Dipesh Kevlani Success Story : आयुष्यात काहीतरी मोठं स्वप्न बघून ते पूर्ण करण्याची आकांक्षा प्रत्येकाच्या मनात असते. काही जण फक्त स्वप्न पाहतात. पण, मनापासून इच्छा असणारे लोक स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडत असतात. अशीच एक गोष्ट दिनेश केवलानी आणि दीपेश केवलानी या दोन भावांची आहे. अहमदाबादचे रहिवासी दोघेही त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात संघर्ष करत होते.
त्यातील मोठा भाऊ दीपेश वॉचमन म्हणून काम करून स्वतःचे आणि भावाचे म्हणजेच दिनेशचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैसे कमवत होता. त्याचारम्यान स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक, कॉमन ॲडमिशन टेस्ट (CAT) उत्तीर्ण झाला आणि आयआयएममध्ये शिक्षण घेण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण केले. तर दुसरीकडे छोटा भाऊ २४ वर्षीय दिनेश केवलानीने आयआयएम लखनऊमधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी मिळवली.
दीपेशचे बालपण गेलं भरपूर कष्टात (Success Story)
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या कॅट परीक्षेत त्याने ९२.५ टक्के गुण मिळवले आणि देशातील सर्वोत्तम संस्थेत स्थान मिळवले. म्हणजेच दिपेशने आयआयएम शिलाँगमध्ये एमबीएसाठी प्रवेश घेतला. २७ वर्षीय दीपेशचे बालपण भरपूर कष्टात गेले . वयाच्या ११ व्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा त्याच्या आयुष्याला एक वेगळेच वळण आले. आई आणि दीपेश एका छोट्याश्या घरात राहायचे. अभ्यासाचा आणि कुटुंबाची भार सांभाळत मामा त्याच्यासाठी आधारस्तंभ बनायचे आणि त्याला आर्थिक व भावनिकदृष्ट्या सुद्धा सांभाळून घ्यायचे.
त्याने अभ्यासाबरोबरच काम करायला सुरुवात केली होती. सातवीत असताना तो बुटांच्या दुकानात काम करू लागला आणि त्याला महिन्याला १५०० रुपये पगार होता. त्याला दहावीत ८५% आणि बारावीत ८९% गुण मिळाले. तो बारावीतही टॉपर होता. त्याने नोकरी आणि अभ्यास दोन्ही एकत्र सांभाळले. दीपेशने बारावी पूर्ण करताच त्याला अहमदाबादमधील शाहीबाग कॅन्टमध्ये वॉचमनची नोकरी मिळाली. त्याला नोकरी मिळाली आणि या नोकरीत त्याला दरमहा १८ हजार रुपये मिळू लागले. रात्रीच्या शिफ्टबरोबर दीपेशने वॉचमन म्हणून काम केले आणि बी.कॉम व एम.कॉम पूर्ण केले. दोन्हीही पदवी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला.