सुहास पाटील

पोलीस पाटील पदभरती- २०२३. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय कणकवली, जि. सिंधुदुर्ग क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये पोलीस पाटील पदांची भरती. एकूण रिक्तपदे – १३४. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुकानिहाय रिक्त पदांचा तपशील –

उपविभागातील तालुकानिहाय पोलीस पाटील पदांचा तपशील –

(१) तहसीलदार कार्यालय कणकवली, ता कणकवली- ५२ पदे.

(२) तहसीलदार कार्यालय, वैभववाडी, ता. वैभववाडी – ३७ पदे.

(३) तहसीलदार कार्यालय, देवगड, ता. देवगड – ४५ पदे.

पात्रता : दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण. अर्जासोबत पुराव्याची सत्यप्रत जोडावी.

वयोमर्यादा : (दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी) २५ पेक्षा कमी नसावे व ४५ पेक्षा जास्त नसावे.

हेही वाचा >>> नोकरीची संधी

अर्जदार हा त्या महसुली गावचा स्थानिक व कायम रहिवासी असावा. (अर्जदाराने शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, इतर ओळखपत्र, स्वयंघोषणापत्र किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिद्ध होते अशा कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक.)

अर्जदाराने अर्जामध्ये स्वतचा ई-मेल व मोबाईल नंबर नमूद करणे अनिवार्य.

अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक.

अर्जदार याची अर्हता दिनांकास दोनपेक्षा जास्त अपत्य नसावीत.

मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरिता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकाऱ्याने जारी (निर्गमित) केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.

इमाव, विमाप्र, विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड या प्रवर्गातील अर्जदार यांनी भरती कालावधीकरिता वैध असलेले उन्नत आणि प्रगत गटात यामध्ये मोडत नसल्याचे (नॉन-क्रिमी लेयर) प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.

निवड पद्धती : लेखी परीक्षा – ८० गुण, तोंडी परीक्षा – २० गुण, एकूण १०० गुण. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण ८० गुण. लेखी परीक्षा १० वीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यात सामान्यज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इ. विषयांचा समावेश असेल. लेखी परीक्षेत किमान ३६ गुण (४५ टक्के) प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या पर्याप्त प्रमाणातील अर्जदारांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल.

लेखी परीक्षेसाठी उत्तरे OMR sheet वर चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शाईचा बॉलपेन वापरावा.

दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास (१) पोलीस पाटलांचे वारस (पती, पत्नी आणि दोन मुले), (२) अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्च शैक्षणिक अर्हता धारण करणारे अर्जदार, (३) माजी सैनिक अर्जदार यांना प्राधान्य देण्यात येईल.

अर्जाचे शुल्क : रु. २५/-.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु. ४/-; आरक्षित/ आर्थिक घटक प्रवर्गासाठी रु. ३/-. (अर्ज शुल्क व परीक्षा शुल्क रोखीने केवळ ऑफलाइन पद्धतीने भरणा करणे आवश्यक आहे.)

सदर पोलीस पाटील भरतीसाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित गावचे तहसीलदार कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध असून रु. २५/- एवढे अर्ज शुल्क भरणा करून ९ नोव्हेंबर २०२३ (सकाळी १०.०० ते सायं. ६.१५ वाजे) पर्यंत करावेत.

अर्जासोबत लागू असणारी कागदपत्रे जोडून उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहूनच अर्ज सादर करावयाचे आहेत.

मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, भारत सरकार अंतर्गत सायंटिफिक सोसायटी – सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटींग ( C- DAC), Bengaluru. CDAC मध्ये करार पद्धतीने भरती.

(१) प्रोजेक्ट इंजिनिअर – ९० पदे.

कामाचे ठिकाण : बेंगलुरू.

पात्रता : (i) B. E./ B. Tech. कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्स्ट्रूमेंटेशन/ एआय / सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग/ मशिन लर्निंग/ डेटा सायन्स/ ब्लॉक चेन/ क्लाऊड कॉम्प्युटिंग/ बायोइन्फॉरमॅटिक्स/ कॉम्प्युटर अॅण्ड इन्फॉरमेशन सायन्स/ टेलीकम्युनिकेशन इंजिनीअरिंग/ क्वांटम फिजिक्स/ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग इ. किमान ६० टक्के गुणांसह किंवा समतूल्य CGPA सह उत्तीर्ण किंवा सायन्स/ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन किंवा संबंधित डोमेनमधील पदव्युत्तर पदवी किमान ६० टक्के गुणांसह किंवा समतूल्य CGPA सह उत्तीर्ण किंवा M.E./ M.Tech. किंवा Ph.D.

अनुभव : ०-४ वर्षांपर्यंत.

डिझायरेबल स्किल्स सेट्स : ( i) Embeded System, VLSI Design and IOT Technologies – Verilog HDL Coding & Verification etc. सायबर सिक्युरिटी हार्डवेअर सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन्सेस – VLSI Design (Digital/ Analog) – Firmware/ Software/ Embeded System Design – VLSI Architecture/ VLSI Circuit/ VLSI System/ Microelectronics Circuit Design etc.

एकत्रित वेतन : रु. ४.४९ लाख ते ७.११ लाख प्रती वर्ष.

(२) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ – ८ पदे (बेंगळूरु).

पोस्ट – (ए) कंटेंट रायटर ( Content Writer) – Embeded System Design Blended Learning Program – AI Blended Learning Program – High Performance Computing blended learning program – Blended learning program of IEEE.

(बी) डेटा मॅनेजमेंट(सी) डॉक्युमेंटेशन(डी) आऊटरिच(इ) ऑपरेशन्स मॅनेजमेंट.

पात्रता : पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा पदव्युत्तर पदवी. (शक्यतो एमबीए (एचआर) किंवा समतुल्य पदवीला किमान ५० टक्के गुण आवश्यक.)

अनुभव : पदवीधर उमेदवारांना संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव. पदव्युत्तर पदवीधारकांस अनुभवाची आवश्यकता नाही. एकत्रित वेतन रु. ३ लाख प्रतीवर्ष.

दोन्ही पदांसाठी करार पद्धतीने नेमणूक सुरुवातीला ३ वर्षांसाठी दिली जाईल.

आणि ३/ ५/ ७/ १० वर्षं अनुभव आवश्यक असलेली इतर पदे. (यातील काही नियमित पदे) कृपया सविस्तर माहिती www. careers. cdac. in या संकेतस्थळावर पहावी.

वयोमर्यादा : दोन्ही पदांसाठी अर्ज करण्याच्या दिवशी ३५ वर्षेपर्यंत.

निवड पद्धती : ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा (इंग्लिश, रिझनिंग, न्यूमरिकल अॅबिलिटी) या विषयांवर प्रत्येकी २५ प्रश्न आणि डोमेन नॉलेजवर आधारित ५० प्रश्न, एकूण १५० प्रश्न, १५० गुण, एकूण वेळ १२० मिनिटे.

पात्रतेसाठी किमान ४० टक्के गुण आवश्यक.

वरील पदांसाठी कोणताही इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही.

अर्जाचे शुल्क : कोणतेही अर्जाचे शुल्क नाही.

शंकासमाधानासाठी recruitment@cdac. in

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन अर्ज www. careers. cdac. in या संकेतस्थळावर दि. १७ नोव्हेंबर २०२३ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत. लेखी परीक्षेची तारीख ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.