रोहिणी शहा

भूरूपशास्त्र

प्राकृतिक भूगोलामधील संकल्पना व मुद्दे हे भूरूप निर्मितीशी संबंधित घटक म्हणून अभ्यासणे आयोगाला अपेक्षित आहे. त्यामुळे या घटकांची ‘भूरूप निर्मितीमधील भूमिका’ तयारी करताना जास्त महत्त्व देऊन अभ्यासावी लागणार आहेच. पण त्यांचा मूलभूत अभ्यासही तेवढाच महत्त्वाचा आहे. या घटकांचा व्यवस्थित संकल्पनात्मक अभ्यास झाल्याशिवाय त्यांची ‘भूरूप निर्मितीमधील भूमिका’ समजून घेता येणार नाही हे लक्षात घ्यायला हवे.
पृथ्वीचे अंतरंग- रचना आणि घटना -अंतर्गत व बहिर्गत शक्ती, खडक व खनिजे हे मुद्दे भूमी स्वरूपांच्या उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक म्हणून अभ्यासायचे आहेत. पृथ्वीचे अंतरंग अभ्यासताना तिच्या अंतर्भागाची रासायनिक व भौतिक रचना, त्यांची वैशिष्टय़े, वितरण आणि त्यामुळे तयार होणाऱ्या अंतर्गत शक्ती असे मुद्दे यामध्ये पहायला हवेत. खडक, खनिजे यांचा परिणामही व्यवस्थितपणे समजून घ्यायला हवा.

Union Finance Minister Nirmala Sitharaman, indexation, property, budget 2024, marathi news
विश्लेषण :’इंडेक्सेशन’विना जुन्या, वडिलोपार्जित घराच्या विक्रीवर अधिक कर भरावा लागेल? अर्थसंकल्पातील ही तरतूद वादग्रस्त कशी?
Union Budget 2024 Key Announcements in Marathi
Budget 2024 : लघु व मध्यम उद्योगांना अर्थसंकल्पात मोठे बळ
Union Budget 2024 Key Announcements in Marathi
Budget 2024 : ही भविष्यामध्ये मोठी गुंतवणूक!
Nirmala Sitharaman
Union Budget 2024 : कसा असेल अर्थसंकल्प? निर्मला सीतारामण कधी पोहचणार संसदेत? जाणून घ्या हे मुद्दे
In depth and easy expert analysis of the budget from Loksatta this year as well
‘लोकसत्ता’कडून यंदाही अर्थसंकल्पाचा सखोल, सुलभ तज्ज्ञवेध!
pli scheme to boost job creation
‘पीएलआय’च्या धर्तीवर रोजगारवाढीशी संलग्न प्रोत्साहनपर तरतुदी अर्थसंकल्पात आवश्यक – आयएमसी
wedding card, environmental conservation,
अंबानींची लग्नपत्रिका असेल वेगळी, पण चर्चा मात्र ‘या’ लग्नपत्रिकेचीच
MPSC Mantra  Gazetted Civil Services Joint Prelims Exam Intelligence Test
MPSC मंत्र : राजपत्रित नागरी सेवा सयुक्त पूर्व परीक्षा: बुद्धिमत्ता चाचणी

या व्यतिरिक्त भूमी स्वरूपांच्या विकासावर ज्या घटकांचा परिणाम होतो, ज्यांची महत्त्वाची भूमिका असते त्यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. यामध्ये मूळ स्त्रोताचा उठाव/ उंची, खडकांची भौगोलिक रचना, हवामान, ऊर्जा, जैविक क्रिया आणि मानवी क्रिया यांचा समावेश होतो. या घटकांचा भूरूप निर्मितीवरील परिणाम समजून घ्यायला हवा.

भूरूपचक्रांची संकल्पना हा मुद्दा बहिर्गत शतींचे कार्य या घटकांतर्गत येईल. यामध्ये नदी, हिमनदी, वारा व सागरी लाटांशी संबंधित भूमी स्वरूपे अभ्यासायची आहेत. या कारक घटकांच्या विदरण आणि संचयनाच्या कार्यातून विकसित होणारी भूरूपे आणि त्यामध्ये समाविष्ट भूरुपिकीय प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. शक्य असल्यास भूरूपांच्या आकृत्यांसह टेबलमध्ये नोट्स काढाव्या. त्यामुळे आकृत्यांचा प्रश्न व्यवस्थित सोडवता येईल.
भारतीय उपखंडाची उत्क्रांती कशी झाली याचा भूरूपशात्रीय मुद्यांच्या आधारे अभ्यास करायला हवा. भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग- हिमालयीन प्रदेश, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार, वाळावंट, किनारी प्रदेश व बेटे यांचे स्वरूप, विस्तार, रचना, वैशिष्टय़े, भौगोलिक व हवामानशास्त्रीय महत्त्व, आर्थिक महत्त्व हे पैलू अभ्यासायला हवेत. यामधील नदीप्रणाली व पर्वतप्रणालींचा अभ्यास दक्षिण उत्तर आणि पूर्व पश्चिम अशा क्रमाने केल्यास परिणामकारक ठरेल.

महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना आणि येथील भूरूपिकीय वैशिष्टय़े अभ्यासताना नदी व पर्वत प्रणालींचा उत्तर ते दक्षिण अशा क्रमाने सलगता लक्षात घेऊन अभ्यास करावा. या ठळक भूरूपांनंतर महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृष्ये/भूमी स्वरूपे- टेकडय़ा, कटक, पठारी प्रदेश, कुंभगर्ता, धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण यांचा आढावा घ्यावा. यामध्ये अशा भूरूपांचे स्थान, वैशिष्टय़े, भौगोलिक तसेच पर्यटनातील महत्त्व असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

हवामानशास्त्र

वातावरण : वातावरणाची संरचना, घटना व विस्तार अभ्यासताना त्याचे ऋतू व हवामानावरील परिणाम समजून घ्यायला हवेत.
हवा व हवामानाची अंगे (Elements of weather and climate) अभ्यासताना तापमान, आद्र्रता, पर्जन्यमान, वायुदाब, वारे हे महत्त्वाचे घटक व त्यांचा हवामानावरील परिणाम यांतील संकल्पनात्मक भाग महत्त्वाचा आहे. कार्यकारण संबंध जोडून या संकल्पनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
सौर ऊर्जा – पृथ्वीपृष्ठारील उष्णतेचे संतुलन, तापमान- पृथ्वीपृष्ठारील तापमानाचे ऊध्र्व व क्षितिजसमांतर वितरण या मुद्दय़ांचा अभ्यास उष्णतेच्या संतुलनावर परिणाम करणारे घटक, संतुलनाचा परिणाम, तापमानाच्या वितरणास कारक घटक व त्याचा परिणाम समजून घेऊन करावा.
हवेचा दाब, वारे, ग्रहीय व स्थानिक वारे यांचे कारक घटक व परिणाम समजून घ्यावेत.

मोसमी वारे (मान्सून), पर्जन्याचे वितरण, अवर्षण व पूर व त्यांच्याशी निगडीत समस्या यांचा महाराष्ट्रापुरता भाग अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असला तरी भारतीय पर्जन्याचा आढावा घेणे या मुद्दय़ाच्या आकलनासाठी आवश्यक आहे.

मान्सूनची निर्मिती, ?तूंची निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी वेगवेगळय़ा घटकांमध्ये समाविष्ट भौगोलिक प्रक्रियांच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत :

भौगोलिक व वातावरणीय पार्श्वभूमी; घटना घडू शकते/ घडते ती भौगोलिक ठिकाणे प्रत्यक्ष घटना/ प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे/ प्रक्रियेचे परिणाम; पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/ प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिक महत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/ प्रक्रिया (current events)

पर्यावरण भूगोल

पर्यावरण भूगोल आणि कृषी घटकातील पेपर चारमधील पर्यावरणीय घटक यांचा एकत्रित अभ्यास केल्यास जास्त उपयोगी ठरतो. विश्लेषणात्मक व उपयोजित प्रश्न सोडविण्यासाठी या घटकातील संकल्पना समजून घेऊन केलेला अभ्यास आवश्यक आहे.
परिसंस्था घटक अभ्यासताना त्यातील जैविक आणि अजैविक घटक कोणते व त्यांचे एकमेकांवरील अवलंबित्व व परिसंस्थेतील भूमिका समजून घ्यायला हवी.

ऊर्जा प्रवाह, ऊर्जा मनोरा, अन्न साखळी, अन्न जाळे हे घटक एकत्रितपणे अभ्यासायचे आहेत. परिसंस्थेमधील ऊर्जेचा प्रवाह, अन्न साखळी/ जाळय़ातील विविध घटकांमध्ये होणारे ऊर्जेचे हस्तांतरण आणि त्यातून तयार होणारा ऊर्जेचा पिरॅमिड अशा प्रकारे परस्पर संबंढ लक्षात घेऊन हा मुद्दा अभ्यासावा.
पर्यावरणीय ऱ्हासाची कारणे, त्यावर परिणाम करणारे घटक, स्वरूप, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या व त्यांवरील उपाय व पर्यावरणाच्या संधारणाची गरज, त्यासाठीचे उपाय, होणारे प्रयत्न असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

जागतिक पारिस्थितिकीय असंतुलन, जैवविविधतेतील ऱ्हास यांचा अभ्यास कारणे, स्वरूप, परिणाम, समस्या आणि संभाव्य उपाय अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा.जागतिक तापमान वाढ, हरितगृह परिणाम या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्या. त्यांचा अभ्यास पुढील मुद्यांच्या आधारे करावा – कारणे- विशेषत: CO, CO2, CH4, CFCs, NO यांची वातावरणातील पातळी, स्वरूप, परिणाम, समस्या, संभाव्य उपाययोजना
जैवविविधतेचा ऱ्हास व जागतिक तापमानवाढ यांच्यामुळे उद्भवलेल्या समस्या म्हणून मानव व वन्यजीव संघर्ष, निर्वनीकरण, आम्ल पर्जन्य, महाराष्ट्रातील ऊष्मावृद्धी केंद्रे (Heat Islands)) या अभ्यासक्रमातील घटकांचा विशेष अभ्यास आवश्यक आहे. यांचा अभ्यासही कारणे, स्वरूप, समस्या आवश्यक उपाय योजना या मुद्दय़ांच्या आधारे करावा.

पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे अभ्यासताना महत्त्वाच्या व्याख्या, तरतुदी, शिक्षेच्या तरतुदी, अपवाद असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
पर्यावरणीय आघाताचे मूल्यमपन (एकअ) व कार्बन क्रेडिटस या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात व त्यांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कशा प्रकारे होतो हे समजून घ्यावे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल घटकाच्या तयारीबाबत या व पुढील लेखांमध्ये चर्चा करण्यात येत आहे. यातील प्राकृतिक व पर्यावरणीय घटाकाबाबत या लेखामध्ये पाहू.