Success Story Of IAS officer Mayank Tripathi : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) दरवर्षी विद्यार्थ्यांची नागरी सेवा परीक्षा (सीएसई) घेतो. पण, ही परीक्षा देशातील कठीण परीक्षांपैकी एक आहे. प्रवेश परीक्षांप्रमाणे उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वर्षानुवर्षे अभ्यास करतात, ज्यासाठी त्यांना फक्त सहा वेळा प्रयत्न करण्याची मुभा दिली जाते. या परीक्षेची तयारी करणे ही एक शिकण्याची प्रक्रिया असली तरी केंद्र सरकारची ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप कठोर परिश्रम, धैर्य व दृढनिश्चय आवश्यक आहे. हेच कारण आहे की, लाखो उमेदवार परीक्षेसाठी नोंदणी करतात आणि तरीही फार कमी उमेदवार परीक्षा देतात आणि त्याहूनही कमी उमेदवार ती उत्तीर्ण होऊ शकतात.

पण, यूपीएससी सीएसई टॉपर्स या परीक्षेच्या त्यांच्या अभ्यास आणि त्यांनी दाखविलेल्या चिकाटीतून ते इतरांना आशा न सोडण्याची प्रेरणा देतात. ते परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी टिप्सही सुचवतात. त्यापैकी बरेच जण अतिशय गरीब पार्श्वभूमीतून येतात. पण, त्यांची आशा आणि सातत्य त्यांना उच्च स्तरावर घेऊन जातात. तर आज आपण अशाच एका यूपीएससी टॉपरची गोष्ट जाणून घेणार आहोत; जो पहिला आयपीएस अधिकारी बनला आणि नंतर काम व अभ्यास करून, त्याने आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

आयएएस अधिकारी मयंक त्रिपाठी यांचा प्रवास (IAS officer Mayank Tripathi’s journey)

मयंक त्रिपाठी हे उत्तर प्रदेशातील कन्नौजचे आहेत. त्यांनी जागरण पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यांचे वडील प्रभात कुमार त्रिपाठी हे कन्नौजच्या जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात अकाउंटंट आहेत आणि त्यांची आई अर्चना त्रिपाठी या गृहिणी आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मयंक त्रिपाठी नेहमीच आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत होते. त्यासाठी त्यांनी २०२२ मध्ये उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग (यूपी पीएससी) परीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयपीएसमध्ये सामील झाले आणि डीएसपी बनले. २०२३ मध्ये त्यांनी यूपीएससी सीएसई परीक्षा देऊन ऑल इंडिया रँक ३७३ ने उत्तीर्ण झाले आणि आयआरएस अधिकारी बनले. पण, त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. मग त्यांनी २०२४ मध्ये तिसऱ्यांदा प्रयत्न केला. त्यांनी त्यासाठी बरीच मेहनत घेतली. एकीकडे ते डीएसपी म्हणून काम करायचे आणि रात्री अभ्यास करायचे. त्यानंतर त्यांच्या कष्टाचे फळ अखेर त्यांना मिळाले आणि ऑल इंडिया रँक १० सह त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि ते आयएएस अधिकारी झाले.