सुहास पाटील

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ( AIIMS), नवी दिल्ली. अककटर दिल्ली आणि इतर AIIMS मधील ‘नर्सिंग ऑफिसर’ पदांच्या भरतीकरिता ‘नर्सिंग ऑफिसर रिक्रूटमेंट कॉमन इलिजिबिलिटी टेस्ट ( NORCET) ६’ घेणार आहे. Notice No. २८/२०२४ dtd. २६.०२.२०२४. ८० टक्के जागा महिलांसाठी व २० टक्के जागा पुरुषांसाठी दिल्या जातील.

Orchid International School, Pune,
पुणे : ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्ष, संचालकांसह मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल
VIDEO: मुंबईत बेरोजगारीचं भीषण वास्तव; ३०० जागा अन् हजारो अर्जदार; एअर इंडियाच्या गेटजवळ चेंगराचेंगरी पाहून धडकी भरेल
Job Opportunity Opportunities in Rashtriya Chemicals and Fertilizers Limited
नोकरीची संधी: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेडमधील संधी
Inspiring journey of Rahul Jaimini
Success Story : IIT पदवीधर, मेहनतीच्या जोरावर उभारली ६५ हजार कोटींची कंपनी; पण नव्या संधीसाठी दिला राजीनामा; जाणून घ्या राहुल जैमिनी यांचा प्रेरणादायी प्रवास
job opportunity ai airport services limited
नोकरीची संधी : एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमधील संधी
Job Opportunity Opportunities in Central Arms Police Forces
नोकरीची संधी: सेंट्रल आर्म्स पोलीस फोर्सेसमधील संधी
Loksatta kutuhal Mark Zuckerberg Facebook founder and CEO of Meta Platforms Company
कुतूहल: मार्क झकरबर्ग
job opportunity
नोकरीची संधी :पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमधील संधि

वेतन श्रेणी – पे-बँड – २ रु. ९,३०० – ३४,८००, ग्रेड-पे रु. ४,६००/-. अंदाजे वेतन दरमहा रु. ८२,०००/-.

पात्रता – B. Sc. ( Nursing) किंवा B. Sc. ( Post Certificate)/ Post Basic B. Sc. ( Nursing) किंवा G. N. M. डिप्लोमा आणि किमान ५० बेड असलेल्या हॉस्पिटलमधील कामाचा २ वर्षांचा अनुभव.

आणि उमेदवार स्टेट/ इंडियन नर्सिंग काऊन्सिलकडे रजिस्टर्ड असावा.

वयोमर्यादा – दि. १७ मार्च २०२४ रोजी १८ ते ३० वर्षे. (इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.)

अर्जाचे शुल्क – खुला/इमाव – रु. ३,०००/-; अजा/अज/ईडब्ल्यूएस – रु. २,४००/-; दिव्यांग – उमेदवारांना फी माफ आहे. (अजा/अजच्या उमेदवार जे परीक्षेला बसतील त्यांची फी निकालानंतर परत केली जाईल.)

निवड पद्धती – (स्टेज-१ NORCET प्रिलिमिनरी/स्टेज-२ NORCET मेन्स)

स्टेज-१ – NORCET प्रिलिमिनरी एक्झाम – कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा १०० प्रश्न (MCQ); १०० गुणांसाठी वेळ ९० मिनिटे. (२० प्रश्न जनरल नॉलेज ॲण्ड ॲप्टिट्यूड व ८० प्रश्न संबंधित विषयावर आधारित) चुकीच्या प्रश्नासाठी १/३ गुण वजा केले जातील. परीक्षा खुला/ईडब्ल्यूएस उमेदवारांना ५०टक्के, इमावसाठी ४५टक्के, अजा/अज/दिव्यांग – ४०टक्के गुण पात्रतेसाठी आवश्यक. CBT परीक्षेतील गुणांनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल. प्रश्न पत्रिकेत ५ विभाग असतील. प्रत्येक विभागाला १८ मिनिटांचा कालावधी व प्रत्येकी २० प्रश्न असतील. प्रत्येक विभागाचा वेळ संपल्यानंतर संबंधित विभागातील प्रश्न सोडविता येणार नाहीत. NORCET प्रिलिम परीक्षा फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

