सुहास पाटील
यूपीएससी परीक्षांचे कॅलेंडर
२०२४ मध्ये UPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे कॅलेंडर जाहीर झाले आहे. UPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे नाव, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक, परीक्षा सुरू होण्याचा दिनांक, पात्रतेच्या अटी इ. तपशील पुढीलप्रमाणे –
(II) पदवी उत्तीर्ण पात्रतेचे निकष असलेल्या परीक्षा –
(३) सिव्हील सर्व्हिसेस (प्रीलिमिनरी) एक्झामिनेशन-२०२४ – CS(P) Examination 2024.
(४) इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (प्रीलिमिनरी) एक्झामिनेशन-२०२४ – (through CS(P) Exam 2024).
वयोमर्यादा : २१ ते ३२ वर्षे. (CS(P) Exam U IFS(P) Exam साठी)
निवड पद्धती : ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा, पेपर-१ जनरल स्टडीज. पेपर-२ जनरल स्टडीज. प्रत्येकी २०० गुणांसाठी वेळ २ तास. (जनरल स्टडीज पेपर-२ फक्त पात्रता स्वरूपाचा असेल. किमान पात्रतेचे गुण ३३ टक्के).
पेपर-१ मधील गुणवत्तेवर आधारित मुख्य परीक्षेसाठी रिक्त पदांच्या १२ ते १३ पट उमेदवार निवडले जातील.
(५) सिव्हील सर्व्हिसेस (मेन) एक्झामिनेशन, २०२४ – (CS(P), २०२४ मधील उत्तीर्ण उमेदवार या परीक्षेस बसू शकतात.)
परीक्षा सुरू होण्याचा दिनांक – २० सप्टेंबर २०२४ (५ दिवस)
निवड पद्धती – लेखी परीक्षा – पात्रता स्वरूपाचे दोन पेपर्स प्रत्येकी ३०० गुणांसाठी वेळ प्रत्येकी ३ तास. पेपर ‘ए’ – राज्यघटनेच्या ८ व्या शेड्यूलमधील कोणतीही एक भाषा. पेपर ‘बी’ – इंग्लिश.
(i) गुणवत्ता निश्चित करण्यासाठी घेण्यात येणारे पेपर्स (लेखी परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची) (पेपर- १ ते पेपर-७ प्रत्येकी २५० गुणांसाठी, वेळ प्रत्येकी ३ तास, एकूण १,७५० गुण, पेपर-१ – निबंध लेखन, पेपर-२ ते पेपर-५ – जनरल स्टडीज, पेपर-६ व पेपर-७ ऑप्शनल विषयावरील पेपर्स. (दिलेल्या विषयांच्या यादीतून कोणताही एक विषय निवडावा.)
(ii) पर्सोनॅलिटी टेस्ट – २७५ गुण. मुख्य परीक्षा एकूण – २०२५ गुणांसाठी घेतली जाते. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील लेखी परीक्षा १७५० गुण, मुलाखत २७५ गुण, एकूण २०२५ गुणांमधून केली जाते.
(६) इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस (मेन) एक्झामिनेशन, २०२४ – (CS(P) २०२४ मधील उत्तीर्ण उमेदवार या परीक्षेस बसू शकतात.
परीक्षा सुरू होण्याचा दिनांक २४ नोव्हेंबर, २०२४ (१० दिवस).
निवड पद्धती – लेखी परीक्षा – वर्णनात्मक स्वरूपाची – एकूण ६ पेपर्स, वेळ प्रत्येकी ३ तास. पेपर-१ जनरल इंग्लिश, ३०० गुण. पेपर-२ जनरल नॉलेज – ३०० गुण.
पेपर-३ ते पेपर-६ (यादीत दिलेल्या विषयांपैकी दोन विषय निवडावेत.) प्रत्येक विषयावरील दोन पेपर्स प्रत्येकी २०० गुणांसाठी. एकूण १४०० गुण. लेखी परीक्षेतून रिक्त पदांच्या २ किंवा ३ पट उमेदवार इंटरह्यूकरिता निवडले जातील.
पर्सोनॅलिट टेस्ट – ३०० गुण. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील लेखी परीक्षा व इंटरह्यूमधील गुणवत्तेनुसार.
(७) कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (I) २०२४ – (CDSE(I) २०२४)
CDS II २०२३ मधील रिक्त पदे – ३४९ (IMA – १००, INA – ३२, AFA – ३२, OTA (Men) – १६९, OTA Women – १६)
जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक २० डिसेंबर २०२३. परीक्षा सुरू होण्याचा दिनांक २१ एप्रिल २०२४ (१ दिवस).
(८) कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (II) २०२४ –
जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक १५ मे २०२४. परीक्षेचा दिनांक १ सप्टेंबर २०२४.
या परीक्षेतून पुढील अॅकॅडमीजमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या कोर्सेससाठी प्रवेश दिला जातो.
(i) इंडियन मिलिटरी अॅकॅडमी (IMA), डेहराडून – आर्मी विंग. (ii) इंडियन नेव्हल अॅकॅडमी (INA), इझिमाला, केरळ – नेव्ही विंग.
(iii) एअरफोर्स अॅकॅडमी (AFA), हैदराबाद – एअरफोर्स विंग (प्री फ्लाईंग).
(iv) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (OTA), चेन्नई – आर्मी विंग पुरुष/महिला उमेदवार.
क्रमश: