Success Story: आपल्या जिद्दीच्या जोरावर स्वप्न साकारण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. या यशाच्या प्रवासात अनेकांना सहज यश मिळतं; तर काहींना सतत अपयश, नकार पचवावा लागतो. पण, दृढनिश्चय व्यक्तीला नेहमीच यशाचा मार्ग दाखवतो. आज अशाच एका तरुणाचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत; ज्याला लेखी परीक्षेत यश मिळूनही तब्बल १६ वेळा अपयशाचा सामना करावा लागला.

गाझीपूर जिल्ह्यातील खोजापूर गावातील अभिनंदन यादवचे शिक्षण खोजापूर येथील न्यू मॉडेल चिल्ड्रन स्कूलमध्ये झाले. या ठिकाणी १० वी पर्यंतचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर, तो १२ वीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोटा येथे गेला. २०१८ मध्ये त्याने IIT गुवाहाटीमध्ये प्रवेश मिळवून २०२२ मध्ये पदवी प्राप्त केली. या कालावधीत त्याने एसएसबी लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी परीक्षांसाठीही खूप मेहनत घेतली. परंतु, प्रत्येक वेळी त्याला नकाराचा सामना करावा लागला.

लेखी परीक्षांत यशाचा होकार; पण मुलाखतींत १६ वेळा नकार

२०१७ ते २०२४ या कालावधीमध्ये अभिनंदनला तब्बल १६ वेळा लेखी परीक्षेत यश मिळवूनही, वैद्यकीय समस्या आणि मर्यादित संभाषण कौशल्यांमुळे मुलाखतींमध्ये नकाराचा सामना करावा लागला. परंतु, तरीही अभिनंदनने कधीच हार न मानता, अखेरीस यूपीएससी असिस्टंट कमांडंट परीक्षेत सर्वथैव यश मिळवून दाखवले.

२०२२ मध्ये पदवी घेतल्यानंतर अभिनंदनने गुरुग्राममधील क्युबॅशन कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पद मिळवले. ग्रामीण शैक्षणिक पार्श्वभूमीतून आल्यामुळे त्याला इंग्रजी भाषेशी संघर्ष करावा लागला, जो त्याच्या एसएसबी मुलाखतींमध्ये वारंवार अडथळा ठरत होता. परंतु, त्यानंतर त्याने हळूहळू संवाद कौशल्य सुधारण्यात प्रगती केली.

हेही वाचा: Success Story: एकेकाळी करायचे रतन टाटा यांच्या कंपनीत काम; मोठ्या पगाराची नोकरी सोडून उभा केला करोडोंचा व्यवसाय

एका मुलाखतीत अभिनंदनने सांगितले की, तो किमान १६ वेळा SSB मुलाखतीला उपस्थित राहिला होता. परंतु, प्रत्येक वेळी लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊनही, त्याला चांगले इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे मुलाखतीच्या टप्प्यात बाहेर पडावे लागले. परंतु, गुडगावमधील एका खासगी कंपनीत झालेल्या त्याच्या नियुक्तीने त्याचे इंग्रजीतील बोलणे सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, जी त्याच्या यशात महत्त्वपूर्ण ठरली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनंदन यादवला २०२४ मध्ये UPSC असिस्टंट कमांडंट परीक्षा होण्यासाठी ‘क्युबॅशन कन्सल्टिंग’मधील कामातून मिळालेला आत्मविश्वास साह्यभूत ठरला.