NORCET प्रिलिममधून रिक्त पदांच्या ५ पट उमेदवार NORCET मेन्ससाठी निवडले जातील. NORCET मेन्समध्ये नर्सिंग अभ्यासक्रमाशी निगडीत १०० MCQ १०० गुणांसाठी ५ सेक्शन्समध्ये विभागलेले असतील. वेळ प्रत्येकी १८ मिनिटे, प्रत्येकी २० गुण. प्रत्येक विभागासाठीचा वेळ संपल्यानंतर संबंधित विभागातील प्रश्न सोडविता येणार नाहीत. प्रत्येक विभाग एकामागून एक स्क्रीनवर दाखविला जाईल. उमेदवारांना फक्त चालू असलेल्या विभागातीलच प्रश्न सोडविता येतील.

NORCET मेन्समधील उमेदवाराची गुणवत्ता आणि त्यांनी दिलेल्या सहयोगी हॉस्पिटल्ससाठीचा पसंतीक्रम पाहून अंतिम निवड केली जाईल.

स्टेज-१ – NORCET प्रीलिमिनरी परीक्षा दिनांक १४ एप्रिल २०२४ (रविवार) आणि स्टेज-२ ठडफउएळ मेन्स परीक्षा दिनांक ५ मे २०२४ (रविवार).

NORCET मेन्स परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार जे AIIMS साठी पात्र असतील त्यांच्याकडून सहयोगी संस्था/हॉस्पिटल्ससाठीचा पसंतीक्रम मागविला जाईल. जागांचे वाटप मेरिट आणि पसंतीक्रम पाहून केले जाईल. वाटप झालेल्या संस्थेमध्ये/हॉस्पिटलमध्ये उमेदवारांना हजर होणे अनिवार्य असेल.

NORCET मेरिट लिस्ट जाहिर झाल्यापासून ६ महिनेपर्यंत ग्राह्य धरली जाईल.

ज्या उमेदवारांना AIIMS मधील नर्सिंग ऑफिसर पदासाठी अर्ज करावयाचा आहे त्यांनी NORCET परीक्षेसाठी www. aiimsexams. ac. in या संकेतस्थळावर दि. १७ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक.

१४ AIIMS मधील ‘नर्सिंग ऑफिसर’ च्या रिक्त पदांचा तपशील अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी जाहीर केला जाईल.

AIIMS नागपूर, AIIMS (भोपाळ (म.प्र.)), बिबीनगर (हैदराबाद), मंगलागिरी (आंध्र प्रदेश), नवी दिल्ली, रायपूर (छत्तीसगड), राजकोट (गुजरात) इ. अशा एकूण १४ अककटर मध्ये नर्सिंग ऑफिसरच्या पदांची भरती आहे.

NORCET-६ विषयी शंकासमाधानासाठी www. aiimsexams. ac. in वरील My page under ’ Raise a Query’ वर संपर्क साधा

टोल फ्री नं. १८००११७८९८. (सोमवार ते शुक्रवार १०.०० ते १७.०० वाजे दरम्यान शनिवारी १०.०० ते १३.०० वाजे दरम्यान).

ऑनलाइन अर्ज www. aiimsexams. ac. in या संकेतस्थळावर दि. १७ मार्च २०२४ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत. उमेदवारांनी रजिस्ट्रेशन स्लीपची कॉपी आणि अर्जाचे शुल्क भरल्याचा पुरावा स्वतकडे जपून ठेवावा.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील संधी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ( BEL), बेंगळूरु (संरक्षण मंत्रालयांतर्गत, भारत सरकारचा उपक्रम). BEL च्या देशभरातील ६ झोन्समधील HLS & SCB SBU प्रोजेक्ट्ससाठी ट्रेनी इंजिनीअर पदांची तात्पुरत्या स्वरूपात ३ वर्षांसाठी करार पद्धतीने भरती. एकूण रिक्त पदे – ५१७ (अजा – ७७, अज – ३९, इमाव – १३९, ईडब्ल्यूएस – ५२, खुला – २१०) सुरुवातीला २ वर्षांकरिता नेमणूक दिली जाईल. जी आणखी १ वर्षाने वाढविली जावू शकते. BEL च्या वेस्ट झोनमध्ये महाराष्ट्र, गोवा व गुजरात राज्यांचा समावेश होतो.

