सुहास पाटील

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), दिल्ली पोलिस आणि सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्सेस (CAPFs) (बी.एस.एफ., सी.आय.एस.एफ., सी.आर.पी.एफ., आय.टी.बी.पी., एस.एस.बी.) मध्ये सब इन्स्पेक्टरपदांच्या भरतीसाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये संगणक आधारित परीक्षा पेपर-१ घेणार आहे. या परीक्षेतून पुढील पदांची भरती होणार आहे.

(१) सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्सेसमधील सब इन्स्पेक्टर (GD) ग्रुप ‘बी’. वेतन : पे-लेव्हल – ६, मूळ वेतन रु. ३५,४००/- DA रु. १४,८६८ इतर भत्ते आणि (२) दिल्ली पोलिस दलातील सब इन्स्पेक्टर (एक्झिक्युटिव्ह) (पुरुष/महिला) ग्रुप ‘सी’.  वेतन : पे-लेव्हल – ६, अंदाजे वेतन दरमहा रु. ६५,०००/-.

वयोमर्यादा : दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी २० ते २५ वर्षे (इमाव – २८ वर्षेपर्यंत; अजा/अज – ३० वर्षेपर्यंत; (विधवा/ परित्यक्ता/ घटस्फोटीत महिला (खुला गट) – ३५ वर्षेपर्यंत, अजा/अज – ४० वर्षेपर्यंत फक्त दिल्ली पोलीस दलातील सब-इन्स्पेक्टर (एक्झी) पदांसाठी. (दिल्ली पोलीस दलातील काँस्टेबल, हेड काँस्टेबल, असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदावर किमान ३ वर्षांची कायमस्वरूपी सेवा दिलेल्या उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा – ३० वर्षे, इमाव – ३३ वर्षे, अजा/अज – ३५ वर्षे)

दिल्ली पोलीस दलातील पदे –

(१) सबइन्स्पेक्टर (एक्झिक्युटिव्ह) (पुरुष) – १०९ (अजा – १४, अज – ९, इमाव – २७, ईडब्ल्यूएस – ११, खुला – ४८) (यातील १० पदे माजी सैनिकांसाठी आणि ११ पदे खाते अंतर्गत उमेदवारांसाठी राखीव आहेत.)

(२) सबइन्स्पेक्टर (एक्झी) (महिला) – ५३ पदे (अजा – ७, अज – ४, इमाव – १३, ईडब्ल्यूएस – ५, खुला – २४).

(३) CAPFs मधील पदे सबइन्स्पेक्टर (जीडी) – एकूण १,७१४ पदे (पुरुष – १,६०१, महिला – ११३).

(i)  BSF – एकूण ११३ पदे (पुरुष – १०७ (अजा – १६, अज – ८, इमाव – २९, ईडब्ल्यूएस – ११, खुला – ४३)).

महिला – एकूण ६ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).

(ii)  CISF – एकूण ६३० पदे (पुरुष – ५६७ (अजा – ८५, अज – ४२, इमाव – १५३, ईडब्ल्यूएस – ५६, खुला – २३१)).

महिला – एकूण ६३ पदे (अजा – ९, अज – ५, इमाव – १७, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २६).

(iii)  CRPF – एकूण ८१८ पदे (पुरुष – ७८८ (अजा – ११८, अज – ५९, इमाव – २१३, ईडब्ल्यूएस – ७९, खुला – ३१९)).

महिला – एकूण ३० पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १२).

( iv) ITBP -एकूण ६३ पदे (पुरुष – ५४ (अजा – ७, अज – ३, इमाव – १३, ईडब्ल्यूएस – १०, खुला – २१)).

महिला – एकूण ९ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – २, खुला – ४).

(v) SSB -एकूण ९० पदे (पुरुष – ८५ (अजा – ११, अज – २, इमाव – २५, ईडब्ल्यूएस – ९, खुला – ३८)).

महिला – एकूण ५ पदे (अजा – ३, इमाव – २).

पात्रता : (दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी) मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी परीक्षा उत्तीर्ण. (दिल्ली पोलीस दलातील सब-इन्स्पेक्टर पदासाठी पुरुष उमेदवारांकडे शारीरिक क्षमता चाचणीच्या दिवसापर्यंत एलएमव्ही (मोटरसायकल आणि कार) ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक).

मॅट्रिक्युलेट (एसएससी) उत्तीर्ण माजी सैनिक ज्यांनी किमान १५ वर्षांची डिफेन्स (आर्मी/ नेव्ही/ एअर फोर्स) मधील सव्‍‌र्हिस केलेली आहे. त्यांना स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन मिळाले आहे असे उमेदवार हे दिल्ली पोलीसमधील माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या पदांसाठी अर्ज करू शकतात. ग्रॅज्युएट नसलेले माजी सैनिक ज्यांनी दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी डिफेन्स विंग्जमधील १५ वर्षांची सेवा पूर्ण केलेली नाही किंवा दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांची १५ वर्षांची सेवा पूर्ण होणार नाही असे उमेदवार कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागात (WR) मध्ये दादरा नगर हवेली, दमणदिव, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र यांचा समावेश होतो.  SSC WR च्या रिजनल डायरेक्टर यांचे कार्यालय मुंबईत असून त्यांची वेबसाईट आहे http://www.sscwr.net. निवड प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांसाठी अ‍ॅडमिशन सर्टिफिकेट संबंधित रिजनल ऑफिसच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जातील.

परीक्षेनंतर टेंटेटिव्ह आन्सर कीज (उत्तर तालिका) कमिशनच्या वेबसाईटवर उमेदवारांना पाहता येतील. काही त्रुटीसाठी दिलेल्या मुदतीमध्ये उमेदवारांना आपले निवेदन ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक प्रश्नासाठी रु. १००/- भरून सादर करता येईल. उमेदवारांचे निवेदन विचारात घेऊन उत्तर तालिकेस अंतिम रूप देण्यात येईल.

NCC उमेदवारांना त्यांच्या पेपर-१ व पेपर-२ च्या गुणांमध्ये बोनस गुण मिळविले जातील.  NCC ‘C’ सर्टिफिकेट – १० गुण,  NCC ‘B’ सर्टिफिकेट – ६ गुण,  NCC ‘A’ सर्टिफिकेट – ४ गुण. अंतिम निवड यादी पेपर-१, पेपर-२ व बोनस गुण एकत्रित करून बनविली जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. १००/-. (महिला/अजा/अज/माजी सैनिक (जे आरक्षणास पात्र आहेत) उमेदवारांना फी माफ आहे.)

उमेदवाराने ज्या कॅटेगरी (अजा/ अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस) मधून अर्ज केला आहे, त्यांना कागदपत्र पडताळणीच्या वेळी त्यासाठीचा पुरावा सादर नाही करता आला तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.

उमेदवाराकडे अजा/ अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले विहीत नमुन्यातील प्रमाणपत्र दि. १५ ऑगस्ट रोजी आणणे आवश्यक.

परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने दि. १५ ऑगस्ट २०२३ (२३.०० वाजे) पर्यंत भरता येईल.

परीक्षा केंद्र : मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, पणजी इ. (उमेदवारांनी एकाच रिजनमधील ३ परीक्षा केंद्रांसाठी पसंतीक्रम देणे आवश्यक.)

निवड पद्धती : पेपर-१, शारीरिक मापदंड चाचणी (PST), शारीरिक क्षमता चाचणी (PET), पेपर-२ आणि वैद्यकीय तपासणी.

पेपर-१ – जनरल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड रिझिनग; जनरल नॉलेज अ‍ॅण्ड जनरल अवेअरनेस; क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड; इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन प्रत्येकी ५० प्रश्न, ५० गुण, एकूण गुण २००, वेळ २ तास.

पेपर-२ – इंग्लिश लँग्वेज अ‍ॅण्ड कॉम्प्रिहेन्शन २०० प्रश्न, २०० गुण, वेळ २ तास. (परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल.)

पेपर-१ व पेपर-२ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची, प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील.)

शारीरिक मापदंड (PST) सर्व पदांसाठी उंची (पुरुष) – १७० सें.मी. (अज – १६२.५ सें.मी.); महिला – १५७ सें.मी. (अज – १५४ सें.मी.); छाती – (पुरुष) – ८० ते ८५ सें.मी. (अज – ७७-८२ सें.मी.)

शारीरिक क्षमता चाचणी (PET) : पुरुष – (१) १०० मी. १६ सेकंदांत धावणे. (२) १.६ कि.मी. अंतर ६ मि. ३० सेकंदांत धावणे. (३) लांब उडी – ३.६५ मी. (४) उंच उडी – १.२ मी. (५) गोळाफेक (१६ पौंड वजनाचा) – ४.५ मी.

महिला – (१) १०० मी. अंतर १८ सेकंदांत धावणे. (२) ८०० मी. अंतर ४ मिनिटांत धावणे. (३) लांब उडी – २.७ मी. (४) उंच उडी ०.९ मी. लांब उडी, उंच उडी, गोळाफेकसाठी ३ प्रयत्न दिले जातील.  PST/PET मध्ये अपात्र ठरलेले उमेदवार  PST/ PETच्या ठिकाणी अपिल करू शकतात.

दृष्टी : चांगला डोळा  Nw आणि खराब डोळा  Nz, दूरची दृष्टी चांगला डोळा – ६/६, खराब डोळा – ६/९ (चष्म्याशिवाय) पीएसटी/पीईटी चाचणी फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

उंची आणि छाती मोजमापात सूट मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना  Annexure-VIII  मधील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक.

कागदपत्र पडताळणी संबंधित डिपार्टमेंट्स/ ऑर्गनायझेशन्स करतील.

उमेदवारांना पदांचा पसंतीक्रम द्यावा लागेल. सबइन्स्पेक्टर, दिल्ली पोलीस (A); सबइन्स्पेक्टर  इरा (B); सबइन्स्पेक्टर  CISF (C); सबइन्स्पेक्टर CRPF (D); सबइन्स्पेक्टर  TBPF (E); सबइन्स्पेक्टर  SSB (F).

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती जाहिरातीमधील  Annexure- I क आणि  Annexure- II- कक मध्ये दिलेली आहे. ऑनलाइन अर्ज   https://ssc.nic.In या संकेतस्थळावर दि. १५ ऑगस्ट २०२३ (२३.०० वाजे) पर्यंत करावेत. (पार्ट-१ वन टाईम रजिस्ट्रेशन, पार्ट-२ ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन भरणे-;  Payment of Fees)