RITES Limited recruitment 2024 : RITES लिमिटेडमध्ये RITES लिमिटेडमध्ये असिस्टंट मॅनेजरच्या विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती या पदांवर मोठ्या प्रमाणात भरती होणार असून, नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत ते पाहा. नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता आणि पात्रता निकष काय आहेत ते जाणून घ्या. तसेच, नोकरीचा अर्ज कसा करावा आणि त्याची अंतिम तारीख पाहा.

RITES Limited recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल/मेटलर्जी) – या पदासाठी एकूण ३४ पदे रिक्त आहेत.
असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) – या पदासाठी एकूण २८ पदे रिक्त आहेत.
असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) – या पदासाठी एकूण ८ पदे रिक्त आहेत.
असिस्टंट मॅनेजर (आयटी/सीएस) – या पदासाठी एकूण २ पदे रिक्त आहेत.

Tata Institute of Social Sciences Mumbai hiring
TISS Mumbai recruitment 2024 : टाटा इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदावर होणार भरती
ICAR-NBSSLUP walk-in job interview 2024
ICAR-NBSSLUP recruitment 2024 : नागपूर शहरात नोकरीची सुवर्णसंधी! मिळणार ‘इतक्या’ हजारांचे वेतन
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती

एकूण ७२ रिक्त जागांवर भरती होणार आहे.

RITES Limited recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल/मेटलर्जी) – मेकॅनिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान क्षेत्रातील बॅचलर्स पदवी असणे अवश्यक.
असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रातील बॅचलर पदवी असणे आवश्यक.
असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) – सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक.
असिस्टंट मॅनेजर (आयटी/सीएस) – संगणक अभियांत्रिकी/तंत्रज्ञान किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी असणे आवश्यक.

RITES Limited recruitment 2024 – RITES लिमिटेड अधिकृत वेबसाईट
https://www.rites.com/

RITES Limited recruitment 2024 – अधिसूचना
https://www.rites.com/Upload/Career/132_24-135_24_pdf-2024-Apr-08-16-39-21.pdf

RITES Limited recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वर दिलेल्या कोणत्याही पदासाठी उमेदवाराला नोकरीचा अर्ज पाठवायचा असल्यास तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवाराने नोकरीचा अर्ज पाठवताना अर्जामध्ये आपली संपूर्ण आणि योग्य माहिती भरणे अपेक्षित आहे.
तसेच नोकरीचा अर्ज पाठवताना आवश्यक असल्यास योग्य कागदपत्र जोडावी.
या नोकरीसाठी उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
अर्जाची अंतिम तारीख तसेच मुलाखत आणि परीक्षेची तारीख ही २८ एप्रिल २०२४ अशी आहे.

वरील नोकऱ्यांसंबंधी उमेदवारास अतिरिक्त माहिती हवी असल्यास RITES लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीसंबंधीची अधिसूचना वाचावी. अधिकृत वेबसाइट तसेच अधिसूचना वर नमूद केली आहे.