( I) ट्रेनी इंजिनिअर- I – ५१७ पदे (सेंट्रल झोन – ६८, ईस्ट झोन – ८६, वेस्ट झोन – १३९, नॉर्थ झोन – ७८, नॉर्थ ईस्ट झोन – १५, साऊथ झोन – १३१).

पात्रता – बी.ई./ बी.टेक./ एम.ई./ एम.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन/ टेली कम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/ मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग/ आयटी/ इन्फॉरमेशन सायन्स).

पात्रता – संबंधित विषयातील पात्रता परीक्षेत किमान सरासरी ५५ टक्के गुण आवश्यक. (अजा/अज/ दिव्यांग उमेदवारांना गुणांची अट लागू नाही.)

कामाचे स्वरूप – CBIC च्या हार्डवेअर लोकेशन्सवर उपलब्ध असलेल्या आयटी इक्विपमेंट्सकरिता हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि को-ऑर्डिनेशन सपोर्ट प्रोव्हाईड करणे.

उमेदवाराकडे इंजिनीअरिंग पदवीच्या सर्व सेमिस्टर्सच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक.

वयोमर्यादा – (दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी) बी.ई./बी.टेक. – २८ वर्षे. एम.ई./ एम.टेक. – ३० वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

वेतन – पहिल्या वर्षी रु. ३०,०००/-, दुसऱया वर्षी रु. ३५,०००/-, तिसऱ्या वर्षी रु. ४०,०००/-.

याशिवाय ज्या उमेदवारांना BEL च्या विविध साईट्सवर आणि कस्टमर लोकेशन्सवर पोस्टिंग दिले जाईल, त्यांना दरवर्षी प्रत्येकी रु. १२,०००/- इतर खर्चासाठी दिले जातील.

निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेतून पर्सोनल इंटरह्यूकरिता उमेदवार रिक्त पदांच्या १: ५ या प्रमाणात निवडले जातील. लेखी परीक्षेतील ८५ गुण व इंटरह्यूमधील १५ गुण देऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांना परीक्षेचे ठिकाण आणि वेळ ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.

लेखी परीक्षा/ इंटरह्यूकरिता निवडलेल्या उमेदवारांची यादी/अंतिम निवड यादी www. bel- india. in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.

अर्जाचे शुल्क – ट्रेनी इंजिनीअर- क रु. १७७/- (रु. १५०/- १८ टक्के जीएसटी). (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)

अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने SBI Collect द्वारे भरावयाचे आहे. खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस उमेदवारांनी अर्जाचे शुल्क भरल्यावर एक ‘ SBI Collect reference No.’ जनरेट होईल. तो ऑनलाइन अर्जामध्ये इतर माहिती भरण्यापूर्वी भरणे आवश्यक आहे.

शंकासमाधानासाठी ई-मेल : rechruqus @bel. co. in फोन नं. ०८०-२२१९५६२९

विस्तृत माहिती www. bel- india. in/ careers/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

www. bel- india. in या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील https:// docs. google. com/ forms/ d/ e/1 FAIpQLSfWbNC9 vtwJ_ Y2- RXsz4 Pqb83 Mhq3 quYiG2 TaXFsJL8 cNxRQ/ viewform? usp= sf_ link लिंकमधून दि. १३ मार्च २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत Google Form ऑनलाईन रजिस्टर करणे आवश्यक. ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यावर ॲप्लिकेशन फॉर्म उमेदवारांच्या ई-मेलवर पाठविला जाईल, त्याची प्रिंटआऊट काढणे आवश्यक. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे वॉकइन सिलेक्शनच्या वेळी घेवून जाणे आवश्यक. (२ पासपोर्ट आकाराचे फोटो, १० वी/१२ वी/पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रक, CGPA/ DGPA conversion into percentage formula issued by university, जातीचा दाखला, अनुभवाचा दाखला, अर्जाचे शुल्क भरल्याचा पुरावा, आयडेंटिटी प्रूफ (जसे की आधारकार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स इ.))