Success Story Of Neha Byadwal : यूपीएससी परीक्षा भारतातील सर्वात आव्हानात्मक परीक्षांपैकी एक आहेत, ज्यामध्ये दरवर्षी असंख्य इच्छुक जिकंण्यासाठी दिवस-रात्र एक करतात. या परीक्षांमध्ये यश मिळवणे लहान कामगिरी नाही. त्यामुळे प्रत्येक जण ही परीक्षा पास होण्यासाठी स्वतःचा एक अनोखा मार्ग शोधून काढतात. तर आज आपण नेहा ब्याडवाल हिच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत; जिने तिच्या अनोख्या दृष्टिकोनातून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.

आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडिया आणि मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. एक वर्ष सोडा १ तास जरी फोनपासून लांब राहावे लागत असले तरीही आपल्याला रहावत नाही. पण, नेहा ब्याडवाल हीने एक अद्भुत गोष्ट करून दाखवली. आयएएस अधिकारीने नेहा ब्याडवाल पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत (सीएसई) नापास झाली. त्यामुळे नेहाने सोशल मीडिया सोडण्याचा आणि आणि तीन वर्षांसाठी तिचा फोन न वापरण्याचा निर्णय घेतला.

तीन वर्षांसाठी तिचा फोन न वापरण्याचा घेतला निर्णय (Success Story)

राजस्थानातील जयपूर येथे जन्मलेल्या आणि छत्तीसगडमध्ये वाढलेल्या नेहाला सार्वजनिक सेवेत येण्याची प्रेरणा तिचे वडील, वरिष्ठ आयकर अधिकारी श्रवण कुमार यांच्याकडून मिळाली. वडिलांच्या सतत बदली होणाऱ्या नोकरीमुळे, नेहाने तिच्या शिक्षणादरम्यान वेगवेगळ्या राज्यांमधील अनेक शाळांमध्ये शिक्षण घेतले. रायपूरमधील डीबी गर्ल्स कॉलेजमध्ये विद्यापीठात अव्वल स्थान मिळवल्यानंतर, तिने यूपीएससी परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले.

नेहा तिच्या पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये अपयशी ठरली. तिचे ध्येय साध्य करण्यासाठी तिने तिचे सामाजिक जीवन त्यागले आणि स्वतःला पूर्णपणे तिच्या ध्येयासाठी समर्पित केले. स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही, तिचे लक्ष आयएएस अधिकारी होण्यावर लक्ष केंद्रित केले .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२१ मध्ये चौथ्या प्रयत्नात तिला कष्टाचे फळ मिळाले. वयाच्या २४ व्या वर्षी नेहाने ९६० गुण मिळवले, ज्यामध्ये मुलाखतीत १५१ गुणांचा समावेश होता आणि तिने ऑल इंडिया रँक ५६९ गुण मिळवले. तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ती असंख्य इच्छुकांसाठी एक आदर्श ठरली आहे. अपयशापासून यशापर्यंतचा नेहाचा प्रवास समर्पण आणि स्वप्ने साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या त्यागांचा एक योग्य पुरावा आहे.