फारूक नाईकवाडे

आर्थिक व सामाजिक विकास घटकाच्या पारंपरिक व संकल्पनात्मक मुद्दय़ांची तयारी कशी करावी याबाबत मागील लेखामध्ये पाहिले. या लेखामध्ये अर्थव्यवस्था घटकाच्या अद्ययावत होत राहणाऱ्या मुद्दय़ांची म्हणजेच चालू घडामोडींच्या तयारीबाबत पाहू.

article about income tax reforms in india
लेख : राजकीय-वित्तीय लोकशाहीच्या मिलाफासाठी..
special provisions in constitution of india for sc st and obc
संविधानभान : सामाजिक न्यायाची गुंतागुंत
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

 संकल्पानांच्या आधारे चालू घडामोडींचा अभ्यास करणे हाच अर्थव्यवस्था या विषयाच्या अभ्यासाचा बेस आहे. या क्षेत्रामध्ये घडणाऱ्या ‘चालू घडामोडी’ या विषयाला नेहमीच गतिमान व अद्ययावत ठेवत असतात. त्यामुळे राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या ठळक व महत्त्वाच्या अर्थ विषयक घडामोडी, दूरगामी परिणाम करणारे आंतरराष्ट्रीय ठराव, करार, प्रकाशित होणारे नियत कालिक अहवाल, वेगवेगळे जागतिक व राष्ट्रीय पातळीवरील निर्देशांक अभ्यासणे अर्थ व्यवस्था विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक आहे. याबाबतीत भर द्यायचे मुद्दे कोणते, हे पाहू.

आकडेवारी

सार्वजनिक वित्त

ऊर्जा, कृषी उत्पादन, वेगवेगळया क्षेत्रांचा  GDP मधील वाटा वरील स्त्रोतांमधून अभ्यासायचा आहे.

नवे करांचे दर, नवे व्याजदर, सार्वजनिक वित्तामधील सरकारच्या उत्पन्नाचे स्त्रोत व त्यांची टक्केवारी आणि खर्चाचे मुद्दे व त्यांची टक्केवारी, परकीय कर्ज इत्यादीबाबतीत अद्ययावत आकडेवारी अर्थसंकल्पातून जमवायची आहे.

परदेशी व्यापार

परदेशी व्यापारातील सर्वात मोठे व कमी भागीदार, परकीय गुंतवणूक (सर्वात जास्त व कमी करणारे देश तसेच कोणत्या राज्यात सर्वात जास्त / कमी गुंतवणूक, कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त /कमी गुंतवणूक इत्यादी) इत्यादी बाबतची अद्ययावत आकडेवारी माहिती असणे आवश्यक आहे.

आयात व निर्यातीच्या बाबतीत सर्वात कमी व जास्त या बाबी देश, देशंचा समूह, वस्तू, सेवा, उत्पादने या मुद्दय़ांबाबत पहायला हव्यात. जागतिक व्यापारातील वाटा हा मुद्दाही उत्पादन सेवांबाबत महत्त्वाचा आहे.

ही आकडेवारी भारताचा आर्थिक पाहणी अहवाल व महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल यातूनच पहायची आहे.

आर्थिक करार

भारताचे इतर देशांशी झालेले महत्त्वाचे आर्थिक करार संबंधित देश व मुख्य तरतुदी अशा कॉलममध्ये तयार करावेत.

महाराष्ट्रातील काही प्रकल्प, योजना यांसाठी आंतरराष्ट्रीय संस्था / दुसऱ्या देशांशी करार झालेला असल्यास त्याचाही अभ्यास आवश्यक आहे.

लोकसंख्या

साक्षरता, लोकसंख्येची रचना (वय, लिंग, गुणोत्तर), बाल लिंग गुणोत्तर, नागरी व ग्रामीण लोकसंख्या या मुद्दय़ांच्या आधारे देशातील राज्ये व राज्यातील जिल्ह्यांचा तुलनात्मक अभ्यास करायला हवा.

यामध्ये प्रत्येक मुद्दय़ातील पहिले व शेवटचे तीन घटक, महाराष्ट्राच्या मागची व पुढची राज्ये अशी तथ्ये मांडून नोट्स काढता येतील.

