सुहास पाटील
युनियन पब्लिक सव्र्हिस कमिशन (UPSC) ‘कंबाईंड जीओ-सायंटिस्ट पूर्व परीक्षा २०२४’ दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेणार आहे. Exam- Notice No. ०२/२०२४ GEOL) UPSC या परीक्षेतून कंबाईंड जीओ सायंटिस्ट मुख्य परीक्षेसाठी उमेदवार निवडले जातील. त्यातून पुढील पदांची भरती करणार आहे. (I) ‘जीऑलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडिया (GSI)’, मिनिस्ट्री ऑफ माईन्समधील कॅटेगरी- I पदे.




(१) जीऑलॉजिस्ट – ग्रुप-ए – ३४ पदे.
(२) जीओफिजिसिस्ट – ग्रुप-ए – १ पद.
(३) केमिस्ट ग्रुप-ए – १३ पदे.
आणि (II) ‘सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड’ (CGWB) मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेसमधील कॅटेगरी- कक ची ग्रुप ‘ए’ पदे –
(४) सायंटिस्ट ‘बी’ (हायड्रोजीऑलॉजी) – ग्रुप-ए – ४ पदे.
(५) सायंटिस्ट ‘बी’ (केमिकल) ग्रुप-ए – २ पदे,
(६) सायंटिस्ट ‘बी’ (जीओफिजिक्स) ग्रुप-ए – २ पदे.
पात्रता : (१) जीऑलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडिया (GSI) मधील जीओलॉजिस्ट पदांसाठी जीऑलॉजिकल सायन्स/ जीऑलॉजी/ अॅप्लाईड जीऑलॉजी/ जीओएक्स्प्लोरेशन/जीओकेमिस्ट्री/ ओशियानोग्राफी/ पेट्रोलियम जीओ सायन्सेस इ. विषयातील मास्टर्स डिग्री.
(२) GSI मधील जीओफिजिसिस्ट आणि C.G.W. इ. मधील सायंटिस्ट ‘बी’ (जीओफिजिक्स) या पदांसाठी एम.एस्सी. (फिजिक्स/ अॅप्लाईड फिजिक्स/ जीओफिजिक्स/ अॅप्लाईड जीओफिजिक्स/ मरिन जीओफिजिक्स इ.)
पद क्र. (३) केमिस्ट आणि पद क्र. (५) सायंटिस्ट ‘बी’ (केमिकल) या पदांसाठी एम.एस्सी. (केमिस्ट्री/ अॅप्लाईड केमिस्ट्री/ अॅनालायटिकल केमिस्ट्री)
पद क्र. (४) सायंटिस्ट ‘बी’ (हायड्रोजीऑलॉजी) – जीऑलॉजी/ अॅप्लाईड जीऑलॉजी/ मरिन जीऑलॉजी/ हायड्रोजीऑलॉजी या विषयांतील पदव्युत्तर पदवी.
पद क्र. (६) सायंटिस्ट ‘बी’ (जीओफिजिक्स) – एम.एस्सी. (फिजिक्स/ अॅप्लाईड फिजिक्स/ जीओफिजिक्स/ अॅप्लाईड जीओफिजिक्स/ मरिन जीओफिजिक्स) किंवा इंटिग्रेटेड एम.एस्सी. (एक्स्प्लोरेशन जीओफिजिक्स) किंवा एम.एस्सी. (टेक्नॉलॉजी) (अॅप्लाईड जीओफिजिक्स).
पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (परीक्षेच्या स्टेज-३ साठी निवडलेल्या उमेदवारांनी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा स्टेज-३ साठी डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म भरते वेळी सादर करणे आवश्यक आहे.)
वयोमर्यादा : (दि. १ जानेवारी २०२४ रोजी) सर्व पदांसाठी २१ ते ३२ वर्षेपर्यंत. (उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी १९९२ ते १ जानेवारी २००३ दरम्यानचा असावा.) इमाव – ३५ वर्षेपर्यंत, अजा/ अज – ३७ वर्षेपर्यंत, (दिव्यांग उमेदवार – खुलागट – ४२ वर्षेपर्यंत, इमाव – ४५ वर्षेपर्यंत, अजा/अज – ४७ वर्षेपर्यंत); (GSI आणि C.G.W. चे कर्मचारऱ्यांसाठी संबंधित खात्यातील पदांसाठी – ३९ वर्षेपर्यंत).
निवड पद्धती : स्टेज-१ – कंबाईंड जीओसायंटिस्ट (प्रीलिमिनरी) एक्झामिनेशन, २०२४ (ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर्स ४०० गुणांसाठी) जी दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेतली जाईल. यातून स्टेज-२ साठी रिक्त पदांच्या ६ ते ७ पट उमेदवार निवडले जातील. (पेपर-१ जनरल स्टडीज – १०० गुणांसाठी, वेळ २ तास; पेपर-२ संबंधित विषयावर आधारित ३०० गुणांसाठी, वेळ २ तास) प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील. कॅलक्युलेटर वापरास परवानगी नाही.
