राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड (RCF), मुंबई (भारत सरकारचा उपक्रम) पुढील बॅकलॉगमधील ७४ पदांवर अजा/अज/ इमाव उमेदवारांची विशेष भरती मोहिमेअंतर्गत भरती.

(१) ऑपरेटर ट्रेनी (केमिकल) – एकूण ५४ पदे.

पात्रता : (दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी) (i) बी.एस्सी. (केमिस्ट्री) पदवी (बी.एस्सी. च्या ३ वर्षांत एक विषय फिजिक्स हा अभ्यासलेला असावा.) आणि (ii) अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) ट्रेडमधील NCVT परीक्षा उत्तीर्ण (अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग बी.एस्सी. पदवीनंतर केलेली असावी.) किंवा (i) केमिकल इंजिनीअरिंग, डिप्लोमा उत्तीर्ण आणि (ii) १ वर्षाचा BOAT अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग. किंवा केमिकल इंजिनीअरिंग/ टेक्नॉलॉजीमधील (४ वर्षं/३१/२ वर्षं कालावधीचा सँडविच पॅटर्न डिप्लोमा)

(२) टेक्निशियन (मेकॅनिकल) ट्रेनी – ८ पदे

(३) टेक्निशियन (इलेकिट्रकल) ट्रेनी – २ पदे

(४) टेक्निशियन (इन्स्ट्रूमेंटेशन) ट्रेनी – ४ पदे

पद क्र. २ ते ४ साठी पात्रता – (दि. १ डिसेंबर २०२२ रोजी) संबंधित विषयातील/ अलाईड बँचेस इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि १ वर्षाचे BOAT अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग पूर्ण किंवा संबंधित विषयातील/अलाईड ब्रँचेसमधील सँडविच पॅटर्नमधून ४ वर्षे/३१/२ वर्षे कालावधीचा इंजिनीअरिंग डिप्लोमा.

याशिवाय टेक्निशियन (इन्स्ट्रूमेंटेशन) पदांसाठी बी.एस्सी. (फिजिक्स) (बी.एस्सी. च्या ३ वर्षांत केमिस्ट्री एक विषय अभ्यासलेला असावा.) आणि बी.एस्सी. पदवी उत्तीर्ण केल्यानंतर इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) ट्रेडमधील NCVT परीक्षा उत्तीर्ण.

पात्रता परीक्षा बी.एस्सी. पदवी/डिप्लोमा इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षी किंवा शेवटच्या २ सेमिस्टर्सला किमान सरासरी इमावसाठी ५५ टक्के गुण आवश्यक. (अजा/अजसाठी ५० टक्के गुण)

(५) बॉयलर ऑपरेटर ग्रेड- III – ३ पदे (अज).

पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि सेकंड क्लास बॉयलर अटेंडंट कॉम्पिटन्सी सर्टिफिकेट किंवा बॉयलर अटेंडंट NCVT सर्टिफिकेट किंवा बॉयलर अटेंडंट डिप्लोमा आणि बॉयलर अटेंडंट/बॉयलर ऑपरेटर म्हणून किमान २ वर्षांचा अनुभव.

(६) ज्युनियर फायरमन ग्रेड- II – २ पदे (अज).

पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि ६ महिने कालावधीचा पूर्णवेळ फायरमन सर्टिफिकेट कोर्स (स्टेट फायर ट्रेनिंग सेंटर किंवा भारत सरकार मान्यताप्राप्त संस्थेकडील).

अनुभव : इंडस्ट्रियल फायर फायटिंगमधील किमान १ वर्षाचा अनुभव.

(७) नर्स ग्रेड- II – १ पद (अजा).

पात्रता : १२ वी आणि ३ वर्षं कालावधीचा जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी ( GNM) कोर्स किंवा बी.एससी. (नर्सिंग) पदवी आणि सेंट्रल/स्टेट नर्सिंग काऊन्सिलकडील रजिस्ट्रेशन.

