Nikhil Kamath Success Story In Marathi : ९ ते ५ नोकरी करावी की स्वतःचा व्यवसाय या दोन्ही पर्यायांमध्ये अनेक जण अडकून असतात. अशातच काही लोक आपल्या आवडीचे क्षेत्र निवडतात, तर काही कुटुंबाचा भार सांभाळण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरीची निवड करतात. तर अनेक जण नक्की काय काम करायला आवडतं, आपल्याला नेमकं कोणत्या क्षेत्रात काम करायचे इथपर्यंत पोहचण्यासाठी काही जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून बघतात. तर आज आपण अशाच एका व्यक्तीचा प्रवास जाणून घेणार आहोत, ज्याला कॉल सेंटरमध्ये काम करताना जाणवले की, त्याची खरी आवड फायनान्शियल क्षेत्रात आहे.

तर आज आपण देशातील सर्वात मोठ्या ब्रोकरेज फर्मपैकी एक असलेल्या झिरोधा कंपनीचे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. निखिल यांनी ३८ व्या वर्षी अब्जाधीशाचा दर्जा मिळवला आहे. त्यांनी खूप कमी वयात मोठे यश मिळवले आहे. पण, हे यश मिळवणे वाटते तितके सोपे नव्हते. त्यांच्या कठोर परिश्रमाने त्यांनी २.६ अब्ज डॉलर्स (सुमारे २२,००० कोटी रुपये) संपत्तीचा प्रवास पूर्ण केला आहे. चला तर त्यांच्या प्रवासाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

वयाच्या १५ व्या वर्षी पहिला व्यवसाय सुरू केला

निखिल कामथ नुकतेच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या २०२५ च्या पदवीदान समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तिथे त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. तर निखिल कामथ यांनी वयाच्या १५ व्या वर्षी शाळा सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. निखिल यांचा व्यवसाय मोबाइल विकण्याचा होता. निखिल कामथ यांच्या म्हणण्यानुसार हा एक चांगला व्यवसाय होता. त्यांच्याकडे पुरेशी इन्व्हेंट्री होती. जोपर्यंत इन्व्हेंट्री पूर्णपणे संपली तोपर्यंत त्यांच्याकडे सुमारे १० ते २० फोन होते.

वयाच्या १७ व्या वर्षी पहिली नोकरी

निखिल कामथ म्हणाले की, त्यांना वयाच्या १७ व्या वर्षी पहिली नोकरी मिळाली. त्यांची पहिली नोकरी कॉल सेंटरमध्ये होती. ते म्हणाले, “१७ वर्षांच्या मुलासाठी संध्याकाळी ५ ते पहाटे २ च्या शिफ्टमध्ये काम करताना त्यांना मजा वाटायची, कारण या वयात बरेच जण कॉलेजला असतात. पण, नोकरीतून फारसे पैसे मिळत नव्हते. त्यांचा पहिला पगार सुमारे ८,००० रुपये होता, निखिल रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करायचे, त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस त्यांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे घालवता यायचा. यादरम्यान त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी टीमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्याला पगारापेक्षा कमिशनमधून जास्त कमाई होऊ लागली.

अशी झाली झिरोधाची सुरुवात

कॉल सेंटरच्या नोकरीबरोबर काम करणाऱ्या लोकांबरोबर शेअर्सची देवाणघेवाण करत असताना त्यांना जाणवले की, त्याचे खरे ध्येय फायनान्शियल क्षेत्रातील लोकांना (आर्थिक जगातील लोकांना) मार्गदर्शन करणे आहे. त्यानंतर त्यांनी २०१० मध्ये त्यांच्या भावाबरोबर झिरोधा सुरू केले. नंतर झिरोधा कंपनीने देशातील ब्रोकरेज मार्केटमध्ये क्रांती घडवून आणली. मग हळू हळू त्यांची कंपनी देशातील सर्वात मोठ्या रिटेल स्टॉक ब्रोकरेज कंपन्यांपैकी एक बनली, ज्यामुळे व्यापाराची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली; त्यामुळे सामान्य लोकांसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक आणि व्यापार करणे अगदी सोपे झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर सध्याच्या आकडेवारीनुसार फोर्ब्सच्या यादीत निखिल कामथ १४४९ व्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती २.६ अब्ज डॉलर्स (सुमारे २२,००० कोटी रुपये) आहे.