Success Story: स्वप्न साकार करण्याची जिद्द ही नेहमी वयापेक्षा मोठी ठरते. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगण्याचा प्रयत्न करते. परंतु, प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न वेगवेगळे असते. कोणाला डॉक्टर व्हायचे असते, कोणाला व्यावसायिक, तर कोणाला आणखी काही. स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करीत असतात. पण, या प्रयत्नांना अनेकदा हवे तसे यश मिळत नाही. मग त्यामुळे काही जण खचून जातात आणि ते स्वप्नपूर्तीसाठी चालत असलेली वाट अर्धवट सोडून देतात; तर काही जण थोड्या मिळालेल्या यशातही समाधानी होतात. आज आम्ही अशाच एका व्यावसायिक महिलेबद्दल सांगणार आहोत, ज्या आता ७८ वर्षांच्या आहेत.

कृष्णावेणी बांगारा असे या वृद्ध महिलेचे नाव असून यांनी वर्ष २००० मध्ये ‘किट्टीज केअर’ या नावाने हे काम सुरू केले. कृष्णावेणी बंगारा चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरबाहेर उभ्या होत्या, होणाऱ्या नातवंडाची वाट पाहत. त्यावेळी त्यांच्या हातात निळा आणि गुलाबी अशा रंगाचे दोन नवीन कपड्याचे सेट होते. डॉक्टरांनी सांगितले की, ती एक मुलगी आहे. कृष्णावेणी यांनी गुलाबी रंगाचा सेट दिला. त्या सेटमध्ये बाळासाठी एक कापड्याचा बेड, टोपी, हातमोजे आणि कपडे होते. हाच छोटासा क्षण त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन आला. त्यांनी असा व्यवसाय सुरू केला, ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या.

असा सुरू झाला व्यवसाय

कृष्णावेणी बांगारा यांनी त्यांच्या नातीसाठी दिलेला सेट डॉक्टरांना खूप आवडला. त्याच हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ कृष्णावेणी यांना फोन केला आणि बाळाच्या कपड्यांबद्दल विचारले. त्यानंतर रुग्णालयाने त्यांना बाळांचे कपडे बनवून देण्यास सांगितले. इथूनच कृष्णावेणी बांगारा यांच्या ‘किट्टीज केअर’ला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.

कृष्णावेणी टॉवेल आणि डायपरसारख्या अनेक गोष्टी मुलांसाठी खूप प्रेमाने आणि काळजीने बनवतात. कृष्णावेणी कापूस आणि मायक्रोफायबर टॉवेल्स खरेदी करतात आणि मग ग्राहकांच्या गरजेनुसार बनवतात. त्या बाळांचे कपडे, झबला, लंगोट, हातमोजे, मोजे, चादरी आणि विविध गोष्टी बनवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परदेशात पसरला व्यवसाय

आज कृष्णावेणी यांचा व्यवसाय परदेशात पसरला आहे. करोनानंतर कृष्णावेणी त्यांच्या कुटुंबासह ओमानमधील मस्कत येथे राहायला गेल्या, पण त्याचे काम थांबले नाही, त्यांना तिथूनही ऑर्डर येतात.