सुहास पाटील

आर्मी सर्व्हिस कॉर्प्स ( ASC) सेंटर (साऊथ) अग्राम पोस्ट, बंगळूरु – ०७ (भारत सरकार, संरक्षण मंत्रालय) (इंडियन आर्मीची सर्वात जुनी व सर्वात मोठी प्रशासकीय सेवा) मध्ये पुढील ७१ सिव्हिलियन पदांची भरती. रिक्त पदांचा तपशील –

( I) ASC सेंटर (साऊथ) – २ ATC – एकूण ७१ पदे.

(१) कुक (फक्त पुरुष) – ३ पदे (अज) (माजी सैनिकांसाठी राखीव) (अज/ इमावसाठी प्रत्येकी १ पद).

(२) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर (फक्त पुरुष) – ३ पदे (अजा – १, ईडब्ल्यूएस – २) (१ पद माजी सैनिक (अजा) साठी राखीव).

(३) MTS (चौकीदार) (फक्त पुरुष) – २ पदे (अज – २, माजी सैनिकांसाठी राखीव).

(४) ट्रेड्समन मेट (लेबर) – ८ पदे (अज – ५, ईडब्ल्यूएस – ३) (माजी सैनिकांसाठी राखीव).

(५) वेहिकल मेकॅनिक (फक्त पुरुष) – १ पद (इमाव) (माजी सैनिकांसाठी राखीव).

(६) सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर (फक्त पुरुष) – ९ पदे (अज – ५, इमाव – १, ईडब्ल्यूएस – ३) (सर्व पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

(७) क्लिनर (फक्त पुरुष) – ४ पदे (अज – २, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १) (सर्व पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

(८) लिडींग फायरमन – १ पद (इमाव).

(९) फायरमन (फक्त पुरुष) – ३० पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १५).

(१०) फायर इंजिन ड्रायव्हर (फक्त पुरुष) – १० पदे (अजा – ३, अज – २, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).

पात्रता – पद क्र. १, ३, ४ व ७ साठी ( i) १० वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, ( ii) संबंधित कामातील प्रावीण्य. (पद क्र. १ (कुक) साठी इष्ट पात्रता ( desirables) संबंधित ट्रेडमधील कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.)

पद क्र. २ (सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर) पात्रता – ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) मान्यताप्राप्त संख्येकडील कॅटरिंगमधील डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट. इष्ट पात्रता – कॅटरिंग इन्स्ट्रक्टर कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.

पद क्र. ६ – सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर – ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) LMV आणि HMV ड्रायव्हिंग लायसन्स, ( iii) मोटर वेहिकल ड्रायव्हिंगचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

पद क्र. ५ वेहिकल मेकॅनिक – (i) १० वी उत्तीर्ण, ( ii) साधने (Tools) आणि गाड्यांवरील नंबर आणि नावे इंग्रजी आणि हिंदी भाषेत वाचता येणे आवश्यक, ( iii) संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.

पद क्र. ८ लिडींग फायरमन व पद क्र. १० फायर इंजिन ड्रायव्हर पदांसाठी पात्रता – ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) फायरमनच्या कामाशी अवगत असावा. फायर फायटिंग उपकरणं, वेगवेगळ्या प्रकारच्या फायर फायटिंग पद्धतीची माहिती आणि ज्ञान असावे. फायरमन कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य. फायर इंजिन ड्रायव्हर पदांसाठी ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

शारीरिक मापदंड – (पद क्र. ४) ट्रेड्समन मेट (लेबर), पद क्र. ८, ९ व १० साठी उंची १६५ सें.मी. (अज उमेदवारांसाठी १६२.५ सें.मी.), छाती – ८१.५ ते ८५ सें.मी., वजन – किमान ५० कि.ग्रॅ.

शारीरिक क्षमता चाचणी (स्किल टेस्ट) – (पद क्र. ८ ते १०) (अ) ६५.५ कि.ग्रॅ. वजनाचा माणूस (Fireman Lift) पद्धतीने उचलून १८३ मीटरचे अंतर ९६ सेकंदांत पार करणे. (ब) २.७ मीटर लांबीचा खंदक ( ditch) लांब उडी मारून ओलांडणे. (दोन्ही पायांनी लँडिंग करणे आवश्यक.) (क) ३ मीटर उंचीच्या दोरावर हातापायाचा वापर करून चढणे.

पद क्र. ४ ट्रेड्समन मेट (लेबर) पदांसाठी शारीरिक क्षमता चाचणी (PET) (अ) १.५ कि.मी. अंतर ६ मिनिटांत धावणे. (माजी सैनिक – ४० वर्षांखालील – ७ मि. ११ सेकंद, ४०-४५ वर्षे – ७ मि. ४८ सेकंद आणि ४५ वर्षांवरील ९ मि. २२ सेकंद) (ब) ५० कि.ग्रॅ. वजन उचलून २०० मीटर अंतर १०० सेकंदांत (माजी सैनिक – ४० वर्षांखालील १२० सेकंदांत, ४०-४५ वर्षे – १३० सेकंद आणि ४५ वर्षांवरील १६० सेकंदांत) पार करणे.

