न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (एनपीसीआईएल) ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. याअनुसार, एकूण ३३५ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ०३ मार्च २०२४ पासून सुरू झाली आहे, जी ०४ एप्रिल २०२४ पर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारीख लक्षात घेऊन वेळेवर अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना विहित पोर्टल /www.npcilcareers.co.in वर भेट देऊन अर्ज करावा लागेल.

NPCIL Recruitment 2024:: या रिक्त पदांशी संबंधित महत्त्वाच्या तारखा आहेत

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: मार्च ०३, २०२४

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: एप्रिल ०४, २०२४

NPCIL Recruitment 2024: या विभागात होईल भरती

NPCIL ने वेगवेगळ्या विभागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यामध्ये, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, टर्नर, मशीनिस्ट आणि वेल्डर यांचा समावेश आहे. तसेच, उमेदवारांची वयोमर्यादा १४ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावी. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार दीडपट सूट मिळते.

अधिकृत अधिसुचना – https://npcilcareers.co.in/RAPSTA20241503/documents/advt.pdf

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

NPCIL Recruitment 2024:: ऑनलाइन अर्ज कसा करावा

उमेदवाराला प्रथम अधिकृत वेबसाइट https://npsilcareers.co.in/ वर भेट द्यावी लागेल.
आता homepage वर NPCIL अप्रेंटिस भरती 2024 लिंकवर क्लिक करा.
आता आवश्यक तपशील भरा. अर्ज सादर करा. आवश्यक कागदपत्रे जमा करा.
भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट तुमच्याकडे ठेवा.

या रिक्त पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, भरतीचा फॉर्म भरताना सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा, कारण नियमांकडे दुर्लक्ष केल्यास फॉर्म स्वीकारला जाणार नाही.