ (नॉन-इंडस्ट्रियल)/वॉर्ड सहायक – ८१ पदे ( ENC – २, SNC – ४, ANC – १, WNC – ७४ (अजा – १३, अज – ५, इमाव – १९, ईडब्ल्यूएस – ७, खुला – ३७) (७ पदे माजी सैनिकांसाठी राखीव) (दिव्यांग कॅटेगरी VH, HH, OH साठी प्रत्येकी १ पद राखीव).
पात्रता – ( i) १० वी उत्तीर्ण किंवा ( ii) आय्टीआय ट्रेड सर्टिफिकेट.
(८) मल्टि टास्कींग स्टाफ (नॉन-इंडस्ट्रियल/ड्रेसर) – २ पदे ( WNC – १, SNC – १).
(९) मल्टि टास्कींग स्टाफ (नॉन-इंडस्ट्रियल/धोबी) – ४ पदे ( WNC).
(१०) मल्टि टास्कींग स्टाफ (नॉन-इंडस्ट्रियल/माळी) – ५ पदे ( SNC).
(११) मल्टि टास्कींग स्टाफ (नॉन-इंडस्ट्रियल/बार्बर) – ४ पदे ( ENC).
पद क्र. ७ ते ११ साठी पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील प्राविण्य.
( II) ग्रुप-बी मधील रिक्त पदांचा तपशिल –
(१२) स्टाफ नर्स – १ पद ( WNC – १) (खुला).
(१३) चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप) – ८ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).
(१४) चार्जमन (इलेक्ट्रिकल) – १९ पदे ( ENC – ५, WNC – १४) (इमाव – ४, खुला – १०) (१ पद दिव्यांग कॅटेगरी OH साठी राखीव).
पात्रता – बी.एस्सी. (फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा मॅथेमॅटिक्स) विषयांसह उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा.
(१५) चार्जमन (मेकॅनिक) – ४९ पदे (अजा – ५, अज – ३, इमाव – १६, ईडब्ल्यूएस – ४, खुला – २१) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी OH साठी राखीव).
पात्रता – मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन इंजिनिअरींग डिप्लोमा आणि क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अॅश्युरन्स टेस्टींग, प्रोडक्शन ऑफ इंजिनीअरिंग इक्विपमेंट्स कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(१६) चार्जमन (नेव्हल एव्हिएशन) – १ पद (१७) चार्जमन (अॅम्युनिशन अँड एक्स्प्लोझिव्ह) – ५३ पदे (अजा – ३, अज – ५, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – १४, खुला – २३)
(१८) चार्जमन (इलेक्ट्रॉनिक्स अँड गायरो ( Gyro)) – ५ पदे ( ENC – १, WNC – ४ (अजा – १, अज – १, खुला – २).
(१९) चार्जमन (व्हेपन इलेक्ट्रॉनिक्स) – ५ पदे .
पद क्र. १८ व १९ साठी पात्रता – बी.एससी. (फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा मॅथेमॅटिक्स) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/कम्युनिकेशन इंजिनीअरिंग डिप्लोमा.
(२०) चार्जमन (इन्स्ट्रूमेंट) – २ पदे ( ENC – १, WNC – १) (खुला).
(२१) चार्जमन (मेकॅनिकल) – ११ पदे ( ENC – ४, WNC – ७ (अजा – १, अज – १, इमाव – १, खुला – ४) (१ पद दिव्यांग कॅटेगरी OH साठी राखीव).
(२२) चार्जमन (हिट इंजिन) – ७ पदे ( ENC – २, WNC – ५ (अजा – १, अज – १, खुला – ३).
(२३) चार्जमन (मेकॅनिकल सिस्टीम) – ४ पदे ( ENC – १, WNC – ३ (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).
(२४) चार्जमन (मेटल) – २१ पदे ( SNC – १, ENC – ७, WNC – १३ (अजा – ३, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – २, खुला – ५) (१ पद दिव्यांग कॅटेगरी HH साठी राखीव).
(२५) चार्जमन (मिलराईट) – ५ पदे ( ENC – २, WNC – ३ (अजा – १, खुला – २).
(२६) चार्जमन (अॅक्झिलरी) – ३ पदे ( ENC – १, WNC – २ (ईडब्ल्यूएस – १, खुला – १).
(२७) चार्जमन (मशिन) (मेकॅनिकल) – ११ पदे ( ENC – ४, WNC – ७ (अजा – १, अज – १, इमाव -१, खुला – ४).
पद क्र. २१ ते २७ साठी पात्रता – बी.एससी. (फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा मॅथेमॅटिक्स) किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा.
(२८) चार्जमन (शिप बिल्डींग) – ११ पदे ( ENC – ३, WNC – ८ (अजा – २, इमाव – २, ईडब्ल्यूएस – २, खुला – २).
(२९) चार्जमन (रेफ्रि. अँड ए.सी.) – ४ पदे.
(३०) चार्जमन (मेकॅट्रॉनिक्स) – १ पद ( WNC) (खुला).
(३१) चार्जमन (सिव्हील वर्क्स) – ३ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).
(३२) चार्जमन (प्लानिंग, प्रोडक्शन अँड कंट्रोल) – १३ पदे
(३३) असिस्टंट आर्टिस्ट रिटचर – २ पदे ( WNC) (ईडब्ल्यूएस – १, खुला – १).
(३४) फार्मासिस्ट – ६ पदे ( ANC – १, SNC – १, WNC – ४ (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).
(३५) कॅमेरामन – १ पद ( WNC NHO डेहराडून).
(३६) स्टोअर सुपरिटेंडंट (आर्मामेंट) – ८ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).
(३७) स्टोअर किपर/स्टोअर किपर (आर्मामेंट) – १७६ पदे (अजा – २६, अज – १३, इमाव – ४७, ईडब्ल्यूएस – १८, खुला – ७२) (१७ पदे माजी सैनिकांसाठी राखीव) (७ पदे दिव्यांग कॅटेगरी VH – २, HH – २, OH – २, Others – १ साठी राखीव).
पात्रता – १२ वी आणि स्टोअर्समधील इन्व्हेंटरी कामाचा एक वर्षाचा अनुभव.
(३८) सिव्हीलियन मोटर ड्रायव्हर (ऑर्डिनरी ग्रेड) – ११७ पदे ( ANC – ७, SNC – २, ENC – ७६, WNC – ३२ (अजा – ४, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १५) (३ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).
(३९) पेस्ट कंट्रोल वर्कर – ५३ पदे ( ANC – ६, SNC – १, WNC – ४६ (अजा – ७, अज – २, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ४, खुला – २१)
(४१) लेडी हेल्थ व्हिजिटर – १ पद ( WNC) (खुला).
अर्जाचे शुल्क – रु. २९५/-.
हेल्पडेस्क नं. ९३६१३२६१६०.
ऑनलाइन अर्ज www. joinindiannavy. gov. in या संकेतस्थळावर १८ जुलै २०२५ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.
suhaspatil237 @gmail. com