उर्वरित भाग उद्याच्या अंकात

वयोमर्यादा – (दि. १२ मे २०२३ रोजी) सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर पदासाठी १८ ते २७ वर्षे, इतर पदांसाठी १८ ते २५ वर्षे.

कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे, माजी सैनिक – सैन्य दलातील सेवाकाल ३ वर्षे.

वेतन – पद क्र. ३ MTS (चौकीदार), पद क्र. ४ ट्रेड्समन मेट, पद क्र. ७ क्लिनर पदांसाठी वेतनश्रेणी – १ रु. १८,०००/- अधिक रु. ८,२८०/- महागाई भत्ता अधिक इतर भत्ते.

पद क्र. २, ५, ६ व ९ साठी पे-लेव्हल – २ रु. १९,९०० अधिक रु. ९,१५४/- महागाई भत्ता अधिक इतर भत्ते.

पद क्र. १४ फायर इंजिन ड्रायव्हर पदांसाठी वेतन श्रेणी-३ रु. २१,७०० अधिक रु. ९,९८२/- महागाई भत्ता अधिक इतर भत्ते.

पद क्र. ८ ते १० साठी दिव्यांग उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र नाहीत.

निवड पद्धती – सर्व पदांसाठी उमेदवारांना टेक्निकल ट्रेड टेस्ट, फिजिकल टेस्ट (लागू असल्यास) उत्तीर्ण केल्यास लेखी परीक्षा द्यावी लागेल. ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा ( MCQ) (१) जनरल इंटेलिजन्स अॅण्ड रिझनिंग २५ प्रश्न, (२) जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न, (३) जनरल इंग्लिश – ५० प्रश्न, (४) न्यूमरिकल अॅप्टिट्यूड – २५ प्रश्न. प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण १५० प्रश्न, १५० गुण, वेळ २ तास. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. प्रश्नपत्रिका हिंदी/ इंग्रजी भाषेत असेल.

अर्जाचा नमुना आणि परीक्षेचा अभ्यासक्रम एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १३-१९ जानेवारी २०२४ च्या अंकातील विस्तृत जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

अर्जाच्या लिफाफ्यावर काय लिहावयाचे आहे, त्याचा नमुना (Format) जाहिरातीमधील ’ Appendix- Il मध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये दिल्याप्रमाणे विचारलेली माहिती लिहावयाची आहे.

१० वीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी नमूद केलेल्या रंगाच्या शाईने लिहाव्यात जसे की, ५० टक्क्यां पेक्षा कमी गुण असल्यास लाल रंगाच्या शाईने ५१-६० टक्के दरम्यानचे गुण असल्यास निळ्या रंगाच्या शाईने आणि ६१ टक्के आणि जास्त असल्यास काळ्या रंगाच्या शाईने लिहावे.

काढताना पुढील सूत्र वापरावीत.

i) परीक्षेत मिळालेले गुण परीक्षेसाठी असलेले एकूण गुण गुणिले १०० बरोबर गुणांचे टक्के

ii) CGPA करिता CGPA गुणिले ९.५ टक्के

iii) ग्रेडिंगकरिता ग्रेड अ बरोबर ९० – १०० टक्के मधील कमीत कमी गुण (९० टक्के) धरले जातील.

टक्केवारी लिहिताना आलेल्या ०.५ decimal point पेक्षा कमी असल्यास मागील अंक पकडावा. (जसे ४८.४९ टक्के साठी ४८ टक्के घ्यावे.) टक्केवारी लिहिताना आलेल्या गुणांत ०.५ decimal point पेक्षा जास्त असल्यास पुढील अंक पकडावा. (जसे ५०.५० टक्क्यांकरिता ५१ टक्के घ्यावे.)

अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावीत.

i) दोन स्वयंसाक्षांकीत केलेले फोटोग्राफ्स (मागील बाजूस स्वतचे नाव आणि वडिलांचे नाव लिहावे.)

ii) एक स्वत:चा पत्ता लिहिलेला Registered Envelope ज्यावर योग्य ते पोस्टाचे तिकीट लावलेले असावे.

iii) आवश्यक त्या सर्टिफिकेट्सच्या स्वयंसाक्षांकीत केलेल्या प्रती.

iv) अॅडमिट कार्ड (दोन प्रती) (जाहिरातीच्या Annexure- VI मध्ये उपलब्ध आहे.)

v) इमाव उमेदवारांनी Appendix IV मधील घोषणापत्र जोडावे.

विहीत नमुन्यातील अर्ज हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून भरावेत.

निवड झाल्यास उमेदवारांना कुठे नेमणूक हवी आहे, त्याचे तीन पसंतीक्रम अर्जात नमूद करावेत.

उमेदवारांना फक्त एकाच ट्रेडसाठी अर्ज करता येईल. अर्ज पुढील पत्त्यावर दि. २ फेब्रुवारी २०२४ पर्यंत स्विकारले जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) – २ ATC/ ASC Centre ( North) – १ ATC, Agram Post, Bangalore – ०७.