अनुभव : ऑपरेशन थिएटर असलेल्या २० बेडेड हॉस्पिटलमधील २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा : (दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी) पद क्र. १ ते ५ साठी इमाव – ३३ वर्षे अजा/अज – ३५ वर्षे (संबंधित कॅटेगरीसाठी पदे उपलब्ध असल्यास), पद क्र. ६ साठी ३४ वर्षे, पद क्र. ७ साठी ३६ वर्षे.

निवड पद्धती : (१) कॉम्प्युटर बेस्ड् ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट आणि (२) ट्रेड टेस्ट.

ऑनलाइन अर्ज http://www.rcfltd.com या संकेतस्थळावर दि. ५ एप्रिल २०२५ (१७.०० वाजे) पर्यंत करावेत.

आयटीआय उत्तीर्णांना संधी

दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे (SECR), अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत १००३ जागांवर आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची अॅप्रेंटिसशिपसाठी SECR रायपूर डिव्हीजन आणि वॅगन रिपेअर शॉप रायपूरमध्ये वर्ष २०२५-२६ करिता भरती. ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशील –

(I) डीआरएम ऑफिस, रायपूर डिव्हीजन (E०५२०२२०००४८) – एकूण ७३४.

(१) वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) – १८५ पदे

(२) टर्नर – १४ पदे (३) फिटर – १८८ पदे

(४) इलेक्ट्रिशियन – १९९

(५) स्टेनोग्राफर (इंग्लिश) – १३

(६) स्टेनोग्राफर (हिंदी) – ८

(७) COPA – १०

(८) हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर – ३२

(९) मशिनिस्ट – १२ (१०) मेकॅनिक डिझेल – ३४

(११) मेकॅनिक रेफ्रिजरेट अँड ए.सी. – ११

(१२) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ९

(१३) पेंटर – ६ (१४) कारपेंटर – ६

(१५) मेसन – २ (१६) पाईपलाईन फिटर – २

(१७) हेअर मेन – १ (१८) ब्लॅकस्मिथ – २

( II) वॅनग रिपेअर शॉप, रायपूर (E१११५२२००००१) – एकूण २६९.

(१) फिटर – ११० (२) वेल्डर – ११०

(३) मशिनिस्ट – १५ (४) टर्नर – १४

(५) इलेक्ट्रिशियन – १४ (६) COPA – ४

(७) स्टेनोग्राफर (इंग्लिश) – १

(८) स्टेनोग्राफर (हिंदी) – १

सर्व पदांसाठी अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षाचा असेल.

पात्रता : (दि. ३ मार्च २०२५ रोजी) १० वी किमान सरासरी ५०टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स सर्टिफिकेट.

वयोमर्यादा : (दि. ३ मार्च २०२५ रोजी) १५ ते २४ वर्षे

अर्जाचे शुल्क : रु. १००/-.

शंकासमाधानासाठी मोबाइल नं. ७०२४१४९२४२ किंवा पुढील पत्त्यावर संपर्क साधा – सिनियर डिव्हीजिनल पर्सोनेल ऑफिस, डीआरएम ऑफिस कॉम्प्लेक्स, वॉल्टिअर गेट, रायपूर, छत्तीसगड – ४९२ ००८.

ऑनलाइन अर्ज https://apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावरून दि. २ एप्रिल २०२५ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

suhaspatil237 @gmail. com

नोटीस बोर्ड

आयआयटी दिल्लीत पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्जांची अंतिम मुदत ७ एप्रिल २०२५ आहे. iitd. ac.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेईई मेन २०२५ परीक्षेचे दुसरे सत्र २ ते ९ एप्रिल (५ आणि ६ एप्रिल वगळून) या कालावधीत होणार आहे. परीक्षेची ‘सिटी इंटिमेशन स्लिप’ राष्ट्रीय परीक्षा संस्थेने जाहीर केली आहे. कोणत्या शहरात परीक्षा केंद्र आणि कोणत्या दिवशी परीक्षा ही माहिती विद्यार्थ्यांना याद्वारे कळणार आहे. अॅडमिट कार्ड परीक्षेच्या तीन दिवस आधी उपलब्ध होते. jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळेल.