Success Story: उच्च शिक्षण घेऊन मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, काही जण चांगल्या पगाराची नोकरी नाकारून स्वतःचे असे काहीतरी सुरू करण्याचा प्रयत्न करतात. आजपर्यंत तुम्ही अशा अनेक व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास पाहिला असेल, ज्यातील काहींनी लाखो रुपयांचा मासिक पगार असलेल्या नोकरीकडे पाठ फिरवून शेती करण्याकडे; तर काहींनी स्वतःचा व्यवसाय करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आज आम्ही अशाच भावंडांचा प्रवास तुमच्यापुढे घेऊन आलो आहोत.

महिन्याला ७० हजारांचे उत्पन्न

नाशिकचे रहिवासी असलेले निशा आणि भूषण जाधव या भाऊ-बहिणीच्या जोडीने एक यशस्वी व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी ‘द फूड फॅन्टसी’ नावाचा एक फूड ट्रक सुरू केला आहे. खरे पाहिल्यास, निशाने एमबीएचे आणि भूषणने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. नोकरी करण्याऐवजी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय सुरू केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच त्यांच्या फूड ट्रकचे मासिक उत्पन्न ७० हजार रुपयांवर पोहोचले. या फूड ट्रकवर ते बर्गर, पिझ्झा व मोमोज यांसारखे लोकप्रिय पदार्थ स्वतः तयार करतात.

नोकरीऐवजी व्यवसायाचा निर्णय

निशा आणि भूषणचा फूड ट्रक काही महिन्यांपूर्वीच सुरू झाला. पण, त्यांनी या व्यवसायात खूप लवकर यश मिळवले. आता हा फूड ट्रक दरमहा सर्व खर्च वजा केल्यानंतर ७०,००० रुपये कमवत आहे. निशा आणि भूषण अन्नपदार्थांच्या स्वच्छतेवर भर देतात. मजुरीचा खर्च कमी करण्यासाठी ते स्वतःचे बर्गर, पिझ्झा व मोमोज बनवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निशा आणि भूषण त्यांच्या या व्यवसायात खूप मन लावून काम करतात. त्यांच्या व्यवसायामुळे ते स्वावलंबी झाले आहेत याचा दोघांनाही खूप आनंद आहे. त्याशिवाय या व्यवसायात नोकरदार व्यक्तीप्रमाणे त्यांच्यावर कोणाचा दबावही नाही. त्यांना हवे तेव्हा हवे ते करण्यास स्वतंत्र झाले आहेत. भाऊ-बहिणीची ही जोडी लोकांसमोर, स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणाईसाठी एक उत्तम उदाहरण ठरत आहे.