सुहास पाटील

नाशिक जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत ‘कोतवाल’ पदांची भरती. (जाहिरात क्र. ०१/२०२३) भागनिहाय उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयांनुसार भरावयाच्या रिक्त पदांचा तपशील. नाशिक जिल्हा – एकूण रिक्त पदे – १४६.

Anil Deshmukh Sunil Kedar and Abhijit Vanjari Hastily Deported From Wardha District
अनिल देशमुख, सुनील केदार, अभिजित वंजारी वर्धा जिल्ह्यातून तडकाफडकी हद्दपार, जाणून घ्या कारण…
vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
bus
जिल्हाधिकाऱ्यांनी अडीच हजार वाहने घेतली ताब्यात
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना

(I) नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभाग, नाशिक यांचे कार्यालयांतर्गत इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सजेतील. (१) इगतपुरी-त्र्यंबकेश्वर – ७ पदे. (इगतपुरी तालुका – ५ पदे, त्र्यंबकेश्वर तालुका – २ पदे); (२) बागलाण – १८ पदे; (३) नाशिक -१० पदे; (४) येवला – उपविभाग – १६ पदे  (येवला तालुका – ९ पदे, नांदगाव तालुका – ७ पदे); (५) चांदवड/देवळा उपविभाग – १८ पदे. (चांदवड तालुका – १३ पदे , देवळा – ५ पदे); (६) दिंडोरी – पेठ उपविभाग – १६ पदे. (दिंडोरी तालुका – १३ पदे, पेठ तालुका – ३ पदे); (७) मालेगांव –  उपविभाग  –  १८ पदे; (८) निफाड – उपविभाग – २७ पदे. (निफाड तालुका – १४ पदे, सिन्नर तालुका – १३ पदे); (९) कळवण उपविभागातील कळवण/सुरगणा तालुका – कळवण तालुका – १० पदे, सुरगणा तालुका – ६ पदे.

( II) रत्नागिरी जिह्यातील रिक्त पदे –

रत्नागिरी – खेड उपविभाग – ७ पदे.

रत्नागिरी जिह्यातील रत्नागिरी उपविभागातील रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील सजेतील कोतवाल एकूण ३२ पदे. (रत्नागिरी तालुका –  १४ पदे, संगमेश्वर तालुका – १८ पदे)

कोतवाल पदांसाठी मासिक मानधन – रु. १५,०००/-.

पात्रता : इयत्ता ४ थी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे. कोतवाल पदाकरिता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही.

निवड पद्धती : लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे सामान्य ज्ञानावर आधारित ५० प्रश्न. प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण १०० गुण. लेखी परीक्षेत किमान ४० गुण मिळविणे आवश्यक. ज्या सजेतील पदासाठी अर्ज केला आहे, त्याच सजातील अंतर्भूत असलेल्या गावातील अर्जदार रहिवासी असणे आवश्यक आहे.  त्याबाबतचा पुरावा अर्ज भरतेवेळी सादर करणे आवश्यक. परीक्षेपूर्वी संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.

कागदपत्र छाननीच्या वेळी सादर करावयाची कागदपत्रे –

(१) अनुसूचित जाती (अजा), अनुसूचित जमाती (अज) व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त उमेदवारांना प्रगत उन्नत गटात मोडत नसल्याबाबत सक्षम अधिकारम्याचे (नॉन-क्रिमी लेयर) ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र.

(२) मागासवर्गीय उमेदवाराने पुरावा म्हणून सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र.

(३) उमेदवाराविरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नसावी अथवा उमेदवारास कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा दंड अगर शिक्षा झालेली नसावी याबाबतचा संबंधित पोलीस स्टेशनचा दाखला. (उमेदवाराचे चारित्र्य निष्कलंक असल्याबाबतचे संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र.)

(४) महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र) (२८ मार्च २००५ नंतर जन्मलेली दोनपेक्षा जास्त अपत्य नाहीत याबाबतचा दाखला (नमुना-अ प्रमाणे)).

(५) शैक्षणिक अर्हतेची मूळ प्रमाणपत्रे.

(६) उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असल्याबाबतचे अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय अथवा वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.

(७) कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध न ठेवणेबाबतचे रु. १००/- च्या स्टँपपेपरवरील प्रतिज्ञापत्र.

प्रत्येक सजेत केवळ एक पद उपलब्ध आहे व ते शासकीय निकषांनुसार आरक्षित करण्यात आलेले आहे. अर्ज करताना उमेदवाराने आरक्षण तपासूनच अर्ज करावा.

संपूर्ण भरती प्रक्रिया सजेनिहाय होणार असून संबंधित जिह्यातील सर्व उपविभागातील पदांसाठी एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्यात येईल. तात्पुरते नियुक्ती आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

परीक्षेचे शुल्क : खुला प्रवर्ग रु. ६००/-; मागासप्रवर्ग रु. ५००/-. ऑनलाइन अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरावे.

ऑनलाइन अर्ज नाशिक जिल्ह्यांतील उमेदवारांनी   https:// nashik. ppbharti. in या संकेतस्थळावर दि. ८ ऑक्टोबर २०२३ (१७.४५ वाजे) पर्यंत करावेत. अर्ज भरण्यासंदर्भात तांत्रिक अडचणी आल्यास त्यासाठी  https:// ppbhartihelp@gmail. com वर ई-मेलद्वारे कळवावे. रत्नागिरी-खेड उपविभागातील उमेदवारांनी  https:// khedrtn. ppbharti. in आणि रत्नागिरी उपविभाग (रत्नागिरी व संगमेश्वर) तालुक्यातील उमेदवारांनी  https:// ratnagiri. ppbharti. in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दि. ९ ऑक्टोबर २०२३ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.