scorecardresearch

Premium

नोकरीची संधी

 रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया ( RBI) – ४५० ‘असिस्टंट’ पदांची भरती. ( Assistant २०२३) ( RBI च्या मुंबई ऑफिस अंतर्गत रिक्त पदे – १०१ (अजा – ०, अज – १५ , इमाव – ०, ईडब्ल्यूएस – १०, खुला – ७६) .

job opportunity
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

सुहास पाटील  

 रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया ( RBI) – ४५० ‘असिस्टंट’ पदांची भरती. ( Assistant २०२३) ( RBI च्या मुंबई ऑफिस अंतर्गत रिक्त पदे – १०१ (अजा – ०, अज – १५ , इमाव – ०, ईडब्ल्यूएस – १०, खुला – ७६) . यातील ५ पदे पणजी, (गोवा) आणि १० पदे बेलापूर (नवी मुंबई) ऑफिससाठी आहेत. (१८ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी कॅटेगरी  VI – १,  HI- ८,  OH  – ३,  MD – ६ राखीव आहेत.)

job opportunity
नोकरीची संधी
Viral Video
काकू भडकल्या ना राव! तरुणीच्या थेट कानशिलात लगावली, मुंबई लोकलमधला व्हिडीओ व्हायरल
Power Grid Corporation of India Limited Recruitment of Diploma Trainee Posts Job Opportunity Job
नोकरीची संधी
ATM Card vishleshan
विश्लेषण: एटीएम कार्डाशिवाय पैसे कसे काढता येणार?

नागपूर ऑफिस अंतर्गत रिक्त पदे : १९ (अजा – ०, अज – ६, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ९) (३ पदे दिव्यांग कॅटेगरी  VI – १,  HI- २,  साठी राखीव).

पात्रता : (दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी) पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ दिव्यांग यांना गुणांची अट नाही.) आणि उमेदवाराला ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज केला आहे तेथील स्थानिक भाषा अवगत असावी.

वयोमर्यादा : दि. सप्टेंबर २०२३ रोजी २० ते २८ वर्षे. (अजा/ अज – ३३ वर्षेपर्यंत, इमाव – ३१ वर्षेपर्यंत, विधवा/ परित्यक्ता महिला खुला – ३८, अजा/अज -४३ वर्षेपर्यंत, दिव्यांग – ३८/४१/४३ वर्षेपर्यंत)

निवड पद्धती : (I) प्रीलिमिनरी एक्झामिनेशन – (२१/२३ ऑक्टोबर २०२३ रोजी) मल्टिपल चॉईस (१) इंग्लिश लँग्वेज – ३० प्रश्न, ३० गुण; (२) न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी – ३५ प्रश्न, ३५ गुण; (३) रिझिनग अ‍ॅबिलिटी – ३५ प्रश्न, ३५ गुण. कालावधी प्रत्येकी २० मिनिटे. एकूण १०० प्रश्न, १०० गुण, कालावधी ६० मिनिटे.

( II) मेन एक्झामिनेशन : (२ डिसेंबर २०२३ रोजी) मल्टिपल चॉईस (१) टेस्ट ऑफ रिझिनग – वेळ ३० मिनिटे, (२) टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज – वेळ ३० मिनिटे, (३) टेस्ट ऑफ न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी – वेळ ३० मिनिटे, (४) टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस (वेळ २५ मिनिटे), (५) टेस्ट ऑफ कॉम्प्युटर नॉलेज – वेळ २० मिनिटे. प्रत्येकी ४० प्रश्न/४० गुण. एकूण गुण २००, एकूण कालावधी १३५ मिनिटे. ऑब्जेक्टिव्ह टेस्टमधील प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/४ गुण वजा केले जातील.

(III) लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट : (LPT) मेन ऑनलाइन परीक्षेसाठी शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांना ज्या राज्यांतील पदांसाठी अर्ज केला आहे. त्या राज्याच्या ऑफिशियल/ स्थानिक भाषेत लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल. मुंबई ऑफिससाठी ऑफिशियल लँग्वेज – मराठी/ कोकणी आहे. नागपूर ऑफिससाठी ऑफिशियल लँग्वेज – मराठी/ हिंदी आहे.

मेन एक्झामसाठी निवडलेल्या उमेदवारांना त्यांचे रोल नंबर  RBI च्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जातील. मेन एक्झामचा निकाल बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. मेन एक्झाममधील गुणवत्तेनुसार उमेदवार लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टसाठी निवडले जातील. तत्पूर्वी कागद पडताळणी केली जाईल.  LPT बँकेच्या संबंधित ऑफिसमध्ये घेतली जाईल. मेडिकली फिट ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड ऑनलाइन मेन एक्झाममधील गुणवत्तेवर आधारित केली जाईल.

वेतन : दरमहा रु. ५०,९५४/-. उपलब्ध असल्यास बँकेचे अकोमोडेशन दिले जाईल.

प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग : अजा/ अज/ इमाव/ विकलांग उमेदवारांना बँकेमार्फत प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी  RBI च्या रिजनल ऑफिसकडे ई-मेलने दि. ६ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत अर्ज करावेत. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग दरम्यान राहण्याचा, जेवणाचा, प्रवासाचा खर्च उमेदवारांना करावा लागेल. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगसाठीच्या अर्जाचा नमुना बँकेच्या वेबसाईटवर  Annexure –  VII  मध्ये उपलब्ध आहे.

मुंबई ऑफिसचा पत्ता आहे  RBI RBI Main Bldg.,  Shahid Bhagat Singh Road,  Mumbai – 400001. ई-मेल आयडी आहे  recruitmentmumbai@rbi. org. in. नागपूर ऑफिसचा ई-मेल आयडी  recruitmentnagpur@rbi. org. in पूर्व परीक्षेसाठी परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा, पणजी.

