लोकेश थोराते

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाच्या यूपीएससी सामान्य अध्ययन मुख्य परीक्षा तयारीच्या लेखमालिकेत मागील लेखात आपण भूगोल विषयाचे महत्त्व, त्याचे स्वरूप व प्रश्नसंख्या यांची चर्चा केली. आज आपण भूगोलाच्या अभ्यासक्रमासंदर्भात सविस्तर चर्चा करू.

barti Free coaching for UPSC MPSC
यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण, १३ हजार रुपये मासिक विद्यावेतनही मिळणार, फक्त येथे अर्ज करा
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
loksatta editorial on intention of centre to levy gst on petrol diesel
अग्रलेख : अवघा अपंगत्वी आनंद!  
Mpsc Mantra Gazetted Civil Services Joint Prelims Common
Mpsc मंत्र: राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षासामान्य विज्ञान
Terror Attacks in Jammu and Kashmir,
अग्रलेख : दहशत आणि दानत!
Loksatta editorial The question of maintaining the credibility of exams whether for college admissions or jobs
अग्रलेख: परीक्षा पे चर्चा!
Loksatta editorial Horrific Murder In Vasai Boyfriend Stabs Girlfriend To Death With Iron Spanner
अग्रलेख: लक्षणाची लक्तरे..
Scholarship Fellowship Scholarship Scheme by Bahujan Welfare Department
स्कॉलरशीप फेलोशीप: बहुजन कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती योजना

सामान्य अध्ययनाच्या पेपर क्रमांक १ मधील भूगोलाचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते की, भूगोलाचा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम यात खूप साधम्र्य असलेले दिसते. दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये जगाचा प्राकृतिक भूगोल, भारताचा भूगोल व मानवी भूगोलातील बरेचसे पाठ समान असलेले दिसतात. म्हणजेच पूर्व व मुख्य परीक्षांसाठी आपण एकत्रितपणे अभ्यास करू शकतो. जे विद्यार्थी पुढील वर्षी म्हणजेच २०२५ वर्षांसाठी अभ्यास करत आहेत त्यांनी आत्ताच पूर्व व मुख्य परीक्षेचा वेगवेगळा अभ्यास करण्याऐवजी एकत्र अभ्यास केल्यास त्याचा फायदा होईल. आता आपण मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबतीत चर्चा करू.

 मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम खालील मुद्दे व्यापतो.

जगाच्या प्राकृतिक भूगोलाची प्राकृतिक वैशिष्टय़े;  जगातील (दक्षिण आशिया व भारतीय उपखंडासहित) महत्त्वाच्या नैसर्गिक संसाधनांचे वितरण; जगातील विविध भागातील (भारतासहित) प्राथमिक, दुय्यम व तृतीय क्षेत्रातील उद्योगांच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक; भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखीय क्रिया, आवर्त इत्यादी महत्त्वाचे भूभौतिक घटनादृश्ये; भौगोलिक वैशिष्टय़े व त्यांचे स्थान – कळीच्या/महत्त्वाच्या भौगोलिक वैशिष्टय़ांवर (जलसाठे व हिमाच्छदित प्रदेशांसहित), प्राणी व वनस्पतींवर होणारे बदल व या बदलांचे परिणाम इत्यादी.

वरील अभ्यासक्रमांचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास काही महत्त्वाचे शब्द किंवा संज्ञा आपणांस लक्षात येतील. जसे, प्राकृतिक भूगोल, संसाधने, उद्योगांचे वितरण, भूभौतिक घटनादृश्ये व भौगोलिक वैशिष्टय़ांवर होणारे परिणाम इ. या सर्व संज्ञांची आपणास पोटफोड करून त्याखाली आपल्याला काय अभ्यासायचे आहे हे पाहणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाचे व संज्ञांचे विश्लेषण करून आपण भूगोलाला जगाचा व भारताचा प्राकृतिक भूगोल, आर्थिक व मानवी भूगोल अशा दोन भागात विभागू शकतो.

 जगाच्या व भारताच्या प्राकृतिक भूगोलात खालील घटक येतात.

१. मूलभूत संकल्पना : विश्वाची निर्मिती, सूर्यमाला, पृथ्वीचे परिवलन, परीभ्रमण व त्याचा परिणाम, भूशास्त्रीय कालरचना इ.

२. भूरूपशास्त्र : पृथ्वीचे अंतरंग, खडक व खनिजे, भूकवचावर कार्य करणाऱ्या भूअंतर्गत व बहिर्गत भूरुपीय प्रक्रिया/शक्ती, भूकंप, ज्वालामुखी, खंड व महासागरांचे वितरण-खंडवहनाचा सिद्धांत, सागरतळ विस्तार संकल्पना, भूसांरचनिकी सिद्धांत, बाह्यकारकांची भूरूपे, नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा व भूजलामुळे निर्माण होणारी कास्र्ट भूरूपे इ.

३. हवामानशास्त्र : वातवरणाची रचना व घटक, सौर उत्सर्जन, पृथ्वीचा औष्णिक ताळेबंद, तापमान, आद्र्रता, सांद्रिभवन, वर्षां, वातावरणीय दाब, वातावरणीय परिसंचलन/ अभीसरण-वारे व त्यांचे प्रकार, आवर्त, प्रत्यावर्त, जेट प्रवाह, वायूराशी, मान्सून, हवामानाचे वर्गीकरण – ब्लादिमार कोप्पेनचे, जि. टी. त्रिवार्थाचे, सि. डब्ल्यू थॉर्नवेटचे, जगाचे विविध हवामान विभाग, जलचक्र इ.