परीक्षा केंद्र : मुंबईसह देशभरातील १९ केंद्रे.
स्टेज-२ – कंबाईंड जीओसायंटिस्ट (मेन) एक्झामिनेशन, २०२४ (पारंपारिक पद्धतीचे पेपर्स – ६०० गुणांसाठी) (संबंधित विषयावर आधारित २०० गुणांसाठी ३ पेपर्स प्रत्येकी ३ तासांसाठी) परीक्षेच्या वेळी (नॉन-प्रोग्रॅमेबल टाईप पॉकेट) कॅलक्युलेटर वापरण्यास परवानगी असेल.
परीक्षा केंद्र : मुंबईसह देशभरातील ९ केंद्रे.
स्टेज-३ – पर्सोनॅलिटी टेस्ट/ इंटरह्यू – २०० गुणांसाठी. (यातील पात्रतेसाठी गुणांची कोणतीही अट नाही.)
अंतिम निवड स्टेज-१ – प्रीलिमिनरी एक्झामिनेशन, स्टेज-२ – मेन एक्झामिनेशन आणि स्टेज-३ – पर्सोनॅलिटी टेस्ट/ इंटरव्ह्यूमधील एकत्रित कामगिरीवर आधारित केली जाईल. समान पात्रतेचे निकष असलेल्या दोन्ही पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्जाचे शुल्क : रु. २००/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला उमेदवारांना फी माफ आहे.)
(कंबाईंड जीओ-सायंटिस्ट (प्रीलिमिनरी) एक्झामिनेशन २०२४ साठी) ऑनलाइन अर्ज https:// www. upsconline. nic. In या संकेतस्थळावर दि. १० ऑक्टोबर २०२४ (१८.०० वाजे) पर्यंत करावेत.
शंकासमाधानासाठी फोन नं. ०११-२३३८११२५/ २३३८५२७१/ २३०९८५४३.
भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड मुख्यालय अंतर्गत येणाऱ्या पुणे, मुंबई, देवळाली, अहमदनगर युनिट्समध्ये पुरुष/ महिला उमेदवारांची सिव्हीलियन पदांवर भरती. एकूण रिक्त पदे – २४.
(१) मल्टि टास्कींग स्टाफ (MTS) मेसेंजर – १३ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ९) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव).
(२) मल्टि टास्कींग स्टाफ (दफ्तरी) – ३ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).
(३) वॉशरमन – २ पदे (खुला).
(४) मजदूर – ३ पदे (इमाव – १, खुला – २).
(५) मल्टि टास्कींग स्टाफ (गार्डनर) – १ पद (खुला).
(६) कुक – २ पदे (खुला). पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि इंडियन कुकिंगचे ज्ञान आणि कामातील कौशल्य.
पद क्र. १ ते ५ साठी पात्रता : १० वी उत्तीर्ण.
इष्ट पात्रता : संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव. (अर्जासोबत अनुभवाचा दाखला जोडणे अनिवार्य आहे.)
वयोमर्यादा : सर्व पदांसाठी १८ ते २५ वर्षे. (इमाव – २८ वर्षे, अजा/ अज – ३० वर्षे)
वेतन श्रेणी : पद क्र. ६ साठी पे-लेव्हल – २ (रु. १९,९०० – ६३,२००) अधिक इतर भत्ते. पद क्र. १ ते ५ साठी पे-लेव्हल – १ (रु. १८,००० – ५६,९००) अधिक इतर भत्ते.
निवड पद्धती : लेखी परीक्षा (सामान्य बुद्धिमत्ता, रिझिनग, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन) आणि कुक व वॉशरमन पदांसाठी स्किल/ प्रॅक्टिकल टेस्ट. लेखी परीक्षा ‘GRC Kamptee Military Station’ येथे आणि कुक व वॉशरमन पदांसाठी लेखी परीक्षेतून शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांची स्किल टेस्ट Arty Centre Nashik Road Camp येथे घेतली जाईल. उमेदवारांनी २/३ दिवस राहण्याच्या तयारीने यावे. त्यांना राहण्याची सोय स्वत:च करावी लागेल.
लेखी परीक्षेसाठी उमेदवार त्यांच्या शैक्षणिक अर्हतेमधील गुणवत्तेनुसार शॉर्टलिस्ट केले जातील.
अर्जासोबत स्वयंसाक्षांकित पुढील कागदपत्रांच्या प्रती जोडणे आवश्यक.
(१) पासपोर्ट आकाराचा फोटो (स्वयं साक्षांकित)
(२) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
(३) जन्मतारखेचा दाखला
(४) जातीचा दाखला (लागू असेल त्यांना)
(५) ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट (ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी)
(६) डिस्चार्ज सर्टिफिकेट (माजी सैनिकांसाठी)
उमेदवार एकाच पदासाठी अर्ज करू शकतात. एका उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास ते बाद ठरविले जातील.
ऑनलाइन अर्ज www. hqscrecruitment. in या संकेतस्थळावर दि. ८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत करावेत.