सुहास पाटील
ऑर्डनन्स फॅक्टरी, खामरिया, जबलपूर, मध्यप्रदेश, (Unit of Munitions India Ltd.) (संरक्षण मंत्रालयांतर्गत भारत सरकारचा उपक्रम). ( Advt. No. ०३/अ/ RC/ Tenure/ DBW/०२/२०२३) ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट ( AOCP) अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग करून NCVT परीक्षा उत्तीर्ण केली आहे, अशा उमेदवारांची ‘डेंजर बिल्डिंग वर्कर ( DBW)’ पदांवर ठरावीक मुदतीसाठी करारपद्धतीने भरती.
एकूण रिक्त पदे : ११९ (अजा – २६, अज – ३९, इमाव – ११, ईडब्ल्यूएस् – २०, खुला – २३) (माजी सैनिकांसाठी २० पदे राखीव) (दिव्यांग उमेदवार या पदांसाठी पात्र नाहीत.)
वेतन : मूळ वेतन रु. १९,९००/- + डी.ए. रु. ९,१५४/-. (उमेदवारांची कामगिरी पाहून दरवर्षी ३ टक्के वेतन वाढ दिली जाईल.)
पात्रता : ऑर्डनन्स फॅक्टरी आताची म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) मधून अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट (AOCP) अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग पूर्ण करून NCVT किंवा NAC परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
वयोमर्यादा : दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी १८ ते ३५ वर्षे. (कमाल वयोमर्यादा – इमाव – ३८ वर्षे, अजा/ अज – ४० वर्षे, माजी सैनिक सेना दलातील सेवा ३ वर्षे)
अर्जाचे शुल्क : ०
कामाचे स्वरूप : मिलिटरी एक्स्प्लोझिव्हज आणि अॅम्युनिशनचे उत्पादन आणि हाताळणी.
निवड पद्धती : NCVT आणि ट्रेड टेस्ट/ प्रॅक्टिकल टेस्टमधील गुणवत्तेनुसार. NCVT मधील गुणवत्तेनुसार उमेदवारांना ट्रेड टेस्टसाठी बोलाविले जाईल. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापासून एक महिन्याच्या आत ऑर्डनन्स फॅक्टरी, खामरिया येथे १०० गुणांसाठी ट्रेड टेस्ट घेतली जाईल.
अंतिम निवड NCVT मधील गुण आणि ट्रेड टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्टमधील एकत्रित गुणवत्तेनुसार केली जाईल. NCVT परीक्षेतील गुणांना ८० टक्के वेटेज व ट्रेड टेस्टमधील गुणांना २० टक्के वेटेज दिले जाईल. यानंतर शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल.
इमावच्या उमेदवारांनी इमावच्या दाखल्यासोबत Appendix- I मधील घोषणापत्र भरावयाचे आहे.
रजा : उमेदवारांना दर महिन्याला २.५ दिवस रजा क्रेडिट केली जाते आणि अशी एकूण ३० दिवस रजा मिळू शकते आणि ती १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर विकू शकतात. (Encashed)
DBW उमेदवारांना हॉस्टेल अकोमोडेशन न दिल्यास HRA दिला जाईल. उमेदवारांची नेमणूक सुरुवातीला १ वर्षासाठी केली जाईल. नेमणूकीनंतर उमेदवारांची दर सहा महिन्यांनी कामगिरी तपासली जाईल.
कराराचा कालावधी आणखीन ३ वर्षांसाठी वाढविला जाऊ शकतो.
विस्तृत जाहिरात आणि अर्जाचा नमुना Munitions India Ltd च्या https:// munitionsindia. in/ careers/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जाहिरातीमध्ये दिलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज ज्यावर पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून (समोरील बाजूस स्वयं साक्षांकीत करून) आणि स्वयं साक्षांकीत केलेल्या आवश्यक त्या कागदपत्रांसह पुढील पत्त्यावर दि. २१ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. अर्जाच्या लिफाफ्यावर APPLICATION FOR THE POST OF ‘TENURE BASED DBW PERSONNEL ON CONTRACT BASIS ’ असे स्पष्ट शब्दात लिहावे. The general Manager, Ordanance Factory, Khamaria, Dist. Jabalpur, Madhya Pradesh – 482005.