● स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI) मध्ये ‘सर्कल बेस्ड ऑफिसर्स’पदांची भरती.

एकूण रिक्त पदे – २,९६४. (यात २,६०० नियमित पदे व ३६४ बॅकलॉगच्या पदांचा समावेश आहे.) स्टेट बँक ऑफ इंडियाचे कार्यक्षेत्र १६ सर्कल्समध्ये विभागलेले आहे. महाराष्ट्र, भोपाळ, हैद्राबाद इ.

रिक्त पदांचा तपशिल (१) महाराष्ट्र (महाराष्ट्र) (स्थानिय भाषा – मराठी) – एकूण २६७ पदे (अजा – ४१; अज – १८ १३ बॅकलॉगमधील; इमाव – ६७; ईडब्ल्यूएस – २५, खुला – १०३) (२२ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव. कॅटेगरी – LD – ४, VI – ४, HI – ६, d & e – ८).

(२) मुंबई मेट्रो (महाराष्ट्र/गोवा) (मराठी/कोंकणी) – एकूण १०५ पदे (अजा – १७; अज – ८; इमाव – २९; ईडब्ल्यूएस् – १०, खुला – ४१) (४ पदे दिव्यांग कॅटेगरी).

(३) हैद्राबाद (तेलंगणा राज्य) (स्थानिय भाषा – तेलगू/उर्दू) – एकूण २३३ पदे

(४) भोपाळ (मध्य प्रदेश/छत्तीसगड राज्य) (स्थानिय भाषा – हिंदी) – एकूण २३२ पदे

(५) जयपूर (राजस्थान राज्य) (स्थानिय भाषा – हिंदी) – एकूण २१८ पदे

(६) बेंगलुरू (कर्नाटक राज्य) (स्थानिय भाषा – कन्नड) -एकूण २८९ पदे

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण.

अनुभव – (दि. ३० एप्रिल २०२५ रोजी) शेड्यूल्ड कमर्शियल बँक किंवा रिजनल रूरल बँकेमधील ‘ऑफिसर’ पदावरील कामाचा २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – (दि. ३० एप्रिल २०२५ रोजी) २१ ते ३० वर्षे.

स्थानिय भाषा – ज्या राज्यातील पदांसाठी उमेदवाराने अर्ज केलेला आहे. त्या राज्यातील स्थानिय भाषा उमेदवारास अवगत असावी. (वाचता, लिहिता व समजता येणे आवश्यक.) निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून (ऑनलाइन लेखी परीक्षा, स्क्रीनिंग व इंटरव्ह्यूनंतर) त्यांना त्या स्थानिय भाषेमधील टेस्ट ऑफ नॉलेज द्यावी लागेल. ज्या उमेदवारांनी संबंधित स्थानिय भाषा १० वी किंवा १२ वीला अभ्यासलेली असेल त्यांना ही टेस्ट द्यावी लागणार नाही.

परीक्षापूर्व प्रशिक्षण – ( PET) ऑनलाइन मोडने अजा/अज/इमाव/ दिव्यांग उमेदवारांना दिले जाईल. त्यासाठी उमेदवारांनी pre- examination training ऑप्ट करणे आवश्यक.

निवड पद्धती – ऑनलाईन लेखी परीक्षा, स्क्रीनिंग आणि इंटरव्ह्यू.

ऑनलाईन लेखी परीक्षा – जुलै २०२५ मध्ये घेतली जाईल. ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट १२० गुणांसाठी आणि डिस्क्रीप्टिव्ह टेस्ट ५० गुणांसाठी (कॉम्प्युटरवर उत्तरे टाईप करावी लागतील.)

( i) ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट – वेळ २ तास, ४ सेक्शन्स (इंग्लिश लँग्वेज – ३० प्रश्न, वेळ ३० मिनिटे; बँकींग नॉलेज – ४० प्रश्न, वेळ ४० मिनिटे; जनरल अवेअरनेस/इकॉनॉमि ३० प्रश्न, वेळ ३० मिनिटे; कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड – २० प्रश्न, वेळ २० मिनिटे. प्रत्येक प्रश्नास १ गुण असेल.) चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

( ii) डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट – ५० गुणांसाठी, वेळ ३० मिनिटे, २ प्रश्न (इंग्लिश लँग्वेज टेस्ट – पत्रलेखन आणि निबंध लेखन). राज्यनिहाय आणि कॅटेगरीनुसार ऑनलाईन लेखी परीक्षेमधील गुणांनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल. यातून रिक्त पदांच्या ३ पट उमेदवार इंटरव्ह्यूसाठी निवडले जातील. इंटरव्ह्यू ५० गुणांसाठी घेतला जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. ७५०/-. (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)

परीक्षा केंद्र – महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – अहिल्यानगर, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नाशिक, नांदेड, सातारा, नागपूर, पुणे, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/ टटफ.

वेतन – रु. ४८,४८०/- (अधिक अनुभवाच्या २ वर्षांसाठी २ अॅडव्हान्स्ड् इन्क्रिमेंट्स दिले जातील) आणि इतर देय भत्ते.

निवडलेले उमेदवार सर्कल बेस्ड ऑफिसर्स ( CBOs) पदावर ६ महिन्यांच्या प्रोबेशन कालावधीसाठी नियुक्त केले जातील. प्रोबेशन कालावधीमधील कामगिरी पाहून प्रोबेशनर्सना ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-१ वर कायम केले जाईल.

ऑनलाइन अर्ज https:// bank. sbi/ web/ careers/ current- openings या संकेतस्थळावर दि. २९ मे २०२५ पर्यंत करावेत.

शंकासमाधानासाठी फोन नं. ०२२-२२८२०४२७ वर (कामकाजाच्या दिवशी ११.०० ते १७.०० वाजे दरम्यान संपर्क साधा किंवा http:// cgrs. ibps. in USX वर संपर्क साधा.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

suhaspatil237 @gmail. com