Rohan Mittal Success Story In Marathi :पैसा गरज आहे; आवड नाही, असे म्हणतात. पैसा की आवड या दोन गोष्टींमध्ये तुम्हाला एक पर्याय निवडण्यास सांगितला, तर तुम्ही काय निवडाल? कदाचित अनेक जण पैसा निवडतील. कारण- आजच्या घडीला पैशांशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही. पण, आज आपण अशा एका धाडसी व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत; ज्याने फक्त मुलांना शिकवण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडली, ज्याने पैशांचा त्याग करून त्याच्या आवडीच्या गोष्टी करण्याची जिद्द दाखवली…

फरीदाबाद सेक्टर १६ येथील रहिवासी रोहन मित्तल हा आयआयटी-रुरकीचा माजी विद्यार्थी आहे. रोहन कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजची नोकरी करत होता. पण, आवड पूर्ण करण्यासाठी त्याने ही आर्थिक फायद्याची नोकरी सोडली. हे अनेकांना धक्कादायक वाटेल; पण रोहन आता विद्यार्थ्यना प्रशिक्षण देण्याचे काम करतो आहे. @dnaindia ने दिलेल्या वृत्तानुसार रोहनने ‘वेलडोन क्लासेस’ ही एक कोचिंग संस्था उघडली आहे. तो ९ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी कसा अभ्यास करायचा यासाठी तयार करतो आहे.

Local 18 शी बोलताना रोहन मित्तलने खुलासा केला की, त्याने २०१२ मध्ये आयआयटी रुरकीमध्ये प्रवेश घेतला आणि २०१६ मध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट जगात प्रवेश केला आणि नोएडा, गुरुग्राममधील टॉप कन्सल्टिंग फर्ममध्ये नऊ वर्षे काम केले. गेल्या काही वर्षांत त्याला अनेक वेळा बढती मिळाली आणि त्याने अनेक कंपन्याही बदलल्या. रोहन करत असणाऱ्या शेवटच्या नोकरीत त्याला दरवर्षी एक कोटी रुपयांचे पॅकेज मिळत होते.

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी रोहनने सोडली नोकरी (Success Story)

रोहन मित्तल यशस्वीरीत्या काम करत होता आणि त्यासाठी त्याला भरपूर मोठं पॅकेजसुद्धा मिळत होते. पण, त्याचे मन शिक्षण क्षेत्रात अडकून राहिले होते. त्यातच आयआयटीचे माजी विद्यार्थी म्हणून अनेक विद्यार्थी त्यांच्या शाळेच्या अभ्यासात किंवा उच्च शिक्षणाची तयारी करताना त्याच्याकडे मार्गदर्शन मागत होते. तसेच रोहनही त्यांना आनंदाने मार्गदर्शन करत होता. त्यामुळे आपली आवड हीच आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याकडे त्याचे मन वळले. शिक्षण क्षेत्रातील त्याच्या आवडीने त्याला नोकरी सोडण्यास भाग पाडले आणि पूर्ण वेळ त्याने विद्यार्थ्यांना शिकवण्याचा विचार केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर रोहनने २०२४ मध्ये कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू केली. त्यानंतर फक्त एका वर्षात त्याचे कोचिंग इन्स्टिट्यूट प्रसिद्ध झाले. आज ४० विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी आणि करिअरसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच रोहित शिकवतो ते सर्व वर्ग ‘स्मार्ट क्लासरूम’ म्हणून ओळखले जातात. म्हणजेच या वर्गांमध्ये एक मोठी लायब्ररी, व्हिडीओ रेकॉर्डिंगचीदेखील सोय आहे.