मुख्य परीक्षेसाठी परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, नाशिक, पणजी.

परीक्षा शुल्क/ इंटिमेशन चार्जेससह : रु. ४५०/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ माजी सैनिक यांना फक्त इंटिमेशन चार्जेस रु. ५०/- भरावे लागतील.) ऑनलाइन अर्जासोबत फोटोग्राफ (Scanned image २०-५० KB) व सिग्नेचर (Scanned image १०-२० KB)  डाव्या हाताच्या अंगठय़ाची निशाणी (२० -५० KB) , स्वहस्ते लिहिलेले घोषणा पत्र (२०- ५० KB)  अपलोड करणे अनिवार्य आहे.

ऑनलाअन अर्ज  www. rbi. org. in या संकेतस्थळावर  Recruitment for the post of Assistant – 2023  या लिंकवर क्लिक करून दि. ४ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत करावेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI) मध्ये क्लेरिकल कॅडरमधील आर्मरर आणि कंट्रोल रुम ऑपरेटर्स पदांवर माजी सैनिक/ राज्य अग्निशमन दलातील कर्मचारी/ माजी सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्सेस (CARF) / आसाम रायफल्स (AR) मधील कर्मचारी यांची भरती. (Advt.  No.  CRPD/ ARMOURERS/ २०२३-२४/१३)

एकूण रिक्त पदे : १०७.

वेतन श्रेणी : १७,९०० – १००/३ / ४७,९२०.

(१) आर्मरर (Armourer) – एकूण १८ पदे (महाराष्ट्र राज्यातील  SBI च्या मुंबई मेट्रो सर्कलसाठी – १ पद).

पात्रता : १२ वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलांमधील १२ वी समतूल्य प्रमाणपत्र आणि आर्मी/ नेव्ही/ एअरफोर्स/ उअढा/ अफ मधील आर्मामेंट कोर्स उत्तीर्ण.

कामाचे स्वरूप : (i) ब्रँच ऑफिसेसना भेटी देऊन आम्र्स आणि अ‍ॅम्युनिशनची तपासणी (inspection) करणे. ( ii) प्री अ‍ॅण्ड पोस्ट फायिरग इन्स्पेक्शन. ( iii) आम्र्सची देखभाल आणि दुरूस्ती. (iv)गार्डसना आम्र्स अ‍ॅण्ड अ‍ॅम्युनिशन ट्रेनिंग देणे इ.

वयोमर्यादा : दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी २० ते ४५ वर्षे.

(२) कंट्रोल रुम ऑपरेटर्स : एकूण ८९ पदे (महाराष्ट्र राज्यातील  SBI च्या मुंबई मेट्रो सर्कलसाठी – ८ पदे (इमाव – १, खुला – ७)).

पात्रता : १२ वी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा आम्र्ड फोर्सेसकडील १२ वी समतूल्य प्रमाणपत्र किंवा पदवी उत्तीर्ण.

अनुभव : माजी सैनिक, माजी सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्सेस/ आसाम रायफल्स किंवा राज्य अग्निशमन दलातील किमान १० वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव. (माजी सैनिक, माजी  उअढा/ अफ/ राज्य अग्निशमन दलामध्ये ज्युनियर कमिशण्ड ऑफिसर (CAPF/ AR/) रँक धारक असावा.)

कामाचे स्वरूप : SBI च्या ब्रँचेस ऑफिसमधील ( i) आम्र्स अ‍ॅण्ड अ‍ॅम्युनिशनची तपासणी करणे. ( ii) व्हेपन्सची देखभाल व दुरुस्ती. ( iii) बँकेतील गार्डसना ट्रेनिंग देणे. (iv) सिक्युरिटीशी संबंधित कामे इ.

वयोमर्यादा : दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी किमान २० वर्षे. कमाल वयोमर्यादा – ( i) माजी सैनिक, माजी  उअढा,  अफ साठी ४८ वर्षे. ( ii) राज्य अग्निशमन दलातील कर्मचारी – ३५ वर्षे.

निवड पद्धती : ऑनलाइन लेखी परीक्षा अंदाजे नोव्हेंबर/ डिसेंबर २०२३ मध्ये घेतली जाईल. (जनरल अवेअरनेस – १० प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड – १० प्रश्न, रिझिनग अ‍ॅबिलिटी – १० प्रश्न, प्रोफेशनल नॉलेज – २० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण ५० प्रश्न, १०० गुणांसाठी वेळ १ तास आणि इंटरव्ह्यू (२५ गुण))

महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी परीक्षेचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी.

परीक्षा केंद्र : मुंबई/ ठाणे/नवी मुंबई/ टटफ, अहमदाबाद, भोपाळ इ.

ऑनलाइन परीक्षा/ इंटरव्ह्यूसाठी कॉल लेटर बँकेच्या वेबसाईटवरून ‘acquaint yourself booklet मधून डाऊनलोड करता येईल. यासाठी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड/ जन्मतारीख वापरावे लागेल.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन  https:// bank. sbi/ careers ÎIYUF  https:// www. sbi. co. in/ careers या संकेतस्थळावर ५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत करावे.

अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. रजिस्ट्रेशनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

शंकासमाधानासाठी बँकेच्या वेबसाईटवरील ‘Contact us लिंकमधून संपर्क साधा. ( https:// bank. sbi/ careers/ psq. htm? action= query ÎIYUF  https:// sbi. co. in/ careers/ psq. htm? action= query)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunity reserve bank of india recruitment for the posts of assistant amy

First published on: 03-10-2023 at 02:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×