महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढील संवर्गातील एकूण २७४ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( MPSC) ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ रविवार, दि. २८ एप्रिल २०२४ रोजी ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्याचे नियोजित होते. दि. ८ मे २०२४ च्या शुद्धिपत्रकानुसार सदर परीक्षा दि. ६ जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात येईल.

पात्रता – पद क्र. ४) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ – वाणिज्य शाखेची पदवी किमान ५५ टक्के गुणांसह/ C. A./ ICWA/ M. Com./ M. B. A. ( Finance).

पद क्र. ६) उद्याोग उपसंचालक (तांत्रिक) गट-अ – B. E./ B. Tech. ( Civil) किंवा B. Sc.

१ ते १८ पैकी वरील २ पदे वगळता इतर पदांसाठी पात्रता – पदवी उत्तीर्ण.

( II) महसूल व वन विभाग – महाराष्ट्र वनसेवा सेवा गट-ब – ४८ पदे (मुख्य परीक्षा २८ ते ३१ डिसेंबर २०२४).

(१) सहायक वनसंरक्षक गट-अ – एकूण ३२ पदे (अजा – २, अज – ४, विजा-अ – २, इमाव – ११, सा.शै.मा. – ३, आदुघ – ३, खुला – ७) (१ पद दिव्यांग कॅटेगरी Autism, ID & SLD, MI साठी राखीव).

पात्रता – वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/ पशु संवर्धन व पशुवैद्याकशास्त्र/ कृषी/ अभियांत्रिकी यापैकी एका विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

शारीरिक क्षमता – पुरुष – २५ कि.मी., महिला – १४ कि.मी. अंतर चार तासात पूर्ण करणे.

(२) वनक्षेत्रपाल गट-ब – एकूण १६ पदे (अजा – ४, अज – ४, भज-क – १, इमाव – ३, सा.शै.मा. – २, आदुघ – २).

पात्रता – (१) वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, कृषिशास्त्र, कृषी, रसायन, स्थापत्य/ ऑटोमोबाईल/ संगणक/ पॉवर/ प्रोडक्शन/ विद्याुत/इलेक्ट्रॉनिक्स/ यंत्र/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/ संगणक विज्ञान व तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, संगणक अॅप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरण विज्ञान, पशुवैद्याकीय विज्ञान यापैकी कोणत्याही एका विषयातील पदवी किंवा

(२) विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवी. (१२ (विज्ञान) शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक.) किंवा

(३) बी.ई./बी.टेक. (ऑटोमोबाईल/ पॉवर/ प्रोडक्शन/ मेटॅलर्जी अँड मटेरियल/ टेक्स्टाईल/आयटी/ इन्स्ट्रूमेंटेशन/बी.एस्सी. (बायोटेक्नॉलॉजी)/ बी.फार्मसी./ बी.टेक. (फूड सायन्स) उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. तसेच १० वी/१२ वी (विज्ञान) शाखेतून उत्तीर्ण असावा.)

( III) मृद व जलसंधारण विभाग – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब – ४५ पदे (मुख्य परीक्षा २३ नोव्हेंबर २०२४).

(१) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-अ – एकूण २३ पदे (अजा – १, अज – १, विजा-अ – १, भज-क – १, भज-ड – १, इमाव – २, विमाप्र – ३, सा.शै.मा. – २, आदुघ – ४, खुला – ७).

(२) जल संधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब – २२ पदे (अजा – १, भज-ब – १, भज-ड – १, इमाव – २, विमाप्र – ४, सा.शै.मा. – २, खुला – ११).

पात्रता – B. E./ B. Tech. (Civil/ Civil & Water Management/ Civil & Environmental/ Structural).

शारीरिक क्षमता – पुरुष – २५ कि.मी., महिला – १६ कि.मी. अंतर चार तासात पूर्ण करणे.

सहायक वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल पदांसाठी शारीरिक मोजमापे – पुरुष – उंची – १६३ सें.मी. (अनुसूचित जमाती – १५२.५ सें.मी.), छाती – ७९-८४ सें.मी.; महिला – उंची – १५० सें.मी. (अज – १४५ सें.मी.), दृष्टी – चष्म्यासह – ६/६.

एकूण पदांपैकी महिलांसाठी ३० टक्के, खेळाडू ५ टक्के, दिव्यांग ४ टक्के, अनाथ १ टक्के पदे राखीव.

वयोमर्यादा – निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब दि. २५ जानेवारी २०२४ रोजी व इतर सर्व पदांसाठी १ एप्रिल २०२४ रोजी खुला – ४० वर्षे, मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ/ खेळाडू /माजी सैनिक – ४५ वर्षे, दिव्यांग – ४७ वर्षे.

पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र आहेत. (त्यांना मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी नेमून दिलेल्या शेवटच्या दिवसापर्यंत पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.)

निवड प्रक्रिया – संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा आणि मुलाखत.

सर्व संवर्गातील पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा ४०० गुणांसाठी (पेपर-१ – अनिवार्य आणि पेपर-२ फक्त पात्रता स्वरूपाचा. प्रत्येक पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईप २०० गुणांसाठी वेळ २ तास)

राज्य सेवा मुख्य परीक्षा – ८०० गुणांसाठी मुलाखतीचे गुण – १००.

इतर संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा ४०० गुणांसाठी, मुलाखतीचे गुण – ५०.

परीक्षा शुल्क – अमागास – रु. ५४४/-; मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ/ दिव्यांग – रु. ३४४/-

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक २४ मे २०२४ (२३.५९ वाजेपर्यंत).

भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक २६ मे २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत.

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक २७ मे २०२४ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत).

परीक्षेसंबंधी विस्तृत माहिती https:// mpsc. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा – २०२४ परीक्षेकरिता अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (आदुघ) अर्ज केलेल्या उमेदवारांना ‘सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गा (सा.शै.मा.)’चा दावा करण्याकरिता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरिता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत, अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता नव्याने अर्ज सादर करण्या संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक.

(१) संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलमधील ‘ My Account’ सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरिता (जा.क्र. ४१४/२०२३) उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकसमोर दर्शविण्यात आलेल्या ‘Question’ या बटणावर क्लिक करून विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकतात.

२) सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणामुळे मागासवर्गीयांकरिता अनुज्ञेय असलेल्या वयोमर्यादेतील सवलतीस अनुसरून नव्याने पात्र ठरणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलमधील ‘ My Account’ सदराखाली प्रस्तुत जाहिरातीकरिता (जा.क्र. ४१४/ २०२३) उपलब्ध करून देण्यात आलेल्या Link च्या आधारे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गातून अर्ज सादर करू शकतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संयुक्त पूर्व परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज https:// mpsconline. gov. in या संकेतस्थळावर दि. ९ मे ते २४ मे २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.