४. सागरशास्त्र : पृथ्वीवरील महासागरांची तळरचना, सागरजलाचे गुणधर्म जसे तापमान, क्षारता व घनता त्यांचे उध्र्वगामी व क्षितीजसमांतर वितरण, सागरजलाच्या हालचाली जसे सागरीलाटा व त्यांची वैशिष्टय़े, भरती-ओहोटीच्या लाटा व त्यांचे प्रकार, त्सुनामी लाटा त्यांची कारणे व परिणाम, सागरी प्रवाह-त्यांचे निर्मिती घटक, प्रकार, वितरण व त्यांचे सागरी व हवामानीय परिणाम, सागरी निक्षेप-जैविक, अजैविक, ज्वालामुखी व भूजन्य, सागरी संसाधने- सागरपृष्ठीय, सागरतलीय, जैविक, ऊर्जासंसाधने, प्रवाळभित्तीका – त्यांची निर्मिती, प्रकार, महत्त्व व प्रवाळ विरंजन, सागरी कायदे इ.

५. जैवभूगोलशास्त्र : मृदा निर्मितीस आवश्यक घटक, मृदेचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म, मृदा निर्मिती प्रक्रिया, मृदेचे वर्गीकरण, मृदा उच्छेद, मृदा निचरण, मृदेची धूप व संवर्धन, वनसंसाधने – नैसर्गिक वनसंपत्तीचे वर्गीकरण, कृषीवनीकरण, समुदाय वनीकरण इ.

६. पर्यावरण भूगोल : जैवविविधता, प्रदूषण, परिसंस्था, वाळवंटीकरण, निर्वनीकरण, पूर, दुष्काळ, हवामान बदल व जागतिक तापमानवाढ इ.

अ. भारताचा प्राकृतिक भूगोल : भारताचे स्थान व सीमा, भारताचे भूशास्त्रीय विभाजन, प्राकृतिक विभाग जसे उत्तर भारतीय पर्वतरांगा किंवा हिमालय, उत्तर भारतीय मैदान, भारतीय पठार/द्विपकल्प, किनारी मैदानी प्रदेश व भारतीय बेटे, भारतीय नदीप्रणाली – हिमालयातील व पठावरावरील, भारतीय हवामान – हवामानावर परिणाम करणारे घटक, मान्सूनचे सिद्धांत, ऋतू, एल निनो-ला नीना, भारताचे हवामान विभाग, भारतातील मृदा व वनसंपत्ती इ.

जगाच्या व भारताच्या वरील प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना पाठांतरापेक्षा संकल्पना व भौगोलिक घटनादृश्ये समजून घेण्यावर भर ठेवावा. वरील पाठांवर येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप पाहिल्यास स्थिर घटकांवर येणारे प्रश्न कमी असून विश्लेषणाधारीत प्रश्नांची संख्या जास्त असते. आता आर्थिक व सामाजिक भूगोलाच्या अभ्यासक्रमाकडे वळूयात.

१. आर्थिक भूगोलातील मूलभूत संकल्पना :  आर्थिक भूगोलाची व्याख्या, व्याप्ती, प्राथमिक, दुय्यम, तृतीय, चतुर्थ अशा आर्थिक क्रियांचे प्रकार, समकालीन मुद्दे, प्रादेशिक आर्थिक गटांचा उदय इ.

२. कृषी : कृषी प्रारूपे, उत्पादकता, कृषी तीव्रता अशा मूलभूत संकल्पना, जगातील शेतीचे प्रकार, भारतीय शेतीची वैशिष्टय़े, शेतीच्या समास्या, भारतीय शेतीवर परिणाम करणारे भौगोलिक, संस्थात्मक व तांत्रिक घटक, भारतातील महत्त्वाची पिके, कृषी क्षेत्रातील क्रांती – हरितक्रांती, निलक्रांती, पितक्रांती, श्वेतक्रांती इ., कृषीक्षेत्रातील महत्त्वाची शासकीय धोरणे व उपक्रम, विपणन, वित्तपुरवठा, किमान आधारभूत किंमत, अन्नसुरक्षा, जनुकीय सुधारित पिके, हवामान बदलाचा शेतीवरील व जागतिक अन्न-सुरक्षेवर होणारा परिणाम, सदाहरित, हरित क्रांती, कोरडवाहू शेतीच्या समस्या, कंत्राटी शेती इ.

३. मानवी विकास : वाढ विरुद्ध विकास, मानवी विकासाचे दृष्टिकोन, मानवी विकास निर्देशांक, जागतिक मानवी विकास अहवाल, प्रादेशिक विकास व त्यातील मुद्दे इ.

वरील घटकांव्यतिरिक्त उद्योग, नैसर्गिक संसाधने, लोकसंख्या, भूगोल व वाहतूक-दळणवळण हे घटकही मानवी व आर्थिक भूगोलामध्ये येतात. परंतु, त्यासंदर्भात आपण पुढील लेखामध्ये चर्चा करू.