सुहास पाटील

महाराष्ट्र राज्य विद्याुत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) (MSEDCL) ‘विद्याुत सहाय्यक’ पदांची सरळसेवा पद्धतीने ३ वर्षांच्या कंत्राटी कालावधीसाठी भरती. ३ वर्षांचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना ‘तंत्रज्ञ’ पदावर सामावून घेण्यात येईल. (वेतन श्रेणी – २५,८०० – ५०,८३५) Advt. No. ०६/२०२३ dt. २९.१२.२०२३ एकूण रिक्त पदे – ५३४७ (अजा – ६७३, अज – ४९१, विजा-अ – १५०, भज-ब – १४५, भज-क – १९६, भज-ड – १०८, विमाप्र – १०८, इमाव – ८९५, आदुघ – ५००, खुला – २०८१).

Dissatisfaction among students over delay in Maharashtra Public Service Commission exams results interviews
‘एमपीएससी’च्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच; अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!

महिलांसाठी एकूण १६०४ पदे राखीव (अजा – २०२, अज – १४७, विजा-अ – ४५, भज-ब – ४४, भज-क – ५९, भज-ड – ३२, विमाप्र – ३२, इमाव – २६९, आदुघ – १५०, खुला – ६२४).

आरक्षित पदे – खेळाडू – २६८, माजी सैनिक – ८०२, प्रकल्पग्रस्त – २६८, भूकंपग्रस्त – १०७, शिकावू उमेदवार – ५३६, दिव्यांग ४२४ (गट-क कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे ( Dwarfism), आम्ल हल्लाग्रस्त ( AAV)), अनाथ – ५३.

पात्रता – (दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी) १० वी उत्तीर्ण आणि वीजतंत्री/ तारतंत्री ट्रेडमधील आयटीआय कोर्स व NCVT परीक्षा उत्तीर्ण किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) ट्रेडमधील NCVT प्रमाणपत्र किंवा २ वर्षं कालावधीचा वीजतंत्री/ तारतंत्री पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र. उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी ( Domicile) असणे आवश्यक.

वयोमर्यादा – (दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी) किमान १८ वर्षं पूर्ण व कमाल २९ वर्षे.

कमाल वयोमर्यादा – (मागासवर्गीय/ आदुघ/ खेळाडू/ अनाथ – ३४ वर्षे, दिव्यांग, माजी सैनिक – ४७ वर्षे).

महावितरण/ महानिर्मिती/ महापारेषण कंपनीमध्ये शिकावू उमेदवारी प्रशिक्षण (Apprenticeship) २९ डिसेंबर २०२३ पूर्वी पूर्ण केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत प्रशिक्षणाच्या कालावधीइतकी सूट देण्यात येईल.

दरमहा मानधन – प्रथम वर्ष रु. १५,०००/-, द्वितीय वर्ष रु. १६,०००/-, तृतीय वर्ष रु. १७,०००/-. उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, व्यवसायकर इ. वजावट करण्यात येईल.

निवड पद्धती – ऑनलाइन परीक्षा शैक्षणिक अर्हता व सामान्य अभियोग्यता चाचणी ( General Aptitude) यावर आधारित राहील. (१) तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान – ५० प्रश्न, ११० गुण, (२) सामान्य अभियोग्यता – (अ) तर्कशक्ती ( Reasoning) – ४० प्रश्न, २० गुण, (ब) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड (संख्यात्मक अभियोग्यता) – २० प्रश्न, १० गुण, (क) मराठी भाषा – २० प्रश्न, १० गुण, एकूण १३० प्रश्न, १५० गुण, वेळ १२० मिनिटे.

चुकीच्या उत्तरांसाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण दंड म्हणून वजा करण्यात येतील. महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम केलेल्या उमेदवारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष २ गुण याप्रमाणे ५ वर्षांकरिता कमाल १० गुण अतिरिक्त देण्यात येतील. अंतिम निवड करताना हे अतिरिक्त गुण ९० गुणांत मिळविले जातील. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेतील १५० पैकी प्राप्त गुणांचे रूपांतर ९० गुणांत करून अंतिम निवड यादी बनविली जाईल.

नमुना अर्ज व माहिती www. mahadiscom. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी ( Domicile) असलेबाबत नमूद करणे आवश्यक आहे. अजा/ अज वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांनी त्या त्या मागासप्रवर्गासाठी विहीत करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – रु. २५०/- जीएसटी; मागासवर्गी, आदुघ व अनाथ – रु. १२५ जीएसटी दिव्यांग आणि माजी सैनिक यांना फी माफ आहे.

ऑनलाइन अर्ज www. mahadiscom. in या संकेतस्थळावर दि. २० मार्च २०२४ पर्यंत करावेत.