सुहास पाटील
१) युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड (UIICL), मुख्यालय चेन्नई (Ref. No. UIIC/ HO- HRM/ ASST/२०२३ dt. १४.१२.२०२३) ‘३०० असिस्टंट’ पदांची भरती.
महाराष्ट्र राज्यातील रिक्त पदे – २३ (अज – १, ईडब्ल्यूएस – २, खुला – २०) (माजी सैनिकांसाठी ३ पदे राखीव). गोवा – २ पदे, आंध्र प्रदेश – ८ पदे, गुजरात – ५ पदे, कर्नाटक – ३२ पदे, मध्य प्रदेश – १० पदे, तेलंगणा – ३ पदे इ.
वेतन – (वेतन श्रेणी रु. २२,४०५ – १,३०५ (१) ….. ६२,२६५) रु. ३७,०००/- दरमहा.
पात्रता – (दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि रिजनल लँग्वेज (वाचता, लिहिता, बोलता) येणे आवश्यक.
वयोमर्यादा – (दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी) २१ ते ३० वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे, पुनर्विवाह न केलेल्या विधवा/ परित्यक्ता/ घटस्फोटीत महिला – ५ वर्षे).
हेही वाचा >>> UPSC-MPSC : पायाभूत सुविधांची अर्थव्यवस्थेतील भूमिका काय? या सुविधांचे वर्गीकरण कसे केले जाते?
अर्जाचे शुल्क – अजा/ अज/ दिव्यांग – रु. २५०/- (फक्त सर्व्हिस चार्जेस) अधिक जीएसटी, अजा/अज/दिव्यांग वगळता इतर उमेदवार – रु. १,०००/- (अर्जाचे शुल्क अधिक सर्व्हिस चार्जेस) अधिक जीएसटी.
निवड पद्धती – पात्र उमेदवारांना ऑनलाइन एक्झामिनेशन द्यावी लागेल. यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांना ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज केला आहे, त्यांना त्या राज्यातील रिजनल लँग्वेज टेस्ट द्यावी लागेल.
ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट (१) टेस्ट ऑफ रिझनिंग, (२) टेस्ट ऑफ लँग्वेज, (३) टेस्ट ऑफ न्यूमरिकल ॲबिलिटी, (४) टेस्ट ऑफ जनरल नॉलेज/जनरल अवेअरनेस, (५) कॉम्प्युटर नॉलेज. प्रत्येकी ४० प्रश्न व ५० गुण. एकूण २०० प्रश्न, २५० गुण, वेळ १२० मिनिटे.
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. अंतिम निवड रिजनल लँग्वेज टेस्ट उत्तीर्ण करणाऱ्या ऑनलाइन परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल. प्रतीक्षा यादीसुद्धा बनविली जाईल.
परीक्षा केंद्र – औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/ टटफ, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, चंद्रपूर, सोलापूर, लातूर, धुळे.
उमेदवारांना ऑनलाइन टेस्टसाठीचे कॉल लेटर परीक्षेच्या १० दिवस अगोदर कंपनीची वेबसाईट ( uiic. co. in) वरून डाऊनलोड करता येईल. त्यासंबंधी सूचना उमेदवारांना ई-मेल/ एसएमएसद्वारे पाठविली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल. प्रोबेशन कालावधीमध्ये असमाधानकारक काम असल्यास प्रोबेशन कालावधी वाढविला जाऊ शकतो.
ऑनलाइन अर्ज www. uiic. co. in या संकेतस्थळावर दि. ६ जानेवारी २०२४ पर्यंत करावेत. ( Application Registration & gt; Payment of Fees & gt; Document Scan and Upload) (फोटोग्राफ (४.५ x ३.५ cm), सिग्नेचर ( with black ink), left hand thumb impression on white paper with black or blue ink, a hand written declaration).