Textiles Committee Mumbai Bharti 2024: वस्त्रोद्योग समिती, वस्त्र मंत्रालय, मुंबई येथे भरती सुरू आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चार रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. तसेच पात्र पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे आणि पदसंख्या, अर्ज कसा करायचा, मुलखातीचे स्थळ याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

पदे व पदसंख्या –

The Bhabha Atomic Research Centre Mumbai Recruitment For fifty vacant posts of Driver Read The Notification & apply
BARC Mumbai Recruitment 2024 : मुंबईत नोकरी शोधताय? भाभा अणुसंशोधन केंद्रात मोठी भरती सुरू; आजच करा अर्ज
Maharashtra Board 10th SSC Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Board 10th SSC Result 2024: दहावी बोर्डाचा निकाल जाहीर! विद्यार्थी गुण वाढवण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत करु शकतात अर्ज
Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024 For DH Supervisor vacancies are available job location is Mumbai
TISS Mumbai Bharti 2024: मुंबईत नोकरी करण्याची संधी! ‘या’ पदासाठी भरती सुरू; तब्बल २८ हजार रुपये मिळणार पगार
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Education Opportunities at Bhabha Atomic Research Centre mrj 95
शिक्षणाची संधी : बी.ए.आर.सी.मधील संधी
Tata Institute of Social Sciences Mumbai has announced recruitment notification for the vacant posts For non teaching post
TISS Mumbai Bharti 2024: मुंबईत नोकरीची संधी! टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु; लगेच करा अर्ज
BARC Mumbai Recruitment 2024
BARC Mumbai Recruitment 2024 : भाभा अणुसंशोधन केंद्र कार्मिक विभाग, मुंबई अंतर्गत होणार मोठी भरती, पाहा
MRVC Recruitment 2024
MRVC Recruitment 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत नोकरीची संधी! पाहा माहिती

सल्लागार (Consultant) – १ जागा.

तांत्रिक अधिकारी (Technical Officer) – ३ जागा.

शैक्षणिक पात्रता –

सल्लागार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला बी.ई. / बी.टेक. टेक्स्टाईल किंवा बी. / B.F. टेक. N.I.F.T कडून + वस्त्रोद्योगातील ५ वर्षांचा अनुभव असावा.

तांत्रिक अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला बी.ई. / बी.टेक. टेक्स्टाईल किंवा बी. / B.F. टेक. N.I.F.T कडून + 2 वर्षांचा वस्त्रोद्योग आणि अध्यापनाचा अनुभव असावा.

हेही वाचा…TISS Mumbai Bharti 2024: मुंबईत नोकरी करण्याची संधी! ‘या’ पदासाठी भरती सुरू; तब्बल २८ हजार रुपये मिळणार पगार

पगार –

सल्लागार पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ६५ हजार रुपये पगार दिला जाईल.

तांत्रिक अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ४५ हजार रुपये पगार देण्यात येईल.

मुलाखतीचे स्थळ –

वस्त्रोद्योग समिती, दुसरा मजला, पी. बाळू रोड, प्रभादेवी चौक, प्रभादेवी, मुंबई ४०००२५.

मुलाखतीची तारीख आणि वेळ –

भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना ७ जून २०२४, सकाळी ११ ते दुपारी १:३० पर्यंत बोलावण्यात येईल. उमेदवाराने मुलाखतीच्या दिवशी सकाळी १०:१५ मिनिटांपर्यंत किंवा त्या आधी उपस्थित राहावे.

कोणती कागदपत्रे बरोबर ठेवावी?

वॉक-इन मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने अर्जाचा नमुना, प्रमाणपत्रे आणि प्रशस्तिपत्रांची स्वयं-साक्षांकित प्रत आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो बरोबर आणावा. तसेच वॉक-इन मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने त्यांची मूळ सहाय्यक कागदपत्रे (D.O.B., शिक्षण, अनुभव, वैध सरकारी ओळखपत्र इ.) आणावीत.

अधिक माहितीसाठी अधिसूचना तपासून घ्यावी –

लिंक – https://drive.google.com/file/d/1kWhaYQ0Sg2mLoOZtc-HgVUFXLeI6f7GO/view

उमेदवार या लिंकवरून थेट अर्ज करू शकतात.

लिंक – https://drive.google.com/file/d/1PaoIyQ-yDiZduYKGHnSkZE4dHWFSfHC_/view

टीप : सर्व पदे कराराच्या आधारावर आहेत, म्हणजेच ३१/०३/२०२५ पर्यंत असणार आहेत.