UPSC CSE Result 2023 : नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेण्यात आलेल्या UPSC परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल आज म्हणजेच १६ एप्रिल रोजी जाहीर झाला आहे. नागरी सेवा परीक्षेत मुलाखतीला बसलेले सर्व उमेदवार त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट – upsc.gov.in वर पाहू शकतात. त्यांचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

निकाल ‘या’ दोन वेबसाइटवर पाहता येईल

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल लवकरच जाहीर केला जाईल. उमेदवार त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट – upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर पाहू शकतात. निकाल जाहीर करण्यासोबतच आयोग टॉपर्सची यादी आणि त्यांचे गुणही प्रसिद्ध करेल.

निकाल कधी जाहीर केला जाईल?

मागील निकालांच्या नमुन्यांनुसार, UPSC सहसा मुलाखती संपल्यानंतर दोन ते तीन दिवसांत CSE निकाल जाहीर करते. अंतिम निकालात यशस्वी उमेदवारांची नावे आणि रोल नंबर ही पीडीएफ फॉर्मेटमध्ये सूचीबद्ध केली जातील.

अंतिम निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर करा क्लिक

https://upsc.gov.in/exams-related-info/final-result

प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत कधी झाली?

UPSC CSE 2023 ची प्राथमिक परीक्षा २८ मे २०२३ रोजी झाली, त्यानंतर UPSC नागरी सेवा परीक्षा (CSE) मुख्य परीक्षा, जी १५ सप्टेंबरपासून सुरू झाली आणि पाच दिवस चालली. यानंतर मुलाखतीची प्रक्रिया ४ जानेवारीला सुरू झाली आणि ९ एप्रिल २०२४ रोजी संपली.

दरवर्षी लाखो उमेदवार UPSC नागरी सेवा परीक्षे (UPSC CSE) साठी बसतात, ज्यामध्ये तीन टप्पे असतात – प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत. यूपीएससीच्या मुलाखती ९ एप्रिल रोजी संपल्या आहेत. यावेळी UPSC ची मुलाखत २ जानेवारी ते ९ एप्रिल या कालावधीत ३ टप्प्यांत घेण्यात आली. हे तीन टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांचीच यूपीएससीमध्ये निवड केली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना UPSC द्वारे विविध सरकारी विभागांमध्ये ११०५ या रिक्त पदांवर भरती केले जाईल. या अंतिम निकालात यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS), भारतीय पोलिस सेवा (IPS), भारतीय महसूल सेवा (IRS) आणि इतर केंद्रीय सेवा आणि पदांवर भरती केले जाईल.