Success Story: संत कुमार चौधरी यांचा जन्म मधुबनी जिल्ह्यातील बसैथ चैनपुरा गावात झाला. त्यांच्या आजोबांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. त्यांचे कुटुंबीयही नवीन विचारसरणीचे असल्याने त्यांनी नेहमीच शिक्षणाला प्राधान्य दिले. ब्रिटिशांच्या काळात गावातील मुलांना शाळेत जाण्यासाठी अनेक किलोमीटर पायी चालत जावे लागत होते, त्यामुळे संत कुमार चौधरी यांचे आजोबा बसंत चौधरी यांनी त्यांच्या गावात शाळा सुरू केली होती. येथूनच संत कुमार चौधरी यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली.

संत कुमार चौधरी यांचे शिक्षण

संत कुमार चौधरी यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्याच गावात असलेल्या सरकारी शाळेत झाले. त्यांचे वडील विद्यालयात प्राध्यापक होते. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संत कुमार चौधरी यांनी दरभंगा येथील सीएम सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजमधून त्यांनी १९७९ साली इंटरमिजिएट आणि नंतर ग्रॅज्युएशनची पदवी मिळवली. पुढे १९८० मध्ये त्यांनी दिल्लीतील बी. फार्मामध्ये प्रवेश घेतला आणि तिथेच राहून पुढील शिक्षण सुरू ठेवले.

दिल्लीत शिक्षणाबरोबरच ते स्पर्धा परीक्षेचीही तयारी करत होते. संत कुमार चौधरी यांना महाराष्ट्र सचिवालयात नोकरी मिळाली. महाराष्ट्र शासनाच्या सचिवालयात त्यांनी अनेक वर्षे काम केले. पुढे त्यांना बढती देण्यात आली आणि सरकारने त्यांना ओएसडी म्हणून राजस्थानच्या राज्यपालांकडे पाठवले. मात्र, संत कुमार चौधरी यांना नोकरीत फारसा रस नव्हता. कारण, नोकरीतून फक्त माणूस स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो आणि समाजासाठी काहीही करता येत नाही, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला.

याचदरम्यान त्यांना कांची पीठाच्या शंकराचार्यांकडून आध्यात्मिक बळ मिळाले. तेथून प्रेरणा घेऊन शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करण्याची कल्पना घेऊन संत कुमार चौधरी यांनी शंकरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची स्थापना केली.

हेही वाचा: Success Story: तीन हजार रुपयांपासून सुरू केला व्यवसाय; आज महिन्याला करतो ७० लाखांची कमाई

अशी झाली स्वप्नपूर्ती

संत कुमार चौधरी यांनी त्यांच्या संस्थेचे नाव शंकरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ठेवले. सर्वात आधी संत कुमार चौधरी यांनी त्यांचे जुने स्वप्न पूर्ण करत त्यांच्या गावात मध्यवर्ती स्तरापर्यंतची पहिली शाळा उघडली. त्यानंतर त्यांनी मधुबनीमध्ये शंकराचार्यांच्या नावाने सर्वप्रथम नेत्र रुग्णालय सुरू केले. त्यानंतर त्यांनी बिहारमध्ये नरसिंह राव सरकारच्या काळात मधुबनीमध्ये कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१०१ संस्था उघडण्याचे ध्येय

संत कुमार चौधरी यांना जगभरात १०१ संस्था उभ्या करायच्या आहेत. त्यांच्या या स्वप्नाची यशस्वी वाटचाल आजही सुरू आहे. एका मुलाखतीत संत कुमार चौधरी यांनी सांगितले होते की, सरस्वती आणि लक्ष्मी या दोन बहिणी आहेत. जिथे सरस्वती असते तिथे लक्ष्मी असते आणि पैशाचा सदुपयोग केला तर लक्ष्मी कधीच कोपत नाही. त्यामुळे त्यांच्या सर्व संस्थांमध्ये धर्म आणि सेवेच्या भावनेने कार्य केले जाते.