राज्यातील जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारेच पहिले व शेवटचे तीन तीन जिल्हे घेऊन नोट्स काढता येतील.

केंद्र व राज्य सरकारच्या प्रस्तावित / नव्या योजना

केंद्र व राज्य शासनाच्या विशेष प्रसिद्धी दिल्या जाणाऱ्या योजनांवर भर देऊन आरोग्य, शिक्षण, रोजगार, कृषी, लघु उद्योग, सामाजिक विमा, सामाजिक प्रवर्गासाठीच्या विशेषत: महिलांसाठीच्या योजना यांचा अभ्यास करावा.

योजनेचे ध्येय, उद्दिष्टे, स्वरूप, खर्चाची विभागणी, अंमलबजावणी करणारी यंत्रणा, असल्यास लाभार्थ्यांचे निकष, शिफारस करणारा आयोग / समितीचे नाव ई. बाबी प्रस्तावित योजनांच्या संदर्भात पहाव्यात.

महत्त्वाचे जागतिक अहवाल व निर्देशांक

विविध आंतरराष्ट्रीय अहवालातील भारताचे, शेजारील देशांचे स्थान (व प्राप्त अंक) आणि या अहवालामधील प्रथम व शेवटच्या स्थानावरील देश माहीत असायला हवेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व महाराष्ट्र या तिन्ही पातळय़ांवरील मानव विकास अहवाल ( HDI) माहीत असावेत.

UNO, जागतिक बँक समूह व त्यांच्या सहयोगी संस्थांकडून प्रकाशित होणारे जागतिक भूक निर्देशांक, लिंगभाव असमानता निर्देशांक, ईझ ऑफ डुईंग बिझनेस अहवाल, जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक, जागतिक जोखीम निर्देशांक अशा निर्देशांकांबाबत अद्ययावत माहिती करून घ्यावी. चालू घडामोडींच्या अद्ययावत संदर्भ साहित्यातून ही आकडेवारी मिळते मात्र यासाठी संबंधित संस्थांचे संकेतस्थळ वापरणे जास्त उपयुक्त ठरते.

दारिद्रय़/ भूक/ लिंगभाव असमानता/ मानव विकास या निर्देशांकाच्या मापनाची पद्धत, त्यातील घटक यांची माहिती असायला हवी.

महाराष्ट्राचा विशेष संदर्भ

आयोग जेव्हा महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हणतो तेव्हा याबाबतीतल्या महाराष्ट्र विषयक अद्ययावत गोष्टी उमेदवाराला माहीत असणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील कृषी विषयक बाबी, ग्रामीण, नागरी, पायाभूत सुविधा इत्यादी बाबीसुद्धा चालू घडामोडीच्या अनुषंगाने अभ्यासणे आवश्यक आहे.

केंद्र किंवा राज्य शासनाकडून प्रस्तावित किंवा मंजूर करण्यात आलेले प्रकल्प, योजना, केंद्र योजना / प्रकल्पातील महाराष्ट्राचा वाटा या बाबी नेमकेपणाने माहित असायला हव्यात. (उदाहरणार्थ महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन्स, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग इत्यादी) स्मार्ट सिटी प्रकल्पातील, स्वच्छ सर्वेक्षणातील महाराष्ट्राचा परफॉर्मन्स माहीत असायला हवा.

राष्ट्रीय स्तरावरील उत्पादने, सेवा, परकीय गुंतवणूक, आयात, निर्यात इत्यादी. बाबतीतील महाराष्ट्राचा क्रमांक दरवर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालातून माहीत करून घ्यावा. त्याच बरोबर राज्याच्या बरोबर मागील व पुढील तसेच क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावरील राज्ये इत्यादी बाबी तुलनात्मक तक्त्यामध्ये नोंदवून पक्क्या कराव्यात.

जनगणना, परकीय गुंतवणूक या बाबतची मागील वर्षीची तुलना समजून घेतली तर निश्चितच उपयोगी ठरते. यामुळे बहुविधानी प्रश्नांची तयारी नेमकेपणाने होते.