Success Story: हल्ली सर्वच क्षेत्रांत महिलांचे सर्वाधिक वर्चस्व पाहायला मिळत आहे. नृत्य असो, गायन असो, क्रीडा असो किंवा अगदी व्यवसाय असो; अशा विविध क्षेत्रांत महिला आपले, आपल्या देशाचे आणि आपल्या कुटुंबीयांचे नाव अभिमानाने उंचावत आहेत. सध्या उद्योजक पुरुषांइतक्याच महिलाही मेहनतीच्या जोरावर उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस सर्वाधिक उंची गाठत आहेत. शिवाय खूप कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षांमध्येही उत्तीर्ण होत आहेत. आज आम्ही अशाच एका महिलेची यशोगाथा सांगणार आहोत.

केरळच्या ४० वर्षीय निसा उन्नीराजन यांची जीवनकथा एखाद्या गोष्टीसारखी आहे. काही महिला ज्या वयात आपले करिअर सोडून कुटुंबाकडे लक्ष देण्याचा विचार करतात, त्याच वयात या महिलेने १००० वा क्रमांक मिळवून UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

३५ व्या वर्षी सुरू केला UPSC चा अभ्यास

दोन मुलींची आई, एक नोकरदार महिला आणि कानाच्या समस्याने ग्रस्त असलेल्या निसा यांनी देशातील सर्वात कठीण UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. वयाच्या ३० व्या वर्षी लोक नागरी सेवेची तयारी सोडण्याचा विचार करू लागतात, तर निसाने वयाच्या ३५ व्या वर्षी ते सुरू करण्याचा निर्णय घेतला.

निसा या सामान्य यूपीएससी उमेदवार नव्हत्या. त्यांना ऐकण्यात अनेक अडचणी येत होत्या, पण त्यांनी त्या कमकुवतपणाकडे दुर्लक्ष करून कोट्टायमचे उपजिल्हाधिकारी रणजीत यांच्याकडून प्रेरणा घेतली, ज्यांनी स्वतःही त्याच आव्हानावर मात केली आणि यशस्वी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सातव्या प्रयत्नात मिळवलं यश

निसा यांचा प्रवास सोपा नव्हता. त्या यूपीएससीच्या सहा प्रयत्नात अपयशी ठरल्या, पण तरीही त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक वेळी त्यांनी त्यांच्या चुकांमधून स्वतःमध्ये सुधारणा केली आणि सातव्या प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या.