सुहास पाटील

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), दिल्ली पोलीस आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस (CAPFs) (बी.एस.एफ., सी.आय.एस.एफ., सी.आर.पी.एफ., आय.टी.बी.पी., एस.एस.बी.) मध्ये सब इन्स्पेक्टरपदांच्या भरतीसाठी ९, १० व १३ ऑक्टोबर २०२४ रोजी संगणक आधारित परीक्षा २०२४ घेणार आहे. या परीक्षेतून पुढील ४,१८७ पदांची भरती होणार आहे. (१) सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेसमधील सब इन्स्पेक्टर ( GD) ग्रुप बी’. वेतन – पे-लेव्हल – ६, मूळ वेतन रु. ३५,४००/- DA रु. १४,८६८ इतर भत्ते आणि (२) दिल्ली पोलीस दलातील सब इन्स्पेक्टर (एक्झिक्युटिव्ह) (पुरुष/महिला) ग्रुप सी’.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
set exam date marathi news, set exam 7th april marathi news
‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार

वेतन – पे-लेव्हल – ६, अंदाजे वेतन दरमहा रु. ६६,०००/-.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी २० ते २५ वर्षे

(I) दिल्ली पोलीस दलातील पदे –

(१) सबइन्स्पेक्टर (एक्झिक्युटिव्ह) (पुरुष) – १२५

(२) सबइन्स्पेक्टर (एक्झी) (महिला) – ६१ पदे

( II) CAPFs मधील पदे सबइन्स्पेक्टर (जीडी) – एकूण ४,००१ पदे (पुरुष – ३,६९३, महिला – ३०८). (i) BSF – एकूण ८९२ पदे (पुरुष – ८४७, महिला – एकूण ४५ पदे ) (ii) CISF – एकूण १,५९७ पदे (पुरुष – १४३७, महिला – एकूण १६० पदे). ( iii) CRPF – एकूण १,१७२ पदे (पुरुष – १,११३, महिला – एकूण ५९ पदे ). ( iv) ITBP – एकूण २७८ पदे (पुरुष – २३७, महिला – एकूण ४१ पदे ). ( v) SSB – एकूण ६२ पदे (पुरुष – ५९, महिला – एकूण ३ पदे).

पात्रता – (दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी) सर्व पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी परीक्षा उत्तीर्ण. पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

मॅट्रिक्युलेट (एसएससी) उत्तीर्ण माजी सैनिक ज्यांनी किमान १५ वर्षांची डिफेन्स (आर्मी/नेव्ही/एअर फोर्स) मधील सर्व्हिस केलेली आहे. त्यांना स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन मिळाले आहे असे उमेदवार हे दिल्ली पोलीसमधील माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या पदांसाठी अर्ज करू शकतात.

अर्जाचे शुल्क – रु. १००/-.

हेही वाचा >>> बारावीची परीक्षा तर संपली, ‘मग आता पुढे काय?’ करिअर निवडण्याआधी ‘या’ गोष्टी पाहा…

उमेदवाराने ज्या कॅटेगरी (अजा/अज/इमाव/ईडब्ल्यूएस) मधून अर्ज केला आहे, त्यांना कागदपत्र पडताळणीच्या वेळी त्यासाठीचा पुरावा सादर नाही करता आला तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल. अर्जाचे शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने दि. २९ मार्च २०२४ (२३.०० वाजे)पर्यंत भरता येईल.

परीक्षा केंद्र – मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, पणजी इ. (उमेदवारांनी एकाच रिजनमधील ३ परीक्षा केंद्रांसाठी पसंतीक्रम देणे आवश्यक.) पीएसटी/पीईटी चाचणी फक्त पात्रता स्वरूपाची असेल. माजी सैनिकांना PET द्यावी लागणार नाही. उंची आणि छाती मोजमापात सूट मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना Annexure- VIII मधील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक. कागदपत्र पडताळणी संबंधित सूचना जाहिरातीच्या पॅरा-१५.४ व १५.७मध्ये दिलेल्या आहेत. अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी उमेदवारांना पदांचा पसंतीक्रम द्यावा लागेल. सबइन्स्पेक्टर, दिल्ली पोलीस ( A); सबइन्स्पेक्टर BSF ( B); सबइन्स्पेक्टर CISF ( C); सबइन्स्पेक्टर CRPF ( D); सबइन्स्पेक्टर ITBPF ( E); सबइन्स्पेक्टर SSB ( F). स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागात ( WR) मध्ये दादरा नगर हवेली, दमणदिव, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र यांचा समावेश होतो. SSC WR च्या रिजनल डायरेक्टर यांचे कार्यालय मुंबईत असून त्यांची वेबसाईट आहे http://www.sscwr.net. निवड प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांसाठी अॅडमिशन सर्टिफिकेट संबंधित रिजनल ऑफिसच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जातील. परीक्षेनंतर टेंटेटिव्ह आन्सर कीज (उत्तर तालिका) कमिशनच्या वेबसाईटवर उमेदवारांना पाहता येतील. काही त्रुटीसाठी दिलेल्या मुदतीमध्ये उमेदवारांना आपले निवेदन ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक प्रश्नासाठी रु. १००/- भरून सादर करता येईल. उमेदवारांचे निवेदन विचारात घेवून उत्तर तालिकेस अंतिम रूप देण्यात येईल. ऑनलाइन अर्ज करण्याच्या पद्धतीची अशी रचना (Application Module) केली आहे की उमेदवाराचा Live Photograph Capture केला जाईल. उमेदवारांनी आपला Capture झालेला Photograph Annexure- XI मध्ये दाखविल्याप्रमाणे आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. (Photograph चष्म्याशिवाय, टोपी न घालता काढलेला असावा.) (फोटो काढण्यासाठी पॅरा २२ ( g) मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे.) ऑनलाइन अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती जाहिरातीमधील Annexure- I आणि Annexure- II मध्ये दिलेली आहे.ऑनलाइन अर्ज https://ssc.nic.in या संकेतस्थळावर दि. २८ मार्च २०२४ (२३.०० वाजे) पर्यंत करावेत. (पार्ट-१ वन टाईम रजिस्ट्रेशन, पार्ट-२ ऑनलाइन अॅप्लिकेशन भरणे & gt; Payment of Fees) ऑनलाइन अर्जात काही बदल करावयाचा असल्यास ‘ Window for Application Form Correctionl दि. ३० व ३१ मार्च २०२४ रोजी कमिशनच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल.